न्यूज अपडेट: आदिवासी बांधवांना अन्न धान्याचे वाटप करुन पोलिसांनी माणूसकीचे दर्शन घडवले..!!
उरण (प्रतिनिधी/सुनिल ठाकुर) :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाली असल्याने, आदिवासी वाडीवरील हातावर कमवून खाणाऱ्या बांधवांसाठी पोलीस धावून आले आहेत. पनवेल मधिल आदिवासी वाडीमधील कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करून, पोलिसांतील माणसाचे दर्शन घडविले आहे. यामुळे आपल्या व्यस्त कामातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पोलिसांना येथील आदिवासी बांधवांनी सलाम केला आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत.
यामुळे हातावर कमविणाऱ्या आदीवासी बांधवांच्या चुली अन्नधान्याविना थंडावल्या आहेत. अशातच मदतीचा एक हात देवदूताप्रमाणेच असतो.
पोलीस आयुक्त श्री. बिपीन कुमार सिंह व अपर पोलीस आयुक्त श्री.बी.जी.शेखर पाटील ,गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील अधिकारी यांनी सहकार्याने दिनांक २३ रोजी पनवेल तालुका आदिवासी भागातील खैरवाडी व इतर ७ आदिवासी , पाड्यातील हातावर पोट असणाऱ्या सुमारे १०० गरीब व गरजू कुटुंबांना (सुमारे ५०० व्यक्ती) पंधरा दिवस पुरेल एवढे तांदूळ, डाळ, मिठ, तेल, मसाले, बिस्कीट पुडे, टोस्ट अशा जिवनाश्यक वस्तूसह मास्क, सॅनिटायझरचे वाटप मा. अपर पोलीस आयुक्त श्री.बी.जी.शेखर पाटील व गुन्हे शाखेतील श्री.विनोद चव्हाण , वपोनि छापरिया, कोल्हटकर, कादबाने, गोरे, शिंदे , सोनावणे यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
पोलीस व्यस्त असतानाही सेवाभावी दुर्बल घटकांना विचारात घेऊन त्यांच्या मदतीसाठी जात असल्याने पोलिसांबाबत समाजामध्ये आदराची भावना व्यक्त होत आहे. तर हातावर पोट असणाऱ्या आदिवासी कुटुंबांना लॉकडाऊन परिस्थितीमध्ये उपासमारीची वेळ असताना, अश्याप्रकारची मदत मिळणे हे फार मोठे कार्य आहे. यामुळेच या कार्यक्रमातून पोलिसातला माणूसाचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. कोरोनाचे महाभयंकर परस्थीतीमधे मदत केलेबददल भागातील आदिवासी लोकांनी नवीमुंबई पोलीसांना धन्यवाद दिले.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.