Skip to main content

न्यूज अपडेट: कोरोना काळात काळजी घ्या..नियम पाळा: डॉ. प्रतिक तांबे यांचे मार्गदर्शन शिबिर:

न्यूज अपडेट: कोरोना काळात काळजी घ्या..नियम पाळा: डॉ. प्रतिक तांबे यांचे मार्गदर्शन शिबिर:

● नवी मुंबई येथील महापे एम.आय.डी.सी मधील डोविएर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथील कर्मचारी व अधिकारी यांना डॅा.प्रतिक तांबे यांचे मार्गदर्शन.

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सोशल मीडियावर येत असणाऱ्या बातम्या,त्यात धास्तावलेले परंतु तरीही कामावर जाणारे कर्मचारी,अधिकारी यांना कोरोनाची सद्यस्थिती, कोरोना उपचार, लसीकरण, आहार, रक्तदान याबाबत डॅा.प्रतिक प्रभाकर तांबे यांनी  डोविएर इंडिया प्रा.लि. कंपनी मधील कर्मचारी व अधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. तांबे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती, यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाबाबत, तसेच कोरोना काळात आपली व कुटुंबाची कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.


ताप, सर्दी, खोकला, थकवा, दम लागणे, डोकेदुखी, जुलाब अथवा इतर कोणत्याही शारीरिक समस्या उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तसेच जर डॉक्टरांनी कोरोना ची चाचणी करावयास सांगितली तर ती तपासणी लगेच करून, जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत घरातच विलगीकरणात राहणे, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आपल्या विभागातील शासकीय वैद्यकीय अधिकारी अथवा फॅमिली डॉक्टरांशी संपर्क करून डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे विलगीकरण कक्षात अथवा हॉस्पिटलमध्ये लगेच दाखल झाल्यास लवकर उपचार सुरू होऊन रुग्ण लवकर बरा होतो याबाबत सांगितले. या दरम्यान सकस आहार, योगा, सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे हे ही सांगितले. 


मार्गदर्शन झाल्यानंतर कंपनीमधील अनेक अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना बाबत अनेक शंका, प्रश्न विचारले यावर डॉ. तांबे यांनी सर्व शंकांचे निरसन करून मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, गर्दीत जाणे टाळणे याची सवय लावून घेणे आता आयुष्यभर गरजेचे आहे हे सांगितले. हे मार्गदर्शन शिबिर यशस्वी होण्यासाठी डोविएर कंपनीचे एच.आर.श्री.सुरेश शिंदे, श्री.हर्षल गोर, श्री.प्रितेश बरे, श्री.रोहीत खरात, श्री.राकेश घोळे, श्री.नरेश शेलवले, श्री.प्रदिप शेटकर यांनी पुढाकार घेतला.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे