न्यूज अपडेट: भेंडखळ ग्रामपंचायत तर्फे डेटॉल हॅन्ड वॉश आणि मास्कचे वाटप:
उरण (प्रतिनिधी/सुनिल ठाकूर) :- भेंडखळ गावात ग्रामपंचायत भेंडखळ यांच्याकडून डेटॉल हॅन्ड वॉश पाऊच आणि मास्क यांचे वाटप दिनांक ३० एप्रिल रोजी सरपंच कुमारी भाग्यश्री चव्हाण, उपसरपंच लक्ष्मण शेठ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सौ.संध्या दीपक ठाकूर, सौ. सोनाली ठाकूर, सौ.नीलम भोईर, सौ.नीता ठाकूर, सौ.सुचित्रा ठाकूर ,सौ.स्वाती घरत, सौ.योगिता ठाकूर ,ग्रामपंचायत सदस्य श्री कृष्णा ठाकूर, श्री किशोर ठाकूर, श्री रतन ठाकूर, ग्रामविकास अधिकारी श्री दिलीप तुरे, ग्रामपंचायत आँफिस स्टाफ सौ. निशा वशेणीकर , कु .दिपाली मते, सौ. वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत भेंडखळ गावात घरोघर जाऊन डेटाँल पाऊच आणि मास्क यांचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी पुर्ण गावात सॅनिटायझर फवारणी करण्यात आले.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.