न्यूज अपडेट: लॉक डाऊन मुळे कोरोनाला बसली खीळ.. !!
नवी मुंबई (प्रतिनिधी/प्रतिक यादव) :- महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वी जाहीर केलेल्या लॉक डाऊन मुळे नवी मुंबई पालिका प्रशासनास कोरोना वाढी वरती नियत्रंण मिळवल्यास काही प्रमाणात यश आलेले आहे असे चित्र दिसत आहे. त्यातच नवी मुंबई पालिका क्षेत्रा तील नागरिक हि नवीन लॉक डाउन चे शिस्त बद्ध रीतीने पालन करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असला तरीही नागरिकांची वर्दळ अत्यंत नगन्य स्वरूपाची असल्या मुळे नवी मुंबई पोलीस प्रशासन हि निश्चिन्त असल्याचे वातावरण आहे.
दररोज सायंकाळी पालिका प्रशासन कडून दैनंदिन कोरोना अहवाल दिला जातो या अहवाला मध्ये कोरोना पॉजिटीव्ह ची संख्या ६७५ होती आणि मागील आठवड्यात हजारच्या वर असणारी संख्या पाहता आताच हा आकडा निश्चितच दिलासा देणारा आहे. आणि त्याच प्रमाणे कोरोना मृत्यू दरही नगण्य आहे. यातील ऐरोली, घणसोली आणि बेलापूर येथील कोविड सेंटर मध्ये जास्त रुग्ण आहेत. जर याच पद्धतीने हि आकडेवारी कमी होत राहिली तर नवी मुंबई पालिका लवकरच कोरोना वर कडक नियंत्रण प्राप्त करेल यात अजिबात शंका नाही. वरील चित्र पाहून नवी मुंबई तील अनेक नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला अशी भावना नवी मुंबईकर नागरिकांनी व्यक्त केली.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.