न्यूज अपडेट: कोव्हीडच्या नव्या रुग्णांची रवानगी इंडिया बुल्स मध्ये..!!
पनवेल (प्रतिनिधी/प्रदीप पाटील) :- शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील नवीन कोरोना रूग्णांचे गृहविलगीकरण (होमआयसोलेशन) न करता त्यांना आरोग्य यंत्रणेमार्फत इंडिया बुल्स या क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे. या आधी कोरोनाच्या सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांचे गृह विलगीकरण केले जात होते परंतू शासन आदेशानूसार कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी नवीन कोरोना रूग्णांना गृहविलगीकरण करण्याऐवजी क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे. यानूसार पनवेल महानगरपालिकेने इंडिया बुल्स येथे आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा वाढविल्या आहेत. तसेच वैद्यकिय आरोग्य विभागाकडून आवश्यक डॉक्टर्स, नर्स, औषधे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
तसेच आता यापुढे वैद्यकिय आरोग्य विभागाच्या ट्रेसिंग टीम, मोबाईल टीम मधील कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी ,शिक्षक यामार्फत रुग्णांना इंडिया बुल्स येथे संदर्भित करण्याची कारवाई करण्याचे आदेश माननीय आयुक्त श्री. सुधाकर देशमुख यांनी निर्गमित केले आहेत.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.