Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

न्यूज अपडेट: पत्रकारांचे आज सरकारच्या निषेधार्थ आंदोलन:

न्यूज अपडेट: पत्रकारांचे आज सरकारच्या निषेधार्थ आंदोलन: नवी मुंबई (मुंबई/प्रतिनिधी) :- गेल्या वर्षी टाळेबंदी सुरू झाल्यानंतर आणि आताची टाळेबंदी  जाहीर होण्याच्या आधीपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणाऱ्या पत्रकार आणि पत्रकारितेतर कर्मचाऱ्यांना लोकलमधून कार्यालयीन कामासाठी फिरण्याची मुभा मिळावी, यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघासह विविध पत्रकार संघटना राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार करीत आहेत. मात्र राज्य शासन पत्रकारांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहात नाही. पत्रकारांच्या मागण्यांवर चर्चा सुरू असल्याचे सांगून राज्य सरकार वेळ काढू धोरण अवलंबित आहे.  शासनाची ही भूमिका निषेधार्ह असून आज मंगळवार दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी 2  वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन परिसरात पत्रकारांचे विविध मागण्यांसाठाचे आंदोलन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून होणार आहे. या आंदोलनात सर्व पत्रकार संघटना आणि पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाने केले आहे. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्या

न्यूज अपडेट: राज्य सरकारकडून आणखी नियम कठोर..काय आहेत कडक निर्बंध..??

न्यूज अपडेट: राज्य सरकारकडून आणखी नियम कठोर..काय आहेत कडक निर्बंध..?? नवी मुंबई (प्रतिनिधी) :- राज्यात २२ एप्रिल रात्री आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. २२ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ पर्यंत हे कडक निर्बंध असणार आहेत. राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून आणखी नियम कठोर करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा व अतिमहत्त्वाचे कारण वगळता कोणालाही बाहेर पडता येणार नाही असे सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. वाचा काय आहेत नियम. खासगी प्रवासी वाहतूक- ● बसगाड्या वगळता इतर खासगी प्रवासीवाहतूक केवळ आपत्कालीन सेवेसाठी वा वैध कारणांसाठी वापरता येईल. पन्नास टक्के ही कमाल मर्यादा राहील. या प्रवासात आंतर-जिल्हा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासी वाहतूक अपेक्षित नाही तर प्रवाशांच्या निवासस्थानाच्या शहरापुरती मर्यादित राहील. ● जीवनावश्यक सेवेची पूर्तता किंवा वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग वा अंत्यसंस्कार आणि कुटुंबातील कोणी गंभीर आजारी असणे यासारख्या परिस्थितीत आ

न्यूज अपडेट: कोरोना काळात काळजी घ्या..नियम पाळा: डॉ. प्रतिक तांबे यांचे मार्गदर्शन शिबिर:

न्यूज अपडेट: कोरोना काळात काळजी घ्या..नियम पाळा: डॉ. प्रतिक तांबे यांचे मार्गदर्शन शिबिर: ● नवी मुंबई येथील महापे एम.आय.डी.सी मधील डोविएर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथील कर्मचारी व अधिकारी यांना डॅा.प्रतिक तांबे यांचे मार्गदर्शन. नवी मुंबई (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सोशल मीडियावर येत असणाऱ्या बातम्या,त्यात धास्तावलेले परंतु तरीही कामावर जाणारे कर्मचारी,अधिकारी यांना कोरोनाची सद्यस्थिती, कोरोना उपचार, लसीकरण, आहार, रक्तदान याबाबत डॅा.प्रतिक प्रभाकर तांबे यांनी  डोविएर इंडिया प्रा.लि. कंपनी मधील कर्मचारी व अधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. तांबे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती, यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाबाबत, तसेच कोरोना काळात आपली व कुटुंबाची कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. ताप, सर्दी, खोकला, थकवा, दम लागणे, डोकेदुखी, जुलाब अथवा इतर कोणत्याही शारीरिक समस्या उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तसेच जर डॉक्टरांनी कोरोना ची चाचणी करावयास सांगितली तर ती तपासणी लगेच करून, जोपर्यंत रिपोर्ट येत नाही त

न्यूज अपडेट: तीन भावंडांवर नवी मुंबईत कोयत्याने केला जीवघेणा हल्ला:

न्यूज अपडेट: तीन भावंडांवर नवी मुंबईत कोयत्याने केला जीवघेणा हल्ला: नवी मुंबई (रूपाली वाघमारे) :- नवी मुंबईतील वाशी परिसरात किरकोळ वादातून वैश्य कुटुंबातील दोन भाऊ व एका बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई 2 कुटुंबांमधील वादाचे रूपांतर एक भ्याड हल्ल्यात झाले आहे. नवी मुंबईतील कोपरी गावात तीन भावंडांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले असून दुसऱ्या भावाची प्रकृती स्थिर आहे. वैश्य कुटुंबातील मुलगी काजल हिची छेड काढल्याची तक्रार पोलिसात केल्यावरुन दोन कुटुंबांमध्ये वाद सुरु झाला होता. त्यातूनच हा जीवघेणा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी कुटुंबाने कोयत्याने हल्ला केला. रितिक आणि अमित हे भाऊ, तर त्यांची बहीण काजल हिच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तिघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी हल्लेखोर आरोपी श्रीनिवास अय्यरला ताब्यात घेतले आहे. तर

न्यूज अपडेट: लॉक डाऊन मुळे कोरोनाला बसली खीळ.. !!

न्यूज अपडेट: लॉक डाऊन मुळे कोरोनाला बसली खीळ.. !! नवी मुंबई (प्रतिनिधी/प्रतिक यादव) :- महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वी जाहीर केलेल्या लॉक डाऊन मुळे नवी मुंबई पालिका प्रशासनास कोरोना वाढी वरती नियत्रंण मिळवल्यास काही प्रमाणात यश आलेले आहे असे चित्र दिसत आहे. त्यातच नवी मुंबई पालिका क्षेत्रा तील नागरिक हि नवीन लॉक डाउन चे शिस्त बद्ध रीतीने पालन करताना दिसत आहेत.  अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असला तरीही नागरिकांची वर्दळ अत्यंत नगन्य स्वरूपाची असल्या मुळे नवी मुंबई पोलीस प्रशासन हि निश्चिन्त असल्याचे वातावरण आहे.  दररोज सायंकाळी पालिका प्रशासन कडून दैनंदिन  कोरोना अहवाल दिला जातो या अहवाला मध्ये  कोरोना पॉजिटीव्ह ची संख्या ६७५ होती आणि मागील आठवड्यात हजारच्या वर असणारी संख्या पाहता आताच हा आकडा निश्चितच दिलासा देणारा आहे. आणि त्याच प्रमाणे कोरोना मृत्यू दरही नगण्य आहे. यातील ऐरोली, घणसोली आणि बेलापूर येथील कोविड सेंटर मध्ये जास्त रुग्ण आहेत. जर याच पद्धतीने हि आकडेवारी कमी होत राहिली तर नवी मुंबई पालिका लवकरच कोरोना वर कडक नियंत्रण प्राप्त करेल यात अजिबात शंका नाही. वरील चित्र पाहून

न्यूज अपडेट: मराठी चित्रपट श्रुष्टीवर शोककळा; चतुरस्र श्रेणीचा अभिनेता किशोर नांदलस्कर काळाच्या पडद्याआड:

न्यूज अपडेट: मराठी चित्रपट श्रुष्टीवर शोककळा; चतुरस्र श्रेणीचा अभिनेता किशोर नांदलस्कर  काळाच्या पडद्याआड: नवी मुंबई (प्रतिनिधी/दीपा वाघमारे) :- मराठी चित्रपट श्रुष्टीवर शोककळा..चतुरस्र श्रेणीचा अभिनेता काळाच्या पडद्याआड. कोरोना महामारी आपल्यातून अनेक दिग्गजांना घेऊन जात आहे. या महामारी ने आजवर अनेकांनी आपल्या आप्तांना गमावले आहे. ही म’हामा’री कधी संपेल याचीच वाट सगळे पाहत आहेत. गेले वर्ष आणि चालू वर्ष हे मराठी चित्रपटसुर्ष्टी बॉलिवूड-हॉलिवूड आणि इतर चित्रपटसृष्टीसाठी अतिशय वेदनादायी आणि धक्कादायक असे राहिलेले आहे. कोरोना महामारी मुळे अनेक दिग्गज आपल्यातून निघून गेले आहेत. या महामारीमुळे गेल्या अनेक दिवसापासून चित्रपटाचे चित्रीकरण हे खोळंबले आहे. यातच अनेकांना रोजगार देखील मिळत नाही. त्यामुळे अनेक जण खचून गेले आहेत. लसीकरण देखील सध्या जोरदार सुरू आहे. मात्र, ल’सीक’रणचा प्रभाव अजून तरी दिसत नाही. मात्र, कालांतराने हे चित्रीकरण सुरू करण्यात आले आहे. चित्रीकरण सुरू करताना कोरोनाचे सर्व निय’म पाळण्याचे निर्देश सर कारने दिलेले आहेत. अनेक मालिका हे निर्देश पाळत आहेत. असे असले तरी काहीजणांना

न्यूज अपडेट: सुप्रसिद्ध बुरगुंडाकार लोककलावंत निरंजन भाकरे यांचे कोरोनाने निधन:

न्यूज अपडेट: सुप्रसिद्ध बुरगुंडाकार लोककलावंत निरंजन भाकरे यांचे कोरोनाने निधन: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- भारूडरत्न निरंजन भाकरे यांचे निधन झाले. थोर लोक कलावंत निरंजन भाकरे यांचा जन्म १० जून १९६५ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथे झाला.लोककलावंत निरंजन भाकरे यांनी लोककलेच्या माध्यमातुन, भारुडांच्या माध्यमातुन अख्ख्या महाराष्ट्राची मने जिंकली होती.सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा, दम दमा दम, ट्रिक्स मिक्स रिमिक्स, धिना धिन धा, तसेच झी मराठी वरील मराठी पाऊल पडते पुढे, अवघा रंग एक झाला, महाराष्ट्राची लोकधारा, गर्जा महाराष्ट्र माझा, अशा अनेक गाजलेल्या कार्यक्रमांमधुन निरंजन भाकरे यांनी रसिकांच्या मनात घर केले होते. "तुला बुरगुंडा होईल बया गं" या अतिशय लोकप्रिय झालेल्या भारुडानं तर महाराष्ट्रच नाही, भारतच नाही, तर अमेरिका सुद्धा त्यांनी गाजवुन टाकली होती. खरे तर भाकरेंना वडिलांकडूनच भजनाची परंपरा लाभली. वडील झोळणीत घालून झोकां देत भजन, पोवाडे गात. यातूनच नकळत त्यांच्यावर कलेचे संस्कार होत गेले. शालेय शिक्षण झाल्यावर पुढे औरंगाबाद एमआयडीसीमध्ये लुपीन या औषध

न्यूज अपडेट: एम.जी.एम.कामोठे येथे नवी मुंबई महानगरपालिकेची 20 आयसीयू बेड्सची आरोग्य सुविधा सुरू:

न्यूज अपडेट: एम.जी.एम.कामोठे येथे नवी मुंबई  महानगरपालिकेची 20 आयसीयू बेड्सची आरोग्य सुविधा सुरू: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांवरील उपचारासाठी त्यांच्या लक्षणांच्या स्वरूपानुसार योग्य बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी, रूग्णसंख्या वाढणार असल्याचा अंदाज येऊ लागताच, तत्परतेने आधीपासूनच सुरूवात करण्यात आलेली आहे. यामध्येही विशेषत्वाने आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची कमतरता लक्षात घेऊन खाजगी रूग्णालयांतील आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची वाढ करण्याकडे लक्ष देण्यासोबतच महानगरपालिकेच्या कोव्हीड सुविधांमधील आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स संख्येत वाढ केली जात आहे. सध्या नेरूळ येथील डॉ. डि.वाय.पाटील रूग्णालयात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 200 आयसीयू बेड्स आणि 80 व्हेंटिलेटर्सची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. महानगरपालिकेच्या या सुविधेत वाढ करण्याच्या दृष्टीने आता कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात नियोजित 100 आयसीयू बेड्स आणि 40 व्हेंटिलेटर्सपैकी पहिल्या टप्प्यात आजपासून 20 आयसीयू बेड्स आणि 10 व्हेटिलेटर्सची सुविधा कार्यान्वित झालेली आहे. 13 एप्रिलला ठाणे जिल्ह्या

न्यूज अपडेट: वर्षा बंगल्यावर तातडीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्याच्या भेटीस..!!

न्यूज अपडेट: वर्षा बंगल्यावर तातडीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्याच्या भेटीस..!! मुबई (प्रतिनिधी/अशोक वाघमारे) :- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर केंद्रीय अन्वेशन विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची भेट मानली जात आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी खंडणीचा आरोप केला होता. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले होते. त्यानंतर राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली होती. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे न्यायालयाने सीबीआयला याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर देशमुख यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. खंडणी प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्या मालमात्तांवर छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईसह राज्यातील १० ठिकाणी ही छापेम

न्यूज अपडेट: महानगरपालिका हद्दीतील दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यत उघडी राहणार:

न्यूज अपडेट: महानगरपालिका हद्दीतील दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यत उघडी राहणार: पनवेल (प्रतिनिधी/किरण पवार) :- पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये वाढत असलेली रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे निर्बंध लागू करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या नव्या आदेशाप्रमाणे पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व किराणा मालाची दुकाने , भाजीपाला, दुकाने, फळ विक्रते, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी (मिठाई), सर्व खाद्य दुकाने( कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी) कृषी अवजारे तसेच कृषी उत्पादनांशी संबधित दुकाने ,पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थाची दुकाने ,वैयक्तिक तसेच आस्थापनांसाठी पावसाळ्यांपूर्वी करण्यात येणाऱ्या कामाकरीता लागणारी साधनसामुग्री संबधित दुकाने फक्त सकाळी 7.00 ते 11.00 वाजेपर्यंत उघडी राहतील. या सर्व दुकानातून कोरोनाच्या नियमांचे पालन करून होम डिलिव्हरी अर्थात घरपोच सेवा सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या कालावधीमध्ये  करण्यास परवानगी राहील. या निर्बंधाशिवाय बाकी सर्व निर्बंध पूर्वी दिलेल्या राज्य शासनाच्या आदेशा प्रमाणेच राहणार आहेत. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुर

न्यूज अपडेट: वंशाचा दिवा लावायला कोणी शिल्लक राहणार नाही; पँथर डॉ. राजन माकणीकर:

न्यूज अपडेट: वंशाचा दिवा लावायला कोणी शिल्लक राहणार नाही; पँथर डॉ. राजन माकणीकर: नवी मुंबई (प्रतिनिधी/नीलेश भोईर) :-   विश्वभूषण बाबासाहेब डॉ. भीमराव सुभेदार रामजी आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माता आहेत, त्यामुळे मनूच्या पिलावळीने अवकातीत राहावे अन्यथा तुमचा वंशच दिसणार नाही. असा गंभीर इशारा पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे दिला. ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे ७० वर्ष होऊन गेले देश गुण्या गोविंदाने नांदत आहे. तुझ्या सारख्या नाजाईज मनुच्या पिलाला जन्म देणाऱ्या आईला सर्वार्थाने मान-सन्मान व संरक्षण मिळाले आहे, त्या महापुरुषांबद्दल अपशब्द बोलून देशातील एकता व राष्ट्राची एकात्मता भंग करू पाहणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीनि याद राखा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरच नव्हे, अन्य कुन्याही महामानवांच्या व्यक्तिमत्वावर चिखलफेक केली तर... वंशाला दिवा लावायला कोणी शिल्लक राहाणार नाही अशी गंभीर प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेशात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्राला १४ एप्रिल रोजी फाडून जाळनाऱ्या राष्ट्

न्यूज अपडेट: पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचारी वाढवण्याच्या श्रेयस ठाकूर यांच्या मागणीला यश:

न्यूज अपडेट: पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचारी वाढवण्याच्या श्रेयस ठाकूर यांच्या मागणीला यश: ● मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO) ने दखल घेत महापालिका आयुक्तांना उचित कारवाई करण्यासाठी पाठवले पत्र* पनवेल (प्रतिनिधी/प्रदीप पाटील) :-  पनवेल शहरातील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळाची गरज आहे.येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराकरिता डॉक्टर व आरोग्य कर्मचारी पुरवण्याची मागणी दक्ष नागरिक संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना पत्राद्वारे केली होती. पत्राची दखल मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO)ने घेतली व महापालिका आयुक्त यांना पत्र पाठवत सदर प्रकरणी आपल्या स्तरावरून शासनाच्या प्रचलित कायदे, नियम, धोरणानुसार उचित तत्काळ कार्यवाही करावी व अर्जदारास परस्पर कळविण्यात यावे, तसेच एक प्रत विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण भवन यांना पाठविण्यात यावी असे पत्र मकरंद देशमुख उपायुक्त (महसूल) तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण भवन यांनी श्रेयस ठाकूर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. उपजिल्

न्यूज अपडेट: डॉ.अरुण निगवेकर यांचे निधन:

न्यूज अपडेट: डॉ.अरुण निगवेकर यांचे निधन: नवी मुंबई (प्रतिनिधी/ज्योत्सना पगारे) :- ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण निगवेकर (७९ ) यांचे पुण्यात राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली  वाहिली आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॉ. निगवेकरांच्या पुण्यातील निवासस्थानी कोणीही गर्दी करु नये, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे. डॉ. अरुण निगवेकर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.१९९८-२००० या काळात ते पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर कार्यरत होते. यानंतर २००० ते २००५ या कालावधीत त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद भूषवले होते.याशिवाय शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनावर शिक्कामोर्तब करणाऱ्या ‘नॅक’चे ते संस्थापक संचालक देखील होते. भारतातील उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण आणि आधुनिकतेचा प्रवाह आणणारा महान वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांच्या निधनामुळे आपण गमावला आहे, अशा शब्दांत मु

न्यूज अपडेट: उलवे येथील विष्णूशेठ द्वारकानाथ पाटील यांचे दु:खद निधन!!

न्यूज अपडेट: उलवे येथील विष्णूशेठ द्वारकानाथ पाटील यांचे दु:खद निधन!! नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे) :- विष्णूशेठ द्वारकानाथ पाटील हे उलवे पंचक्रोशीत व्हि. डी. पाटील यानावाने सर्वत्र चर्चेत होते. पाटील कुटूंबांत त्यांचा खुप मोठा मान असायचा. आपल्या मतावर ठाम असलेले आणि जे बोलेले ते करुन दाखवणारे असे हे एकवचनी आणि दानशुर व्यक्तीमक्त होते. काही दिवसांपुर्वी पाटील यांची तब्येत थोडी खालावली गेली, त्यांना कफामुळे दम लागु लागला या आजारावर उपचार घेत असताना अचानक त्यांना कोविड १९ या महामारीने ग्रासले आणि विष्णूशेठ यांना नवी मुंबई सेक्टर १० सानपाडा येथील न्यु मिलेनियम ह्या कोविड सेंटर हॉस्पिटलात गुढीपाडव्याच्या दिनी भरती केले, त्यांच्यावर उपचार दरम्यान त्यांची रविवार दिनांक १८ एप्रिल रोजी प्राणज्योत मावळली. तेथील डॉक्टरांनी खुप शर्तीचे प्रयत्न केले शेवटी काळाने घाला घातलाच. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्मास चिरशांती देवो. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, दोन सुना आणि दोन नाती आणि असंख्य परिवार आहे. विष्णूशेठ यांच्या अकस्मात निधनाने पाटील परिवारावर कधी न भरुन येणारी

न्यूज अपडेट: जागतिक मलेरिया दिन - २५ एप्रिल २०२१..!!

न्यूज अपडेट: जागतिक मलेरिया दिन - २५ एप्रिल २०२१..!! नवी मुंबई (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :-  कोरोना संक्रमणामुळे भारतामध्ये मलेरिया आजाराविषयी वाढत आहे जनजागृती  गेल्या २० वर्षात मलेरिया रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असलेला भारत हा एकमेव देश मुंबई- मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी व त्याच्या नियंत्रणासाठी जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दरवर्षी २५ एप्रिल रोजी जगभरात " जागतिक मलेरिया दिन " पाळला जातो, परंतु आजच्या घडीला कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगासमोर ठाकले असून मलेरियासारख्या जीवघेण्या आजारावर  जनजागृती होत असल्याचे दिसत आहे. एकेकाळी कोरोना एवढी दहशत असलेला मलेरिया आजाराने मृत्युदर वाढताना  दिसत होते व आजही जगभरामध्ये मलेरिया आजारांमुळे होणारे मृत्यू थांबलेले नाहीत.  जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मलेरियाने आजही दर दुसऱ्या मिनिटाला एका मुलाचा मृत्यू होतो तर दरवर्षी  २० कोटी नागरिकांना मलेरियाचा संसर्ग होतो. याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व  फिजीशियन आणि इंटेंसिव्हिस्ट डॉ. प्रदीप शेलार  म्हण

न्यूज अपडेट: धाडसी दानशूर वीर मयूर शेळके:

न्यूज अपडेट: धाडसी दानशूर वीर मयूर शेळके: पनवेल (प्रतिनिधी) :- जीवन जगत असताना तुम्ही किती जगला या पेक्षा तुम्ही कसे जगला याला महत्व असते या उक्तीला सार्थक असे कृत्य सेन्ट्रल रेलवे चे कर्मचारी मयूर शेळके यांनी केले असे सर्वाना पाहायला मिळाले. सध्या सोशल मीडियावर गाजत असलेला मयूर शेळके यांचा वांगणी स्टेशन येथे रेलवे ट्रेक वर अडकलेल्या अंध आईच्या मुलाला वाचवताना चा व्हिडीओ वायरल होत आहे. या व्हिडीओ मधील मयूर शेळके यांचे धाडस आणि प्राणाची परवा न करता ट्रॅक वर धावत जाऊन लहान बालकाचे प्राण वाचवणे आणि त्याच वेळी समोर रेलवे वेगाने येत असताना चे चित्र थरकाप उडवणारे आहे. पण समोरील होणाऱ्या परिणामाची पर्वा न करता जीवाची बाजी लावणारे खूप कमी वीर असतात त्यापैकी एक शूरवीर म्हणजे  मयूर शेळके होय. मयूर शेळके हे सेन्ट्रल रेल्वे ला पॉइंट्समन या पदावर कार्य करतात. 17 तारखेला ते नेहमी प्रमाणे ड्युटी वर असताना प्लॅटफॉर्म वर एक अंध माता तिच्या बालकास घेऊन जात होती. त्यावेळी बालक आईचा हात सोडून चालताना तोल जाऊन  खाली  ट्रेक वर पडले. आणि त्याच वेळी समोरून वेगाने रेल्वे येत होती. हे चित्र ड्युटी वरील पॉइंट्सम

न्यूज अपडेट: नवी मुंबई पालिका क्षेत्रातील महागड्या वेग वेगळ्या कलाशिल्प केल्यामुळे जागरुक नागरिक नाखुश पण कलाप्रिय आनंदी:

न्यूज अपडेट: नवी मुंबई पालिका क्षेत्रातील महागड्या वेग वेगळ्या कलाशिल्प केल्यामुळे जागरुक नागरिक नाखुश पण कलाप्रिय आनंदी:  नवी मुंबई (प्रतिनिधी) :- नुकत्याच झालेल्या कालावधीत नवी मुंबई पालिके कडून विविध ठिकाणी कला शिल्प स्थापन करण्यात आले. नवी मुंबई पालिके कडून  नवी मुंबई पालिका क्षेत्रातील ऐरोली ते बेलापूर या पट्ट्या मधेय अनेक ठिकाणाचे जास्त रहदारी असलेले चौक सिग्नल आणि पदपथ यावर टाकाऊ वस्तूपासून तयार केलेले अनेक कला शिल्प लावण्यात आले. त्यापैकी पाम बीच मोराज सर्कल येथे लावण्यात आलेले  घोड्याचे कला शिल्प व त्याचा फोटो सोशल मीडिया वर अनेक ठिकाणी झळकला. त्याच प्रमाणे वाशी नेरुळ बेलापूर या ठिकाण वरील  कलाशिल्प हि चर्चेत आहेत.  या कला शिल्पा च्या स्थापने बद्दल नवी मुंबईतील नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहावयास मिळाल्या. त्यापैकी कला क्षेत्रात विशेष रुची असणारे नागरिक यांनी टाकाऊ वस्तू पासून recycle करून तयार  केलेले हे कलाशिल्प यास पसंती दर्शविली आणि या नाविन्यपूर्ण प्रकाराचे स्वागत केले. वाशी मधील कला प्रेमी आणि फिल्म दिग्दर्शक मिलिंद  कांबळे यांनी नवी मुंबई पालीकेचे  या उप्रक्रमाबद्

न्यूज अपडेट: पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार:

न्यूज अपडेट: पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार: पनवेल (प्रतिनिधी) :-  शहरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा दोन घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ आणि कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या पहिल्या घटनेत १७ वर्षीय मुली सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्यात आले. याविषयी कुठे वाच्यता केल्यास तुला बघून घेईल अशी धमकी आरोपीने दिली होती. परंतु पीडित मुलीने घरच्यांना माहिती दिल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी विकास उर्फ विकी हनुमंत फासगे (वय २२) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली. १६ वर्षीय मुलीसोबत ओळखीच्या एका तरुणाने जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. यातून ही मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर कोथरुड पोलिसांनी रवींद्र बाळू गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित र

न्यूज अपडेट: फुफ्फुसांच्या आरोग्य व जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट: सीएस डॉ. नीलकंठ भोसीकर:

न्यूज अपडेट: फुफ्फुसांच्या आरोग्य व जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट: सीएस डॉ. नीलकंठ भोसीकर: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- नागरिकांनी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात ६ मिनिटे चालण्याची चाचणी (Six Minutes Walk Test) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांनी केले आहे. सहा मिनिटे चालण्याच्या चाचणी बाबत अधिक जागरूकता निर्माण केेली जात आहे. यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल जेणे करून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल, असे डॉ.भोसीकर यानी सांगितले. चाचणी कोणी करावी- ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात. अशी करावी चाचणी- ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यांनतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात ६ मिनिटे चालावे (पायऱ्यांवर चालू नये). यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चा

न्यूज अपडेट: जिवाची पर्वा न करता रेल्वे रुळावर पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी पॉईंटमन धावला;वेगवान एक्स्प्रेस समोर असतानाही:

न्यूज अपडेट: जिवाची पर्वा न करता रेल्वे रुळावर पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी पॉईंटमन धावला;वेगवान एक्स्प्रेस समोर असतानाही: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- काळजाचा ठोका चुकवणारी वांगणी रेल्वे स्टेशनवरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पॉईंटमन मयूर शेळके यांच्या प्रसंगावधानाने रेल्वे रुळावर पडलेल्या एका चिमुकल्याचे प्राण वाचले. वांगणी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर एक अंध महिला शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास मुलासह चालत होती. याचवेळी, तो मुलगा प्लॅटफॉर्मच्या कडेला गेला आणि तोल जाऊन तो रेल्वे रुळावर पडला. एक्स्प्रेस ट्रेन अवघ्या काही सेकंदातच तिथे येणार होती. चिमुकला रेल्वे रुळावर पडल्याचं पॉईंटमन मयूर शेळके यांनी पाहिलं. एक्स्प्रेस समोर दिसल्याने क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मुलाच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला प्लॅटफॉर्वर घेतलं. अवघ्या काही सेकंदांनी मुलगा आणि पॉईंटमनचे प्राण वाचले.  पॉईंटमन मयूर शेळके यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वेगवान एक्स्प्रेसच्या दिशेने धाव घेत चिमुकल्याचे प्राण वाचवले. त्यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  महत्त्

न्यूज अपडेट: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन:

न्यूज अपडेट: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे नुकतेच पुण्यातीळ सह्याद्री रुग्णालयात निधन झाले आहे. त्या खूप दिवसांपासून आजारी होत्या असे वृत्त हाती येत आहे. त्यांच्या कासव चित्रपटाने ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कमळ पुरस्कार जिंकला होता. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीला खूप मोठी हानी झाली आहे.सुमित्रा भावे या मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक होत्या. त्यांनी एकूण सुमारे १४ चित्रपट, ५० हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिकांवर. या सर्व मालिकांचे लिखाण भावेंचे आहे. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन विषयात एम.ए केले. शिवाय त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची ग्रामविकास विषयाची पदविका मिळविलेली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनाम

न्यूज अपडेट: जनतेसाठी एक दिलासा देणारी शक्यता तज्ज्ञांकडून; महाराष्ट्रात करोना रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता कमी, कारण…!!

न्यूज अपडेट: जनतेसाठी एक दिलासा देणारी शक्यता तज्ज्ञांकडून; महाराष्ट्रात करोना रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता कमी, कारण…!! ● समजुन घेऊया महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढीसंदर्भातील आकडेवारी नक्की काय सांगतेय?? नवी मुंबई (प्रतिनिधी) :- मागच्या काही दिवसांपासून देशातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यातही महाराष्ट्रातील दैनंदिन रुग्णसंख्या ६० हजारांच्या आसपास आहे. मागील अनेक दिवसांपासून याच आकडेवारीच्या आजूबाजूला महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आहे. एकीकडे ही आकडेवारी धडकी भरवणारी असली तरी दुसरीकडे या आकडेवारीच्या आधारे महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलासा देणारी शक्यताही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय. ६० हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर झालेली असल्याने महाराष्ट्रामध्ये करोना लाटेचा कळस म्हणजेच कोव्हिड वेव्हचा पिक अर्थात उच्चांक गाठल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती ही महाराष्ट्रासाठी वाईटातून चांगलं अशी आहे. गुरुवारी महाराष्ट्रामध्ये ६१ हजार ६९५ नवे रुग्ण आढळून आले. सध्याच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या ही ६३ हजार २९४ इतकी आहे. मा

न्यूज अपडेट: आज मध्यरात्रीपासून नवीन नियम; नक्की काय असणार निर्बंध..??

न्यूज अपडेट: आज मध्यरात्रीपासून नवीन नियम; नक्की काय असणार निर्बंध..?? नवी मुंबई (प्रतिनिधी) :- जगभरात कोरोनाच्या थैमानमुळे लोकांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. या कारणामुळे आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. ती काय आहे हे समजून घ्या आणि त्याचे पालन करा. वेळेच्या निर्बंधासह चालू असलेल्या बाबी- ■ किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ ■ दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११ ■ भाजीपाला विक्री(फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११ ■ फळे विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११ ■ अंडी,मटण, चिकन,मासे विक्री सकाळी ७ ते ११ ■ कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी ७ ते ११ ■ पशूखाद्य विक्री सकाळी ७ ते ११ ■ पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरिता पेट्रोल/डिझेल/ सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सकाळी ७ ते ११ ■ पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा/ मालवाहतूक याकरिता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार या बाबींचे जनतेने पालन करावे- ● हॉटेल, रेस्टॉरंट,बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलिव्हरी चालू राहील. ●  धार्मिक स्थळे पूर्णतः बंद राहतील. ● आठवडे बाजार पूर्णतः बंद रा

न्यूज अपडेट: केंद्र सरकारचा मोठा निर्णय १ मे पासून १८ वर्षावरील लोकांसाठी लसीकरण:

न्यूज अपडेट: केंद्र सरकारचा मोठा निर्णय १ मे पासून १८ वर्षावरील लोकांसाठी लसीकरण: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- आज देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता देशात करोना व्हायरसवरील लस १८ वर्षांवरील प्रत्येकाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे . तसेच, मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने १ मे पासून लसीकरण सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. ज्यामध्ये १८ वर्षांवरील सर्व लोकांना कोरोनची लस घेण्यास पात्र ठरवण्यात आले आहे . परंतु याआधी ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकराने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

न्यूज अपडेट: ऑक्सिजनचा पुरवठ्यासाठी रेल्वे सज्ज; कळंबोली , बोईसर येथून आज वाहतुकीस सुरुवात:

न्यूज अपडेट: ऑक्सिजनचा पुरवठ्यासाठी रेल्वे सज्ज; कळंबोली, बोईसर येथून आज वाहतुकीस सुरुवात: पनवेल (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे) :- देशातील ऑक्सिजनची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी आता ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेच्या माध्यमातून केला जाणार आहे. महत्त्वाच्या मार्गिकांवर द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू अर्थात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज झाली आहे. रेल्वेच्या माध्यमातून विशेष ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरू केली जाणार असून, त्यातून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक केली जाणार आहे. रेल्वेच्या माध्यमातून आज ही माहिती देण्यात आली आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसला मुंबईजवळील कळंबोली आणि बोईसर रेल्वे स्थानकातून आज सुरुवात होईल आणि ही ऑफ ऑक्सिजन एक्स्प्रेस विजाग जमशेदपूर रौर्केला आणि बोकारो येथे वैद्यकीय द्रवरूप ऑक्सिजन पोहोचतील.  मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरकारने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टॅकर्स रेल्वेने नेता येऊ शकतील का याची चाचपणी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला होता. रेल्वेने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन वाहतुकीची तातडीने तांत्रिक व्यवहार

न्यूज अपडेट: शिवसेनेचे उरणमध्ये महारक्तदान शिबिर 150 जणांनी केलं रक्तदान:

न्यूज अपडेट: शिवसेनेचे उरणमध्ये महारक्तदान शिबिर 150 जणांनी केलं रक्तदान: उरण (प्रतिनिधी/सुनिल ठाकुर) :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत उरण तालुक्यातील शिवसेना युवासेना नवघर चिरनेर जासई विभागाच्या वतीने सद्गुरू चॅरिटेबल ब्लड बँक कोपरखैरणे यांच्या सहयोगाने महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. जे एन पी टी वसाहतीत भरवलेल्या या शिबीरात 150 जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले.  तत्पूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख  माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी. एन. डाकी, यांच्या उपस्थितीत शिबिराचे उदघाटन करण्यात आले.  शिबिराला जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, हिराजी घरत, कामगार नेते महादेव घरत, गणेश म्हात्रे,गणेश घरत, रुपेश पाटील, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, अमित भगत, गणेश घरत, कृष्णा घरत,(उप.ता.संघटक) विभाग प्रमुख संदेश पाटील, भूषण ठाकूर, विश्वास तांडेल, शिक्षकसेनेचे कौशिक ठाकूर, युवासेन