न्यूज अपडेट: राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन सेवा होणार सुरु..!!
● आज ८ मे रोजी रामशेठ ठाकूर साहेबांच्या हस्ते होणार उदघाटन
● लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन सेवा होणार सुरु
पनवेल (प्रतिनिधी) :- ‘कोरोना विषाणू’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निराधार गरीब -गरजू व्यक्ती यांना दोन वेळचे अन्न पुरवण्यासाठी 'लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना' सुरु करण्याचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक व आशा कि किरण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बशीरभाई कुरेशी यांनी निर्णय घेतला आहे. कोरोना व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अनेक लहान-मोठ्या व्यवसायांवर आर्थिक परिणाम झाला असून काहींवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.
आजही अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी लोक उपाशी झोपत आहेत याची जाणीव ठेवूनच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब यांच्या मागर्दर्शनानुसार व महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, उपाध्यक्ष नारायण कोळी, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा व कार्याध्यक्ष प्रकाश कोळी यांच्या सोबतीने महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार व आशा कि किरण फाउंडेशनचे अध्यक्ष बशीरभाई कुरेशी यांच्यासाथीने 'लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना' सुरु करण्यात येणार आहे.
संपूर्ण लॉकडाऊनमध्ये सदर भोजन सेवा अविरतपणे सुरु असणार असून या भोजन सेवेचा शुभारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्याहस्ते आज शनिवार दिनांक ८ मे २०२१ रोजी सकाळी ठीक ११ वाजता त्यांच्या निवासस्थानी करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी सांगितले.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.