न्यूज अपडेट: धाडसी दानशूर वीर मयूर शेळके:
पनवेल (प्रतिनिधी) :- जीवन जगत असताना तुम्ही किती जगला या पेक्षा तुम्ही कसे जगला याला महत्व असते या उक्तीला सार्थक असे कृत्य सेन्ट्रल रेलवे चे कर्मचारी मयूर शेळके यांनी केले असे सर्वाना पाहायला मिळाले. सध्या सोशल मीडियावर गाजत असलेला मयूर शेळके यांचा वांगणी स्टेशन येथे रेलवे ट्रेक वर अडकलेल्या अंध आईच्या मुलाला वाचवताना चा व्हिडीओ वायरल होत आहे. या व्हिडीओ मधील मयूर शेळके यांचे धाडस आणि प्राणाची परवा न करता ट्रॅक वर धावत जाऊन लहान बालकाचे प्राण वाचवणे आणि त्याच वेळी समोर रेलवे वेगाने येत असताना चे चित्र थरकाप उडवणारे आहे. पण समोरील होणाऱ्या परिणामाची पर्वा न करता जीवाची बाजी लावणारे खूप कमी वीर असतात त्यापैकी एक शूरवीर म्हणजे मयूर शेळके होय. मयूर शेळके हे सेन्ट्रल रेल्वे ला पॉइंट्समन या पदावर कार्य करतात. 17 तारखेला ते नेहमी प्रमाणे ड्युटी वर असताना प्लॅटफॉर्म वर एक अंध माता तिच्या बालकास घेऊन जात होती. त्यावेळी बालक आईचा हात सोडून चालताना तोल जाऊन खाली ट्रेक वर पडले. आणि त्याच वेळी समोरून वेगाने रेल्वे येत होती. हे चित्र ड्युटी वरील पॉइंट्समन मयूर शेळके यांनी पाहिले आणि कसलाच विचा न करता स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता ट्रॅक वर धावत जाऊन त्या अंध आईच्या निरागस बालकाला उचलून वरती ठेवले. आणि काही सेकंदाचा कालावधी असताना समय सुचकता आणि धाडस दाखवून स्वतः प्लॅटफॉर्म वर चढले. हे अंगावर रोमांच उडवणारे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आणि ही क्लिप सर्व सोशल मिडिया वर व्हायरल झाली.
या धाडसी कार्याबद्दल सेंट्रल रेल्वे ने मयूर शेळके यांना 50 हजार रुपये बक्षीस दिले. या वेळी त्या रकमेतील ही 25 हजार दानशूर मयूर शेळके यांनी त्या अंध मातेला मदत म्हणून दिली. मयूर शेळके यांची ही दानशूर वृत्ती पाहून जावा मोटार सायकल कंपनी ने त्यांना नवी कोरी मोटर बाईक त्यांना भेट दिली. मयूर शेळके यांच्या या दानशूर कृती मुळे सर्व स्तरात मयूर शेळके यांची प्रशंसा होत आहे आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मला दिसत नसले तरीही मी आज माणसातला देव मयूर शेळके यांच्या धाडसी व दानशूर कृतीतून पाहिला अशी भावना त्या अंध मातेने व्यक्त केली.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.