न्यूज अपडेट: गुड फ्रायडे, इस्टर संडे साधेपणाने साजरे करा पनवेल महापालिका आयुक्तांचे निर्देश:
पनवेल (प्रतिनिधी/प्रदीप पाटील) :- कोविड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर गुड फ्रायडे आणि इस्टर संडे हे सण साजरे करतानाही कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश आयुक्त श्री. सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. गुड फ्रायडे व इस्टर संडेला चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात येते या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका आयुक्तांनी विशेष मार्गदर्शक सूचना सूचनाजारी केल्या आहेत. चर्चमधील जागेनुसार प्रार्थना सभेच्या उपस्थितीचे नियमन करणे बंधनकारक आहे. मोठा चर्च असल्यास ५० तर लहान चर्चमध्ये १० ते २५ लोकांच्या उपस्थितीत प्रार्थना सभा आयोजित करण्यात याव्यात.
सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी चार ते पाच खास सभांचे आयोजन करावे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. चर्चच्या व्यवस्थापकांनी ऑनलाईन सभेची सुविधा उपलब्ध करून द्यावी व त्याची माहिती सामाजिक माध्यमांद्वार प्रसारित करावी. चर्चबाहेर अथवा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र येणे टाळावे. गर्दी आकिर्षित करेल, अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम, मिरवणुकांचे आयोजन करू नये. शासन, महापालिका आणि संबंधित विभागांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.