न्यूज अपडेट: केंद्र सरकारचा मोठा निर्णय १ मे पासून १८ वर्षावरील लोकांसाठी लसीकरण:
नवी मुंबई (प्रतिनिधी) :- आज देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता देशात करोना व्हायरसवरील लस १८ वर्षांवरील प्रत्येकाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे .
तसेच, मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने १ मे पासून लसीकरण सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. ज्यामध्ये १८ वर्षांवरील सर्व लोकांना कोरोनची लस घेण्यास पात्र ठरवण्यात आले आहे .
परंतु याआधी ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकराने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.