न्यूज अपडेटे : वर्षावरील दिव्यांग व ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना विनाटोकन लसीकरणाची सुविधा:
पनवेल (प्रतिनिधी/प्रांजल नाथ) :- पनवेल महानगरपालिकेने ४५ वर्षाहून अधिक वयाचे दिव्यांग बांधव व ६० वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिक यांना पनवेल महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर सायंकाळी ४.०० वाजता विनाटोकन लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरी पनवेल महानगरपालिका हद्दीतील संबंधित दिव्यांग बांधवांनी व जेष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त श्री.सुधाकर देशमुख यांनी केले आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.