Skip to main content

न्यूज अपडेट: काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शने; जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी नोंदवला निषेध..।।

न्यूज अपडेट: काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शने; जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी नोंदवला निषेध..।।

● भारतीय जनता पक्षाने (भाजपा) केंद्रात सात वर्षे सत्ता स्थापन केल्यामुळे, इंधन दरवाढीबाबत आणि कोविड -१९ च्या व्यवस्थापनाच्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला


नवी मुंबई (रूपाली वाघमारे) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. सात वर्षाच्या काळात मोदी सरकारने जनतेची निव्वळ दिशाभूल केलेली आहे. याचाच निषेध म्हणून नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वात ठिकाणी आंदोलने करण्यात आली. वाशी येथील काँग्रेस भवन बाहेर कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत मोदी सरकारचा निषेध केला.  सात वर्षात ना केला विकास मोदींनी केला देश भकास असं म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

तसेच, नवी मुंबईतील नेरूळ तालुका जनसंपर्क पक्ष कार्यालया समोर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र  मोदी व केंद्राच्या विरोधात निषेध व्यक्त केला. वाढती महागाई आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने नवी मुंबईतील नेरूळ तालुका जनसंपर्क कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात वर्षपूर्ती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले याप्रसंगी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संतोष शेट्टी, नवे इंटकचे अध्यक्ष तसेच नेरूळ तालुका अध्यक्ष रवींद्र सावंत, नवी मुंबई ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष सुतार, माजी नगरसेविका मीरा पाटील, नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर आदी पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

एका अधिकृत निवेदनानुसार, नेते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या सात वर्षांच्या कारकिर्दीत देशाची सतत घसरण होत आहे आणि त्याचे गंभीर परिणाम लोक आज भोगत आहेत.

दरम्यान, शनिवारी पेट्रोलच्या किंमतीत शतक झळकणारी मुंबई ही पहिली मेट्रो ठरली. दरम्यान, शनिवारी नवी मुंबई शहरात कोरोनाचे १०१ नवीन रुग्ण आणि ६ मृत्यूची नोंद झाली. लवकरच मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या काही जिल्ह्यांत लॉकडाउनवरील निर्बंध शिथिल होण्याची अपेक्षा देखिल आहे. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांच्या वेळही वाढविण्यात येतील. शासनाने काही टक्के कर्मचार्‍यांना कार्यालयात परत काम करण्याची परवानगी देण्याचीही अपेक्षा आहे.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे