न्यूज अपडेट: श्रीकांत पाटील यानी दिला कलाकारांना मदतीचा हात..!!
उरण (प्रतिनिधी/सुनिल ठाकूर) :- सध्या महाराष्ट्र मधे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकड़ाऊंन सुरु आहे , व ते पुन्हा १५ में पर्यंत करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे वाढत्या लॉक ड़ाऊंन मुळे कलाकारांचे खुप हाल होत आहेत, उरण बोकड़विडा चे प्रशिद्ध सुपर मार्केट चे मालक श्रीकांत पाटील ह्यांचे कडून मागील लॉकड़ाऊंन मधे १०० सामान किट वाटप केले होते ,, आताही लॉक ड़ाऊंन सुरु आहे कलाकारांचे हाल सुरु आहेत. कलाकाराना थोडासा दिलासा मिळावा म्हणून सामान किटचे वाटप अभिनेता कॉमेडियन डी महेश ह्यांच्या हस्ते भावे नाट्यगृह येथे देण्यात आले. सोबत लेखक दिग्दर्शक निर्माता संतोष वाजे, कलाकार संगीता हाटे, मेकप आर्टिस्ट देवा सरकटे उपस्थितीत होते.
परत दोन दिवसात १६ सामान किट देण्यात येईल असे श्रीकांत पाटील यानी जाहिर केले १६ किट जसे नवी मुंबई उरण पनवेल तसेच. ५० किट देवगढ़ मालवण साठी पाठवत आहेत, हा लॉकडाऊन नक्कीच वाढेल म्हणून पुढेही आपन मदतीचा हात नक्कीच देऊ असे कलासागरचे निर्माते श्रीकांत मुंबईकर ह्यांनी शब्द दिला, तसेच सीनियर इंस्पेक्टर निलेश बनसोडे व रवि नाईक यांनी सांगितले की आम्हीही मित्र मंडळी सह मागे जशी आर्थिक मदत केली तशी पुढे ही कलाकाराला गरज भासेल तशी मदतकरु कलाकार जगला पाहिजे ही भावना मनात आहे असे श्रीकांत पाटिल व बनसोडे साहेब, रवि नाईक यांनी यावेळेस आपले मत व्यक्त केले.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.