Skip to main content

न्यूज अपडेट: उलवे येथील विष्णूशेठ द्वारकानाथ पाटील यांचे दु:खद निधन!!

न्यूज अपडेट: उलवे येथील विष्णूशेठ द्वारकानाथ पाटील यांचे दु:खद निधन!!

नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे) :- विष्णूशेठ द्वारकानाथ पाटील हे उलवे पंचक्रोशीत व्हि. डी. पाटील यानावाने सर्वत्र चर्चेत होते. पाटील कुटूंबांत त्यांचा खुप मोठा मान असायचा. आपल्या मतावर ठाम असलेले आणि जे बोलेले ते करुन दाखवणारे असे हे एकवचनी आणि दानशुर व्यक्तीमक्त होते. काही दिवसांपुर्वी पाटील यांची तब्येत थोडी खालावली गेली, त्यांना कफामुळे दम लागु लागला या आजारावर उपचार घेत असताना अचानक त्यांना कोविड १९ या महामारीने ग्रासले आणि विष्णूशेठ यांना नवी मुंबई सेक्टर १० सानपाडा येथील न्यु मिलेनियम ह्या कोविड सेंटर हॉस्पिटलात गुढीपाडव्याच्या दिनी भरती केले, त्यांच्यावर उपचार दरम्यान त्यांची रविवार दिनांक १८ एप्रिल रोजी प्राणज्योत मावळली. तेथील डॉक्टरांनी खुप शर्तीचे प्रयत्न केले शेवटी काळाने घाला घातलाच. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्मास चिरशांती देवो. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, दोन सुना आणि दोन नाती आणि असंख्य परिवार आहे. विष्णूशेठ यांच्या अकस्मात निधनाने पाटील परिवारावर कधी न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

विष्णूशेठ यांची दशक्रिया विधी ही मंगळवारी २७ एप्रिल रोजी श्री. श्रेत्र लांगेश्र्वर मोरावे तर उत्तरकार्य विधी गुरुवारी २९ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरी उलवे सेक्टर २१, भुखंड क्रमांक- ६,७,८ आय. आर. एस. टॉवर मधे होणार आहे, तरी पाटील परिवाराचे ज्यांना सात्वंन करायचे असेल त्यांनी कोणत्याही प्रकारचे दुखवटे आणू नये शिवाय प्रत्येकाने मास्क आणि सोशल डिस्टंसींगचा पालन करायचे आहे असे निलेश विष्णू पाटील यांनी आवाहन केले आहे.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे