Skip to main content

न्यूज अपडेट: मराठी चित्रपट श्रुष्टीवर शोककळा; चतुरस्र श्रेणीचा अभिनेता किशोर नांदलस्कर काळाच्या पडद्याआड:

न्यूज अपडेट: मराठी चित्रपट श्रुष्टीवर शोककळा; चतुरस्र श्रेणीचा अभिनेता किशोर नांदलस्कर  काळाच्या पडद्याआड:

नवी मुंबई (प्रतिनिधी/दीपा वाघमारे) :- मराठी चित्रपट श्रुष्टीवर शोककळा..चतुरस्र श्रेणीचा अभिनेता काळाच्या पडद्याआड. कोरोना महामारी आपल्यातून अनेक दिग्गजांना घेऊन जात आहे. या महामारी ने आजवर अनेकांनी आपल्या आप्तांना गमावले आहे. ही म’हामा’री कधी संपेल याचीच वाट सगळे पाहत आहेत. गेले वर्ष आणि चालू वर्ष हे मराठी चित्रपटसुर्ष्टी बॉलिवूड-हॉलिवूड आणि इतर चित्रपटसृष्टीसाठी अतिशय वेदनादायी आणि धक्कादायक असे राहिलेले आहे. कोरोना महामारी मुळे अनेक दिग्गज आपल्यातून निघून गेले आहेत. या महामारीमुळे गेल्या अनेक दिवसापासून चित्रपटाचे चित्रीकरण हे खोळंबले आहे. यातच अनेकांना रोजगार देखील मिळत नाही. त्यामुळे अनेक जण खचून गेले आहेत. लसीकरण देखील सध्या जोरदार सुरू आहे. मात्र, ल’सीक’रणचा प्रभाव अजून तरी दिसत नाही.

मात्र, कालांतराने हे चित्रीकरण सुरू करण्यात आले आहे. चित्रीकरण सुरू करताना कोरोनाचे सर्व निय’म पाळण्याचे निर्देश सर कारने दिलेले आहेत. अनेक मालिका हे निर्देश पाळत आहेत. असे असले तरी काहीजणांना चित्रीकरण करताना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातूनच काही महिन्यापूर्वी एका दिग्गज अभिनेत्रीचे कोरोना महामारी ने निधन झाले होते.

आज दुपारी १२.३० वा. ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे को’रोनाने नि’धन झाले. ठाण्यातील रु’ग्णाल’यात त्यांना दा’खल करण्यात आलं होतं. मंगळवारी दुपारी त्यांनी रु’ग्णाल’यात अ’खेर’चा श्वा’स घेतला. किशोर यांनी आतापर्यंत सुमारे ४० नाटकं, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमध्ये काम केलंय. काही दिवसांपासून किशोर नांदलस्कर यांच्यावर उपचार सुरु होते. त्याचबरोबर त्यांची बायपास सर्जरी झाल्याचे देखील त्यांच्या एका निकटवर्तीयांनी सांगितले.


‘हळद रुसली कुंकू हसली’, ‘शेजारी शेजारी’, ‘सारे सज्जन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘वन रुम किचन’, ‘भ्रमाचा भोपळा’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटातून नांदलस्कर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. महेश मांजरेकर यांच्या जिस देश मे गंगा रहता हे या चित्रपटात त्यांनी ‘सन्नाटा’ अभिनय केला होता. याच चित्रपटामुळे किशोर नांदलस्कर पूर्ण देशात फेमस झाले होते.

किशोर नांदलस्कर यांचा मुंबईत ज’न्म झाला होता. मुंबईतील लॅमिंग्टन रोड, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचं लहानपण गेलं. त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडूनच त्यांना अभिनयाचा वारसा मिळाला होता. लहानपणापासूनच नांदलस्कर यांना अभिनयाचं वेड लागलं होतं.

एक दिवस त्यांनी वडिलांना मलाही नाटकात काम करायचं आहे, असं सांगितलं. वडिलांनीही होकार दिला आणि १९६०-६१ च्या सुमारास सादर झालेल्या ‘आमराई’ या नाटकात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. नंतर ते नोकरी करत नाटकात काम करत होते.

नांदलस्कर यांनी अनेक वर्षे अभिनयविश्वात काम करूनही त्यांना छोट्या छोट्या भूमिकाच मिळत गेल्या. मात्र त्यांच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी जीव ओतून साकारली. प्रत्येक भूमिकेवर त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आणि म्हणूनच ती आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.


त्याच्या हा किस्सा आहे प्रसिद्ध

किशोर नांदलस्कर याचा मुंबई चित्रपटसृष्टीत सर्वाधिक प्रसिद्ध असलेला किस्सा असा आहे कि, सुरुवातीच्या काळातते ते आपल्या घरा शेजारी असलेल्या मंदिरात झोपत असे. त्यांच्या कुटुंबात जास्त सभासद असल्यामुळे ते मंदीराच्या आवारात झोपत असत. हे कुणी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सांगितले तेव्हा देशमुख यांनी त्यांच्यासाठी तातडीने घराची व्यवस्था केली. जेव्हा त्यांना मंत्रालयात आपल्या नवीन फ्लॅटची चावी मिळाली तेव्हा ते भावनिक होऊन रडू लागले होते.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे