न्यूज अपडेट: महानगरपालिका हद्दीतील दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यत उघडी राहणार:
पनवेल (प्रतिनिधी/किरण पवार) :- पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये वाढत असलेली रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे निर्बंध लागू करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या नव्या आदेशाप्रमाणे पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व किराणा मालाची दुकाने , भाजीपाला, दुकाने, फळ विक्रते, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी (मिठाई), सर्व खाद्य दुकाने( कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी) कृषी अवजारे तसेच कृषी उत्पादनांशी संबधित दुकाने ,पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थाची दुकाने ,वैयक्तिक तसेच आस्थापनांसाठी पावसाळ्यांपूर्वी करण्यात येणाऱ्या कामाकरीता लागणारी साधनसामुग्री संबधित दुकाने फक्त सकाळी 7.00 ते 11.00 वाजेपर्यंत उघडी राहतील.
या सर्व दुकानातून कोरोनाच्या नियमांचे पालन करून होम डिलिव्हरी अर्थात घरपोच सेवा सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या कालावधीमध्ये करण्यास परवानगी राहील. या निर्बंधाशिवाय बाकी सर्व निर्बंध पूर्वी दिलेल्या राज्य शासनाच्या आदेशा प्रमाणेच राहणार आहेत.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.