Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

न्यूज अपडेट: १५ जून पर्यंत राज्यात लॉकडाऊन नसून कडक निर्बंध कायम:

न्यूज अपडेट: १५ जून पर्यंत राज्यात लॉकडाऊन नसून कडक निर्बंध कायम: नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- राज्यात असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन आणखी १५ दिवसांसाठी वाढवला आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन हा आता १५ जूनपर्यंत असणार आहे. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्र्यांनी लाईव्हच्या माध्यमातून जनतेला दिली. मे महिन्यात काही ठिकाणी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली तर काही ठिकाणी रुग्णवाढ झाली. त्यानुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. तसेच ज्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे त्या भागातील निर्बंध आणखी कडक करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. कोरोनाबाधित रुग्णांनाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल- ■ महाराष्ट्रातील ज्या क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर १० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या क्षेत्रात खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.  ■ सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी

न्यूज अपडेट: राज्यात लॉकडाउनचे नवीन नियम लागू..काय निर्बंध असतील जाणून घेऊ..??

न्यूज अपडेट: राज्यात लॉकडाउनचे नवीन नियम लागू..काय निर्बंध असतील जाणून घेऊ..?? नवी मुंबई (प्रतिनिधी) :- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तर धोका टळलेला नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. या कालावधीत काही बाबींमध्ये सूट देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता यासाठी वेगळी प्रशासकीय यंत्रणा असणार आहे. या भागातील नियमावली त्या त्या भागातील प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार कार्यरत असणार आहे. तर २९ मे पर्यंतचा कोरोनाची आकडेवारी ग्राह्य धरली जाणार आहे. पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता पाहून पुढच्या १५ जूनपर्यंतची नियमावली आखली जाईल. ● पॉझिटीव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे आणि पालिकांसाठी खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील* ● अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी ● सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुक

न्यूज अपडेट: काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शने; जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी नोंदवला निषेध..।।

न्यूज अपडेट:  काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शने; जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी नोंदवला निषेध..।। ● भारतीय जनता पक्षाने (भाजपा) केंद्रात सात वर्षे सत्ता स्थापन केल्यामुळे, इंधन दरवाढीबाबत आणि कोविड -१९ च्या व्यवस्थापनाच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला नवी मुंबई (रूपाली वाघमारे) :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. सात वर्षाच्या काळात मोदी सरकारने जनतेची निव्वळ दिशाभूल केलेली आहे. याचाच निषेध म्हणून नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वात ठिकाणी आंदोलने करण्यात आली. वाशी येथील काँग्रेस भवन बाहेर कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत मोदी सरकारचा निषेध केला.  सात वर्षात ना केला विकास मोदींनी केला देश भकास असं म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  तसेच, नवी मुंबईतील नेरूळ तालुका जनसंपर्क पक्ष कार्यालया समोर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र  मोदी व केंद्राच्या विरोधात निषेध व्यक्त केला. वाढती महागाई आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा निषेधार्थ काँग्रेसच्या

न्यूज अपडेट: कामोठ्यात महिलांसाठी कोरोनाची तिसऱ्या लाटेत मुलांची काळजी कशी घ्यावी या विषयावर ॲानलाईन मीटिंग:

न्यूज अपडेट: कामोठ्यात महिलांसाठी कोरोनाची तिसऱ्या लाटेत मुलांची काळजी कशी घ्यावी या विषयावर ॲानलाईन मीटिंग: पनवेल (प्रतिनिधी) :- दिनांक ३० मे रोजी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सलग सात वर्ष पूर्ण केले असुन त्यानिमित्त "भारतीय जनता पार्टी कामोठे" च्या वतीने कामोठ्यातील नागरिकांच्या विशेषत: महिलांच्या साठी कोरोनाची तिसरी लाट व माझ्या मुलांची काळजी ह्या महत्त्वपूर्ण विषयावर कामोठ्यातील सुप्रसिद्ध, सुपरिचित व नामांकित बालरोगतज्ञ डॅाक्टर शैलेश काबरा यांचे ॲानलाईन समुपदेशन संध्याकाळी ४ वाजता आयोजित केले असुन कामोठ्यातील जास्तीत जास्त महिलांनी सदर व्हर्चुअल बॅठकीत आपली उपस्थिती लावावी व आपल्या लहान मुलांची काळजी कशी घ्यावी हे समजून घ्यावे ही नम्र विनंती. काही महत्वाच्या सूचना- १) बॅठकीची लिंक ही ३० तारखेला सकाळी ११ वाजता पाठवण्यात येईल २) त्या अगोदर आपल्या मोबाईल मध्ये वेबेक्स मीटिंग चे ॲप्लीकेशन प्लेस्टोर मध्ये जाऊन डाऊनलोड करावे ३) मीटिंग मध्ये तज्ञ डॅाक्टरांच्या मार्गदर्शना नंतर काही महिला त्यांना समस्या व प्रश्न देखील विचारू श

न्यूज अपडेट: कोव्हीडच्या नव्या रुग्णांची रवानगी इंडिया बुल्स मध्ये..!!

न्यूज अपडेट: कोव्हीडच्या नव्या रुग्णांची रवानगी इंडिया बुल्स मध्ये..!! पनवेल (प्रतिनिधी/प्रदीप पाटील) :- शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील नवीन कोरोना रूग्णांचे गृहविलगीकरण (होमआयसोलेशन) न करता त्यांना आरोग्य यंत्रणेमार्फत इंडिया बुल्स या क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे. या आधी कोरोनाच्या सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांचे गृह विलगीकरण केले जात होते परंतू शासन आदेशानूसार कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी नवीन कोरोना रूग्णांना  गृहविलगीकरण करण्याऐवजी क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे. यानूसार पनवेल महानगरपालिकेने इंडिया बुल्स येथे आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा वाढविल्या आहेत. तसेच वैद्यकिय आरोग्य विभागाकडून आवश्यक डॉक्टर्स, नर्स, औषधे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच आता यापुढे वैद्यकिय आरोग्य विभागाच्या ट्रेसिंग टीम,  मोबाईल टीम मधील कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी ,शिक्षक यामार्फत रुग्णांना इंडिया बुल्स येथे संदर्भित करण्याची कारवाई करण्याचे आदेश माननीय आयुक्त श्री. सुधाकर देशमुख यांनी निर्गमित केले आहेत. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या,

न्यूज अपडेट: आता उठसुठ कोरोना चाचणी करता येणार नाही; राज्य सरकारच्या नव्या सूचना:

न्यूज अपडेट: आता उठसुठ कोरोना चाचणी करता येणार नाही; राज्य सरकारच्या नव्या सूचना: नवी मुंबई (प्रतिनिधी) :-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशासह राज्यात अक्षरशः थैमान घातले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अनेक रुगांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता राज्य सरकारने विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली असून तज्ज्ञांनी वर्तवलेल्या तिसऱ्या लाटेचा धोका वेळीच ओळखून परिथिती आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. याबाबत उठसुठ कोणालाही कोरोना चाचणी करता येणार नाही, असं भाष्य राजेश टोपे यांनी केलं आहे. ‘राज्यात उठसूट कुणाचीही कोरोना चाचणी करणं आता पूर्णपणे बंद करण्यासाठीच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हाय रिस्क आणि कमी धोका असलेल्या व्यक्तींच्याच कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी कोरोना चाचण्या केल्यानं पॉझिटिव्हीटी रेटवर परिणाम होत

न्यूज अपडेट: श्री रामशेठ ठाकुर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने हातावर पोट असलेल्या गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप:

न्यूज अपडेट: श्री रामशेठ ठाकुर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने हातावर पोट असलेल्या गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप: पनवेल (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमी वर लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी व श्री रामशेठ ठाकुर सामाजिक विकास मंडलाच्या वतीने गरीब गरजू व हातावर पोट असणा-या कामोठ्यातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे कामोठे आदिवासी वाडी, एम जी एम कातकरी वाडी, खांदेश्वर स्टेशन झोपडपट्टी व मानसरोवर स्टेशन रोड झोपडपट्टी येथे वाटप करण्यात आले. त्यावेळी पनवेल महानगरपालिका आरोग्य सभापती डॅा. अरूण कुमार भगत, नगरसेवक श्री दिलीप पाटील, मा. महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ. कुसुम ताई म्हात्रे, नगरसेवक विकास घरत, नगरसेवक गोपीनाथ भगत, नगरसेवक श्री विजय चिपळेकर,नगरसेविका सौ. अरूणा प्रदीप भगत, नगरसेविका सौ संतोषी संदीप तुपे, ओबीसी मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीस श्री राजेश गायकर, प्रभाग क्रमांक ११ चे अध्यक्ष श्री प्रदीप भगत, कामोठे मंडल महिला मोर्चा अध्यक्षा सौ वनिता दिलीप पाटील,कामोठे मंडल महामंत्री श्री सुशील कुमार शर्मा, श्री संदीप तुपे व

न्यूज अपडेट: कोरोना संक्रमण आटोक्यात येईपर्यंत उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांनी स्वताची काळजी घेणे गरजेचे..!!

न्यूज अपडेट: कोरोना संक्रमण आटोक्यात येईपर्यंत उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांनी स्वताची काळजी घेणे गरजेचे..!! ■ लॉकडाउन काळामध्ये  फॅमिली डॉक्टरांचा घ्या नियमित सल्ला ■ राष्ट्रीय उच्च रक्तदाब जागरूकता महिना       ठाणे (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- भारतामध्ये कोरोनाची लाट आल्यानंतर कोरोना व्यतिरिक्त इतरही गंभीर आजार आहेत याचा बहुसंख्य नागरिकांना बहुदा विसर पडत चालला आहे  कारण कोरोना महामारीमुळे होणाऱ्या नुकसानाची दाहकता आपण सर्वजण बघतच आहोत. आपल्याला कोरोनाशी तर लढायचं आहे परंतु इतर जीवघेण्या आजारांवर सुद्धा आपले ध्यान वळवले पाहिजे. अगदी चोरपावलांनी आपल्या शरीरात नकळत प्रवेश करणारा उच्च रक्तदाब या आजाराची जागरूकता करण्यासाठी जगातील अनेक आरोग्य संघटना मे  महिना हा राष्ट्रीय उच्च रक्तदाब जागरूकता महिना साजरा करतात परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे या व्याधींकडे अनेकांचे दुर्लक्ष झाले असून उच्च रक्तदाब आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाची जास्त भीती असल्यामुळे त्यांनी याबाबत दक्ष राहणे महत्वाचे आहे.  याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संच

न्यूज अपडेट: बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून हिंदू भंडारी युवकाचे बौद्ध धम्मात पदार्पण:

न्यूज अपडेट: बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून हिंदू भंडारी युवकाचे बौद्ध धम्मात पदार्पण: नवी मुंबई (प्रतिनिधी/उमेश खांदेकर) :- वैशाखी बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून हिंदू धर्मातील भंडारी जातीच्या युवकाने शेकडो समुदायासमोर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, पूज्य भदंत संघप्रिय व पूज्य भदंत शिलबोधी यांनी धम्माची दीक्षा दिली. 30 वर्षीय हिंदू धर्मातील भंडारी जातीच्या श्री. किरण राघु तिरवडेकर नामक युवकाने हिरानंदानी मुंबई येथील जयभीम नगर बुद्ध विहारात धम्मदीक्षा घेतली.  हिंदू धर्मातील जुनाट रूढी परंपरा व बुरसटलेल्या विचारापासून मूलतः चिडलो होतो, लहान पनापासून ते तारुण्यापर्यंत  ग्रासून गेलो होतो, मात्र: धर्मांतर करून विज्ञानाची कास धरू शकतो हे मित्रांकडून माहिती झाले म्हणून बुद्ध धम्म आणि संघाच्या वाटेवर मी मार्गक्रमन करत असल्याची प्रतिक्रिया धर्मांतरित किरण ने आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली. मालवणच्या किरण तिरवडेकर ने बौद्ध धम्मात प्रवेश केल्याने त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत असून असंख्य बौद्ध धम्मीयांनी रोटी बेटी व्यवहार करण्याचे बोलून दाखविले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे रा

न्यूज अपडेट: बालरूग्णालयांना पालकमंत्री आदिती तटकरेंनी दिली भेट..!!

न्यूज अपडेट: बालरूग्णालयांना पालकमंत्री आदिती तटकरेंनी दिली भेट..!! पनवेल (प्रतिनिधी/किरण पवार) :- कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पनवेल शहरातील डॉ.भांडारकर रुग्णालय, डॉ.नाडकर्णी  रुग्णालय, डॉ.बिरमुळे रुग्णालयांना भेटी देऊन तेथील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले, उपायुक्त संजय शिंदे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, तहसिलदार विजय तळेकर, डॉ भोईटे, डॉ.पंडित, डॉ. जाधव उपस्थित होते. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना फारसा धोका उद्भवण्याची शक्यता नसली तरी देखील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आराखडा आखणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी बालरोग तज्ञ  डॉ.भांडारकर, डॉ.नाडकर्णी , डॉ.बिरमुळे यांच्याशी आगामी नियोजनाच्या दृष्टीने चर्चा केली. लहान मुलांमध्ये आढळून येणारी लक्षाणे,  कमी-अधिक स्वरुपाच्या लक्षणानुसार लहान मुलांवर करण्यात येणाऱ्या उपचाराविषयी त्यांनी माहिती घेतली. प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना पुरेसे ऑक्सीजन बेड्स, आयसीयू बेडस्, पिडियाड्रिक व्ह

न्यूज अपडेटे : वर्षावरील दिव्यांग व ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना विनाटोकन लसीकरणाची सुविधा:

न्यूज अपडेटे : वर्षावरील दिव्यांग व ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना विनाटोकन लसीकरणाची सुविधा: पनवेल (प्रतिनिधी/प्रांजल नाथ) :- पनवेल महानगरपालिकेने ४५ वर्षाहून अधिक वयाचे दिव्यांग बांधव व ६० वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिक यांना पनवेल महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर सायंकाळी ४.०० वाजता विनाटोकन लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरी पनवेल महानगरपालिका हद्दीतील संबंधित दिव्यांग बांधवांनी व जेष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त श्री.सुधाकर देशमुख यांनी केले आहे. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

न्यूज अपडेट: विमल आणि मुरजी याद रख, तुझी माझ्याशी गाठ आहे. :- पँथर डॉ. राजन माकणीकर:

न्यूज अपडेट: विमल आणि मुरजी याद रख, तुझी माझ्याशी गाठ आहे. :- पँथर डॉ. राजन माकणीकर: नवी मुंबई (प्रतिनिधी/नीलेश भोईर) :- गरीब लोकांची घरे विकून खाऊ नकोस त्यांना त्यांचा हक्क दे, नाहीतर गुजरात पळायला कमी पडेल, विमल आणि मुरजी याद राख गाठ स्वाभिमानी जयभीम वाल्याशी आहे असा इशारा पँथर डॉ राजन माकणीकर यांनी दिला. उष्टी बिडी मागून बनावट कार्टरेंज बनवून विकणार्या चिटर माणसा याद राख तुझी गाठ स्वाभिमानी जयभीमवाल्याशी आहे, शासनाच्या प्रकल्पात चोरी करून धंनदांडगा झाला म्हणजे कुणालाही विकत घेशील अस नाही.  एमआयडीसी तील पुनर्वसन योजना, साईवाडी, हरी नगर, शिवाजी नगर, शंकरवाडी महापालिका पुनर्वसन प्रकल्पातील केलेल्या दोघांच्या चोरीचा बहीखाता माझ्याकडे असून आता तुला लागलेले आमदारकीची डोहाळे जेलमध्ये पूर्ण करण्याची वेळ मी तुझ्यावर आणतो आहे. आजही विकासक आणि तू पाण्याच्या मूलभूत प्रश्न सोडवला नसून टँकरचे पाणी पिऊन नागरिक आजारी पडत आहेत,आजही कित्येकांना भाडे धनादेश प्राप्त नाहीत, कित्येकांना सदनिकेचा ताबा नाही, कित्येकांची घरे बळकावली आहेस. अनेकांना फक्त तू कारारनामे करून कोपराला गूळ लावला आहेस याचा कालाचीठा

न्यूज अपडेट: डॉ. मुनीर तांबोळी यांच्या इशाऱ्यानंतर करंजाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन:

न्यूज अपडेट: डॉ. मुनीर तांबोळी यांच्या इशाऱ्यानंतर करंजाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन: पनवेल (प्रतिनिधी/काशीनाथ नाईक) :- दक्ष नागरिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवत 15 दिवसात करंजाडे परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू न केल्यास सिडको व जिल्हापरिषद अधिकाऱ्यांना करंजाडे परिसरात फिरकू देणार अशा स्पष्ट इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हा आरोग्य व सिडको आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने हे आरोग्य उपकेंद्र पनवेल पंचायत समिती आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले.  त्यानुसार हा उपकेंद्र सुरू करण्याच्या हलचाली सुरु झाल्या आणि सोमवारी पालकमंत्री यांच्या हस्ते फित कापून केंद्र सुरू झाले.तिथे येत्या दोन दिवसात कोविड लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. करंजाडे चिंचपाडा परिसरातील नागरिक आरोग्य केंद्र बांधून तयार होते.हे केंद्र उदघाटनाच्या प्रतीक्षेत होते.कोरोना बधितांना उपचार करण्यासाठी एकीकडे हॉस्पिटलमध्ये बेडची शोधा - शोधा करावी लागते. तर दुसरीकडे करंजाडे येथील आरोग्य उपकेंद्र धूळ खात पडून होत

न्यूज अपडेट : लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते रिक्षाचालकांना होणार आर्थिक मदतीचे वाटप..!!

न्यूज अपडेट : लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते रिक्षाचालकांना होणार आर्थिक मदतीचे वाटप..!! ● लोकनेते रामशेठ ठाकूर  यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेना गरजू रिक्षाचालकांना करणार आर्थिक मदत पनवेल (प्रतिनिधी) :- राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू केली तरी राज्य सरकारने काही घटकांना मदतीचा हात पुढे केला. या घटकांपैकी रिक्षाचालकांना दीड हजाराचे अर्थसहाय्य दिले जाईल, असेही सरकारने जाहीर केले होते. मात्र, अद्याप मदतीची रक्कम रिक्षाचालकांना मिळाली नसून हे पैसे मिळणार कधी, याकडे रिक्षाचालकांचे लक्ष लागले आहे.  तसेच याची जाणीव ठेवूनच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमधील अत्यंत गरजू अशा १० महिला व १० पुरुष रिक्षाचालकांना आर्थिक मदत लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभहस्ते आज गुरुवार दिनांक १३ मे २०२१ रोजी देण्यात येणार आहे.  तरी या मदतीची गरज असलेल्या रिक्षाचालक बंधू - भगिनींनी संतोष आमले : 9220403509 यांना संपर्क करावा असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आ

न्यूज अपडेट: लढा भूमीपुत्रांचा, ध्यास दि.बा.पाटील नावाचा..!!

न्यूज अपडेट: लढा भूमीपुत्रांचा, ध्यास दि.बा.पाटील नावाचा..!! नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- महाराष्ट्र असलेली ७२० किमी लांब एवढी कोकणकिनारपट्टी ही फार विशाल आहे. ह्याच कोकणकिनारपट्टीत असलेली पालघर, ठाणे, रायगड हे विभाग सर्वांना ज्ञात असतीलच. या विभागात असलेले आगरी , कोळी, कराडी, कुणबी, तटकरी, आदिवासी समाज म्हणजे परंपरेचा वारसा जपणारे स्रोतच आहेत. भारत देशातच नव्हे तर  सबंध जगभरात अश्या व्यक्ती होऊन गेल्यात ज्यांच्यामुळे त्या समाजाला न्याय व हक्क मिळालेत. अर्थातच ती व्यक्ती समाजाची आधारस्तंभ बनते. त्याच प्रमाणे आगरी कोळी कराडी समाजातील स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देऊन समाजाचा उद्धार करणारे माजी खासदार स्व. दि.बा.पाटील हे या समाजाचे दैवत मानले जातात. आपल्या समाजासाठी असलेले प्रेम व जिव्हाळा दि.बा. पाटील यांच्या कार्यातून दिसून आले आहे.   देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी दिन-रात कष्ट करून देशाची काळजी घेतो. पण त्याची काळजी कोणीही घेतली नाही. पण दि.बा.पाटील यांनी स्थानिक शेतकऱ्यांसाठी व त्यांचे अस्तित्व टिकुन रहावे यासाठी अनेक लढे दिले. वर्षोनुवर्षे त्यांनी रायगड

न्यूज अपडेट: पनवेल महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याहस्ते पाककला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण:

न्यूज अपडेट: पनवेल महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याहस्ते पाककला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण: पनवेल / (प्रतिनिधी) : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त विविध ७० सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आजपर्यंत अनेक लोकउपयोगी कार्यक्रम पार पडले आहेत. त्याचप्रमाणे पनवेलमध्ये शनिवार दिनांक १० एप्रिल २०२१ रोजी पाककलेची आवड असणाऱ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते लॉकडाऊनमुळे हि स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज स्टार्टर पदार्थांचा समावेश होता. या स्पर्धेत अनेक महिलांनी व पुरुषांनी देखील सहभाग घेऊन भरघोस प्रतिसाद दिला. उत्कृष्ठ पाककलाकृती सादर करणाऱ्या भगिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.  सदर पाककला स्पर्धा हि अल्पसंख्यांक इंग्रजी स्कूल येथे होणार होती मात्र वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने हि स्पर्धा घेऊन याचा निकाल जाहीर करण्यात आला. लॉकडाऊ

न्यूज अपडेट: लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन सेवेचा शुभारंभ..!!

न्यूज अपडेट: लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन सेवेचा शुभारंभ..!! पनवेल (प्रतिनिधी) :- ‘कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निराधार गरीब -गरजू व्यक्ती यांना दोन वेळचे चांगले अन्न पुरवण्यासाठी 'लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना' सुरु करण्याचा संकल्प 'श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले' यांच्या 'राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत' महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक व 'आशा कि किरण' फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बशीरभाई कुरेशी यांनी केला होता.  कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर अनेक लहान-मोठ्या व्यवसायांवर आर्थिक परिणाम झाला असून काहींवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. आजही अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी लोक उपाशी झोपत आहेत याची जाणीव ठेवूनच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब यांच्या मागर्दर्शनानुसार व महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा व कार्याध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या स

न्यूज अपडेट: सोशल माध्यमावर चुकीच्या उपचाराने वेळ वाया जात असल्याचा डॉक्टरांचा दावा:

न्यूज अपडेट: सोशल माध्यमावर चुकीच्या उपचाराने वेळ वाया जात असल्याचा डॉक्टरांचा दावा: ● सोशल माध्यमावर उपलब्ध असलेले कोरोनावरील वैद्यकीय उपचार न करण्याचे वैद्यकीय क्षेत्रातून आवाहन: नवी मुंबई (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- आज सहज उप्लब्ध असलेली एकच गोष्ट म्हणजे आपल्या मोबाईलवर २४ तास उपलब्ध असलेली सोशल मीडिया. व्हाट्स ऍप, फेसबुक, ट्विटर इंस्टाग्राम व इतर अनेक ऍप्स आपल्याला जगामध्ये काय चाललंय याची दर मिनिटाला बातमी देत असतात याबरोबरच  फॅशन, खानपान, सहलीची ठिकाणे तसेच मुंबई व इतर शहरात घडणाऱ्या घडामोडी याबाबत सुद्धा अगदी खोलामध्ये जाऊन बातम्या देत असतात. लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावरील वावर तब्बल १२० टक्क्यांनी वाढला आहे.  लॉकडानच्या आधी एक व्यक्ती दिवसाला १५० मिनिटं सोशल मीडियावर घालवत होती. तोच वेळ आता २९० मिनिटं इतका झालाय. म्हणजे लोक दिवसाला जवळपास साडेचार ते पाच तास सोशल मीडियावर वावरू लागलेत. आता सोशल मीडिया हा फक्त करमणुकीचा भाग राहिला नसून यामध्ये दाखविल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी आपण आत्मसात करू लागलो आहोत परंतु कोरोनाच्या या महामारीत सोशल माध्यमांमध्ये सुचविलेले अथवा एखाद्या डॉक्ट

न्यूज अपडेट: सरकारी व खाजगी कोविड हॉस्पिटल मध्ये ICU विभागात सीसी टीव्ही कॅमेरा लावण्यात यावे अशी मागणी रुपालीताई शिंदे यांनी केली:

न्यूज अपडेट: सरकारी व खाजगी कोविड हॉस्पिटल मध्ये ICU विभागात सीसी टीव्ही कॅमेरा लावण्यात यावे अशी मागणी रुपालीताई शिंदे यांनी केली: पनवेल (प्रतिनिधी) :- तात्काळ कोविड सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल मधील कोविड ICU विभागात सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्याचे आदेश देणे बाबत विनंती मा. सौ रुपाली ताई यांनी मेल द्वारा  मागणी केली आहे, आज देशामध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. महाराष्ट्र राज्यात तर कोरोना विषाणुने हाहाकार माजवला आहे. तसेच नवी मुंबई, मुंबई या ठिकाणी देखील कोरोनाने हैदोस घातला आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांसाठी बेड, रेमडेसिवर, ऑक्सीजन व औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात आपल्या घरच्या व्यक्तींना वाचविण्यासाठी पळापळ धावपळ सुरू आहे. त्यातच सन 2020 पासून कोरोना विषाणूने जिल्ह्यातील अनेक सामान्य गरीब जनतेचे कमरडे मोडलेले असून, हातात पैसे नसल्याने अनेक मध्यमवर्गीय गरीब जनता सरकारी व खाजगी रुग्णालयांची वाट धरीत आहेत. पण याच सरकारी व खाजगी रुग्णालयात कोविड वर उपचार घेत असलेल्या रुग्णाची स्थिती अत्यंत बिकट होत असल्याचे दिसून येत आहे.

न्यूज अपडेट: राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन सेवा होणार सुरु..!!

न्यूज अपडेट: राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन सेवा होणार सुरु..!! ● आज ८ मे रोजी रामशेठ ठाकूर साहेबांच्या हस्ते होणार उदघाटन ● लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन सेवा होणार सुरु पनवेल (प्रतिनिधी) :- ‘ कोरोना विषाणू’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निराधार गरीब -गरजू व्यक्ती यांना दोन वेळचे अन्न पुरवण्यासाठी 'लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना' सुरु करण्याचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक व आशा कि किरण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बशीरभाई कुरेशी यांनी निर्णय घेतला आहे. कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर अनेक लहान-मोठ्या व्यवसायांवर आर्थिक परिणाम झाला असून काहींवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.  आजही अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी लोक उपाशी झोपत आहेत याची जाणीव ठेवूनच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब यांच्या मागर्दर्शनानुसार

न्यूज अपडेट: श्रीकांत पाटील यानी दिला कलाकारांना मदतीचा हात..!!

न्यूज अपडेट: श्रीकांत पाटील यानी दिला कलाकारांना मदतीचा हात..!! उरण (प्रतिनिधी/सुनिल ठाकूर) :- सध्या महाराष्ट्र मधे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता  लॉकड़ाऊंन सुरु  आहे , व ते पुन्हा १५ में पर्यंत करण्याचे ठरवले आहे.  त्यामुळे वाढत्या लॉक ड़ाऊंन मुळे  कलाकारांचे खुप हाल होत आहेत, उरण बोकड़विडा चे प्रशिद्ध  सुपर मार्केट चे मालक श्रीकांत पाटील  ह्यांचे कडून मागील लॉकड़ाऊंन मधे १०० सामान किट वाटप केले होते ,, आताही लॉक ड़ाऊंन सुरु आहे कलाकारांचे हाल सुरु आहेत. कलाकाराना थोडासा दिलासा मिळावा म्हणून  सामान किटचे वाटप अभिनेता कॉमेडियन डी महेश ह्यांच्या हस्ते भावे नाट्यगृह येथे देण्यात आले. सोबत लेखक दिग्दर्शक निर्माता संतोष वाजे, कलाकार संगीता हाटे, मेकप आर्टिस्ट देवा सरकटे उपस्थितीत होते. परत दोन दिवसात १६ सामान किट देण्यात येईल असे श्रीकांत पाटील यानी जाहिर केले १६ किट जसे नवी मुंबई उरण पनवेल तसेच. ५० किट देवगढ़ मालवण साठी पाठवत आहेत, हा लॉकडाऊन नक्कीच वाढेल म्हणून पुढेही आपन मदतीचा हात नक्कीच देऊ असे कलासागरचे निर्माते श्रीकांत मुंबईकर ह्यांनी शब्द दिला, तसेच सीनियर इंस्पेक्टर निलेश बनसोडे व रवि ना

न्यूज अपडेट: भेंडखळ ग्रामपंचायत तर्फे डेटॉल हॅन्ड वॉश आणि मास्कचे वाटप:

न्यूज अपडेट: भेंडखळ ग्रामपंचायत तर्फे डेटॉल हॅन्ड वॉश आणि मास्कचे वाटप: उरण (प्रतिनिधी/सुनिल ठाकूर) :- भेंडखळ  गावात ग्रामपंचायत भेंडखळ यांच्याकडून डेटॉल हॅन्ड वॉश पाऊच आणि मास्क यांचे वाटप दिनांक ३० एप्रिल रोजी सरपंच कुमारी भाग्यश्री चव्हाण, उपसरपंच लक्ष्मण शेठ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सौ.संध्या दीपक ठाकूर, सौ. सोनाली ठाकूर, सौ.नीलम भोईर, सौ.नीता ठाकूर, सौ.सुचित्रा ठाकूर ,सौ.स्वाती घरत, सौ.योगिता ठाकूर ,ग्रामपंचायत सदस्य श्री कृष्णा ठाकूर, श्री किशोर ठाकूर, श्री रतन ठाकूर, ग्रामविकास अधिकारी श्री दिलीप तुरे, ग्रामपंचायत आँफिस स्टाफ सौ. निशा वशेणीकर , कु .दिपाली मते, सौ. वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत भेंडखळ  गावात घरोघर जाऊन डेटाँल पाऊच आणि मास्क यांचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी पुर्ण गावात सॅनिटायझर फवारणी करण्यात आले. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

न्यूज अपडेट: आदिवासी बांधवांना अन्न धान्याचे वाटप करुन पोलिसांनी माणूसकीचे दर्शन घडवले..!!

न्यूज अपडेट: आदिवासी बांधवांना अन्न धान्याचे वाटप करुन पोलिसांनी माणूसकीचे दर्शन घडवले..!! उरण (प्रतिनिधी/सुनिल ठाकुर) :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाली असल्याने, आदिवासी वाडीवरील हातावर कमवून खाणाऱ्या बांधवांसाठी पोलीस धावून आले आहेत. पनवेल मधिल  आदिवासी वाडीमधील कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करून, पोलिसांतील माणसाचे दर्शन घडविले आहे. यामुळे आपल्या व्यस्त कामातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पोलिसांना येथील आदिवासी बांधवांनी सलाम केला आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत.  यामुळे हातावर कमविणाऱ्या आदीवासी बांधवांच्या चुली अन्नधान्याविना थंडावल्या आहेत. अशातच मदतीचा एक हात देवदूताप्रमाणेच असतो.  पोलीस आयुक्त श्री. बिपीन कुमार सिंह व अपर पोलीस आयुक्त श्री.बी.जी.शेखर पाटील ,गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील अधिकारी यांनी सहकार्याने दिनांक २३ रोजी पनवेल तालुका आदिवासी भागातील खैरवाडी व इतर ७ आदिवासी , पाड्यातील हातावर पोट असणाऱ्या सुमारे १०० गरीब व गरजू कुटुंबांना (सुमारे ५०० व्यक्ती) पंधरा दिवस पुरेल एवढे तांदूळ,

न्यूज अपडेट: "जुईनगर येथील जलकुंभात आढळेला मृतदेहाबाबत "महाराष्ट्र नवनिर्माण सेना" आक्रमक":

न्यूज अपडेट: "जुईनगर येथील जलकुंभात आढळेला मृतदेहाबाबत "महाराष्ट्र नवनिर्माण सेना" आक्रमक": नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे) :- जुईनगर मधील जलकुंभात सापडलेल्या मृतदेह घटनेबाबत "महाराष्ट्र नवनिर्माण सेना" जुईनगर विभाग आक्रमक, आज सदर घटनास्थळी "जुईनगर चे विभाग अध्यक्ष "अक्षय भोसले", प्रभाग क्र:- ८३ चे शाखा अध्यक्ष "मयुर कारंडे" आणि उपशाखा अध्यक्ष "सुशांत घोरपडे" ह्यांनी भेट दिली असता, त्यांच्या निदर्शनास आले की ज्या ठिकाणाहून १५ ते २० हजार लोकांना पाणी पुरवठा होतो अशा ठिकाणी खूपच निष्काळजीपणा आहे, तिथे सुरक्षारक्षक नाही, cctv मागील बाजूस नाही, टाकीचे झाकण कोणीही सहज उघडेल अशा अवस्थेत आहे, व्यवस्थित कंपाऊंड नाही, एवढा हलगर्जीपणा महालपालिकेचा दिसून येतोय. वरील सर्व त्रुटींची मागणी "महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने आयुक्तांना करण्यात आली आहे, आणि संबंधित अधिकारी वर कडक कारवाई झालीच पाहिजे ही देखील मागणी करण्यात आली आहे. संबंधित केस ज्या वरिष्ठ पो. निरीक्षक साहेबांच्या अंतर्गत आहे, त्यांची ही आज भेट घेतली, त्यां

न्यूज अपडेट: पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थे तर्फे गरीब गरजूंना अन्नदान वाटप...!!

न्यूज अपडेट: पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थे तर्फे गरीब गरजूंना अन्नदान वाटप...!! नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे) :- शुक्रवारी ३० एप्रिल रोजी पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थे मार्फत अन्नदानाचे ठरल्या प्रमाणे सातत्य  गोरगरीब लोकांचा रोजगार बंद पडले आहे,या सारख्याचे सामाजिक जान ठेवत अन्नदान वाटप पंचशील नगर, आदई तलाव शेजारील झोपडपट्टी, नवीन पनवेल सेक्टर ६ समोरील झोपडपट्टी तील गरीब गरजू आशा जवळ जावक ३०० लोकांना मोफत अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे उपाध्यक्ष अशोक आखाडे खजिनदार भानुदास वाघमारे यांच्या हस्ते अन्नदान वाटप करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाची माहिती देताना पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे यांनी सांगितले की हप्त्यातून दोन दिवस सोमवार व शुक्रवार रोजी अन्नधान वाटप करण्याचे ठरवले आम्हाला हे अन्नदान दररोज करण्याची इच्छा आहे त्यासाठी दानशूरानी पुढे येऊन या अन्नदानाच्या कार्याला मदत करून या कोरोना प्रदूर्भावच्या काळात व लॉक डाऊन च्या दिवसात दान देऊन सहभागी व्हावे असे आपणास आवाहन करण्यात येत आहे. याच अन्नदान बरोबर आम्ही पन

न्यूज अपडेट: चिरनेरच्या तरुणाला आयपीएल ड्रीम इलेव्हन टीम मध्ये १५ लाखांची लॉटरी लागली:

न्यूज अपडेट: चिरनेरच्या तरुणाला आयपीएल ड्रीम इलेव्हन टीम मध्ये १५ लाखांची लॉटरी लागली: नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे) :- कोणाचे नशीब कसे खुलतील हे सांगता येत नाही.चिरनेरच्या अशाच एका क्रिकेट वेड्या तरुणाला सध्या सुरू असलेल्या आय पी एल स्पर्धेने धनवान केले आहे. त्याने लावलेल्या ड्रीम इलेव्हन टीमवर त्याला १५ लाखांची लॉटरी लागली आहे. आयपीएल स्पर्धेत काल झालेल्या दिल्ली कॅपिटल विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू या सामन्यावेळी चिरनेर येथिल संकेत विजय मुंबईकर या क्रिकेट वेड्या तरुणाने स्पर्धेतील नियमानुसार ऑनलाईन ड्रीम इलेव्हन टीम तयार केली होती व ऑनलाईन स्पर्धेत भाग घेतला होता.  ड्रीम इलेव्हन टीम मधिल खेळाडूंच्या केल्यानुसार त्यांना पॉईंट्स देण्यात येतात. ज्याने योग्य टीम तयार करून त्यातील खेळाडूंना जास्त पॉईंट मिळाले की त्या स्पर्धकाला १०० रुपयां पासून एक करोड रुपयां पर्यंत बक्षीस दिले जाते. काल चिरनेरच्या संकेत मुंबईकर या तरुणाने तब्बल १५ लाख रुपयांचे बक्षीस मिळविल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सामान्य घरातील असलेल्या संकेतने या पैशांचा योग्य विनियोग करण्याचा मानस व्यक्त केला आह

न्यूज अपडेट: नवी मुंबई काँग्रेसच्या ओबीसी जिल्हाध्यक्षपदी संतोष सुतार..!!

न्यूज अपडेट: नवी मुंबई काँग्रेसच्या ओबीसी जिल्हाध्यक्षपदी संतोष सुतार..!! नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे) :- महापालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईत काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पक्षांतर्गत घडामोडी वाढीस लागल्या आहे. पक्षसंघटना बळकट करण्यासाठी काँग्र्रेस पक्षाच्या नवी मुंबई ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी ही नियुक्ती केली आहे. संतोष सुतार हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षात कार्यरत असून सध्या संतोष सुतार हे नवी मुबई जिल्हा काँग्र्रेसचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सोशल मिडियावर संतोष सुतार कमालीचे सक्रिय असून सतत भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेताना ते पहावयास मिळतात. धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात संतोष सुतार यांचे योगदान असून संतोष सुतार यांची ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करताना नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजाचा जनाधार काँग्रेसकडे वळविण्याची काँग्रेसने खेळी केल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकारणात सुरू झाली आहे. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्य

न्यूज अपडेट: नवी मुंबई शहरातील ज्वेल ऑफ नवी मुंबई उद्यानामधून येणाऱ्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास:

न्यूज अपडेट: नवी मुंबई शहरातील ज्वेल ऑफ नवी मुंबई उद्यानामधून येणाऱ्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास: नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे) :- नवी मुंबई शहरातील पाम बीच मार्गालगत मोक्याचा ठिकाणी वसवलेल्या नेरुळ येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई उद्यानातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. वरवर आकर्षित दिसणाऱ्या या उद्यानात सर्वाधिक प्लास्टिक कचरा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे या उद्यानात दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.  सर्वाधिक उद्याने असणाऱ्या शहरांमध्ये नवी मुंबई शहराचे नाव कायम अग्रस्थानी असते. १२० हून अधिक उद्यानांचा समावेश असलेल्या नवी मुंबई शहरात महापालिकेने नेरुळ येथे ज्वेल ऑफ नवी हे सर्व सोयीसुविधांनी समृद्ध असे भव्य उद्यान काही वर्षांपूर्वी विकसित केले आहे. तलावाच्या सभोवताली सुमारे अडीच किलोमीटर अंतर असणारा जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, प्रसाधनगृह, पार्किंग, आधुनिक विद्युत व्यवस्था अशा विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भव्य जॉगिंग ट्रॅकमुळे तरुणाईबरोबर, वृद्धांचे व्यायाम करण्यासाठी येण्याचे प्रमाणदेखील

न्यूज अपडेट: ए.पी.एम.सी.मार्केट परिसरातील वैद्यकीय तपासणी कक्षात नियमांचे उल्लंघन..।।

न्यूज अपडेट: ए.पी.एम.सी.मार्केट परिसरातील वैद्यकीय तपासणी कक्षात नियमांचे उल्लंघन..।। नवी मुंबई (प्रतिनिधी/विरेंद्र म्हात्रे) :- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात असताना हा संसर्गातून पसरणारा आजार असल्याने गर्दी होऊ न देणे हाच त्यावर प्रभावी उपाय आहे. या अनुषंगाने राज्य सरकारसह नवी मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना करीत आहे. अशातच राज्य सरकारने सूचित केल्याप्रमाणे ए.पी.एम.सी.मार्केटमधील व्यापारी, कामगार, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, ट्रक चालक व क्लिनर्स यांच्या वैद्यकीय तपासणीकरिता मार्केट परिसरात कोरोना नियंत्रक वैदयकीय तपासणी कक्ष सुरु करण्यात आले आहेत. मात्र हे कोरोना नियंत्रकच कोरोना वाढीसाठी कारणीभूत ठरते आहे की काय अशी शंका तेथील गर्दी पाहून उपस्थित होत आहे. नवी मुंबई महापालिकेने ए.पी.एम.सी. प्रशासनाशी चर्चा करीत ५ मार्केटमध्ये कोरोना नियंत्रक वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन केले आहेत. याशिवाय फळ मार्केट, भाजीपाला मार्केट, दाणा मार्केट या तीन ठिकाणी तपासणी कक्ष सुरु केले आहेत. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियम काटेकोरपणे पाळले जात नसल्याचे निदर

न्यूज अपडेट: बायपास सर्जरी,अँजिओप्लास्टी झालेल्या ७० वर्षीय निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची कोरोनावर मात:

न्यूज अपडेट: बायपास सर्जरी,अँजिओप्लास्टी झालेल्या ७० वर्षीय निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची कोरोनावर मात: नवी मुंबई (ठाणे-प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- कोरोना विषाणूनं आज जगभरातल्या अनेकांची झोप उडवली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मुंबई व लगतच्या शहरांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. देशासह राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या उल्लेखनीय आहे. कोरोनाची लागण ही वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना लवकर होते, असे वारंवार सांगितलं जात आहे. वृद्ध व्यक्तींना किंवा लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला त्या आजारातून वाचवणे कठीण असल्याचेही डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे.  मात्र, कल्याण येथे राहणारे श्री अशोक जोशी ( वय ७०) यांनी मोठ्या हिमतीने कोरोनाचा सामना करून घरी परतले आहेत. कल्याण पूर्व इथे राहणारे अशोक जोशी हे निवृत्त पोलिस कर्मचारी असून ते कल्याण पश्चिम खडकपाडा इथे  एकत्र कुटुंबात राहतात. जोशी यांच्यावर २००३ साली बायपास सर्जरी झाली होती तसेच २०१५ मध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती. मार्च महिन्यामध्ये जोशी यां