Skip to main content

न्यूज अपडेट: बायपास सर्जरी,अँजिओप्लास्टी झालेल्या ७० वर्षीय निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची कोरोनावर मात:

न्यूज अपडेट: बायपास सर्जरी,अँजिओप्लास्टी झालेल्या ७० वर्षीय निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची कोरोनावर मात:

नवी मुंबई (ठाणे-प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- कोरोना विषाणूनं आज जगभरातल्या अनेकांची झोप उडवली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मुंबई व लगतच्या शहरांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. देशासह राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या उल्लेखनीय आहे. कोरोनाची लागण ही वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना लवकर होते, असे वारंवार सांगितलं जात आहे. वृद्ध व्यक्तींना किंवा लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला त्या आजारातून वाचवणे कठीण असल्याचेही डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे. 

मात्र, कल्याण येथे राहणारे श्री अशोक जोशी ( वय ७०) यांनी मोठ्या हिमतीने कोरोनाचा सामना करून घरी परतले आहेत. कल्याण पूर्व इथे राहणारे अशोक जोशी हे निवृत्त पोलिस कर्मचारी असून ते कल्याण पश्चिम खडकपाडा इथे  एकत्र कुटुंबात राहतात. जोशी यांच्यावर २००३ साली बायपास सर्जरी झाली होती तसेच २०१५ मध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली होती. मार्च महिन्यामध्ये जोशी यांच्या घरामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला, घरामध्ये एकूण १४ माणसे कोरोना पॉजिटीव्ह झाल्या होत्या. श्री अशोक जोशी यांचे वय व पूर्वीची मेडिकल हिस्ट्री पाहता त्यांच्या मुलाने त्यांना कल्याण येथील स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करून उपचार सुरु केले. 

जोशी यांच्यावर उपचार करणारे  स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक, जेष्ठ फिजिशियनव व छातिरोग तज्ञ डॉ. प्रवीण भुजबळ सांगतात , "अशोक जोशी जेंव्हा हॉस्पिटलमध्ये भरती झाले तेंव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती परंतु या आजाराबाबत भीती अजिबात नव्हती. त्यांची मेडिकल हिस्ट्री पाहता आम्ही त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु केले व या उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. दोन आटवड्यानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे." सत्तर वर्षीय अशोक जोशी याना कोरोनामुक्त करण्यासाठी स्टार सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले होते. रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टर आणि कर्मचाऱ्याने केलेली रुग्णसेवा ही समाधानकारक आहे. त्यामुळे संपूर्ण रुग्णालय अभिनंदनास पात्र आहे. यापुढे कोणीही कोरोनाला घाबरू नये, मी या वयात कोरोनावर मात केली आहे. अशा भावना कोरोना मुक्त झालेल्या ७० वर्षीय अशोक जोशी यांनी बोलून दाखविली.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे