न्यूज अपडेट : लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते रिक्षाचालकांना होणार आर्थिक मदतीचे वाटप..!!
● लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेना गरजू रिक्षाचालकांना करणार आर्थिक मदत
पनवेल (प्रतिनिधी) :- राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू केली तरी राज्य सरकारने काही घटकांना मदतीचा हात पुढे केला. या घटकांपैकी रिक्षाचालकांना दीड हजाराचे अर्थसहाय्य दिले जाईल, असेही सरकारने जाहीर केले होते. मात्र, अद्याप मदतीची रक्कम रिक्षाचालकांना मिळाली नसून हे पैसे मिळणार कधी, याकडे रिक्षाचालकांचे लक्ष लागले आहे.
तसेच याची जाणीव ठेवूनच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमधील अत्यंत गरजू अशा १० महिला व १० पुरुष रिक्षाचालकांना आर्थिक मदत लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभहस्ते आज गुरुवार दिनांक १३ मे २०२१ रोजी देण्यात येणार आहे.
तरी या मदतीची गरज असलेल्या रिक्षाचालक बंधू - भगिनींनी संतोष आमले : 9220403509 यांना संपर्क करावा असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.