न्यूज अपडेट: करुया मदत पोळीसाठी आदिवासी बांधवांच्यां होळी साठी..!!!
होळी सणासाठी आदिवासी बांधवांना "केअर ऑफ़ नेचर" संस्थेचा मदतीचा हात
उरण (प्रतिनिधी/ सुनिल ठाकुर) :- नेहमीच आदिवासी बांधवांच्या सुख दुखात सामील होणारे केअर ऑफ़ नेचर संस्था वेश्वी चे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण राजु मुंबईकर हे दरवर्षी सणाच्या वेळी आदिवासी बांधवांच्या घरात सुद्धा गोड धोड पदार्थ बनविले जावे व त्यानी सुद्धा सण आनंदाने साजरा करावा या उद्देशाने होळी सणासाठी केअर ऑफ़ नेचर संस्थे तर्फे रानसई, खोंड़याची वाडी, मार्गाची वाडी, बंगल्याची वाडी, खेर काठी, पुनाडे वाडी, येथील आदिवासी बांधवांना पुरण पोळीच सामान व किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री राजू मुंबईकर ह्यांच्या औदार्यतुन साकारलेल्या ह्या सुंदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती दर्शविली ती कर्नाळा वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी आर.एफ.ओ.श्री प्रदिप चव्हाण, श्री बी.आर.जाधव, रा.जि.प.सदस्य श्री ज्ञानेश्वर घरत, रानसईच्या सरपंच सौ.संगिता ताई भगत, कॉन संस्थेचे उपाध्यक्ष श्री संदेश घरत, विलास ठाकुर, पत्रकार श्री सुनिल ठाकूर, सुयश क्लासेस चे निवास गावंड सर, सारडे विकास मंच चे श्री संपेश पाटील, श्री रोहित पाटील, गोल्डन ज्युबली मंडळाचे श्री अनिल घरत, श्री नवनीत पाटील आणि वाडी वस्तीवरील सर्व आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत हा अनोखा आणि प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.