न्यूज अपडेट: कामोठ्यात महिलांसाठी कोरोनाची तिसऱ्या लाटेत मुलांची काळजी कशी घ्यावी या विषयावर ॲानलाईन मीटिंग:
न्यूज अपडेट: कामोठ्यात महिलांसाठी कोरोनाची तिसऱ्या लाटेत मुलांची काळजी कशी घ्यावी या विषयावर ॲानलाईन मीटिंग:
पनवेल (प्रतिनिधी) :- दिनांक ३० मे रोजी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सलग सात वर्ष पूर्ण केले असुन त्यानिमित्त "भारतीय जनता पार्टी कामोठे" च्या वतीने कामोठ्यातील नागरिकांच्या विशेषत: महिलांच्या साठी कोरोनाची तिसरी लाट व माझ्या मुलांची काळजी ह्या महत्त्वपूर्ण विषयावर कामोठ्यातील सुप्रसिद्ध, सुपरिचित व नामांकित बालरोगतज्ञ डॅाक्टर शैलेश काबरा यांचे ॲानलाईन समुपदेशन संध्याकाळी ४ वाजता आयोजित केले असुन कामोठ्यातील जास्तीत जास्त महिलांनी सदर व्हर्चुअल बॅठकीत आपली उपस्थिती लावावी व आपल्या लहान मुलांची काळजी कशी घ्यावी हे समजून घ्यावे ही नम्र विनंती.
काही महत्वाच्या सूचना-
१) बॅठकीची लिंक ही ३० तारखेला सकाळी ११ वाजता पाठवण्यात येईल
२) त्या अगोदर आपल्या मोबाईल मध्ये वेबेक्स मीटिंग चे ॲप्लीकेशन प्लेस्टोर मध्ये जाऊन डाऊनलोड करावे
३) मीटिंग मध्ये तज्ञ डॅाक्टरांच्या मार्गदर्शना नंतर काही महिला त्यांना समस्या व प्रश्न देखील विचारू शकतात
४) वेळे अभावी किंवा तांत्रिक कारणास्तव बोलण्याची संधी न मिळाल्यास चॅट बॅाक्स मध्ये आपले प्रश्न विचारावेत
५) वक्त्यांनी बोलत असतांना कृपया सर्वांनी आपला मोबाईल म्यूट करून ठेवावे ही नम्र विनंती
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.