Skip to main content

न्यूज अपडेट: कोरोना संक्रमण आटोक्यात येईपर्यंत उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांनी स्वताची काळजी घेणे गरजेचे..!!

न्यूज अपडेट: कोरोना संक्रमण आटोक्यात येईपर्यंत उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांनी स्वताची काळजी घेणे गरजेचे..!!

■ लॉकडाउन काळामध्ये  फॅमिली डॉक्टरांचा घ्या नियमित सल्ला

■ राष्ट्रीय उच्च रक्तदाब जागरूकता महिना      

ठाणे (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- भारतामध्ये कोरोनाची लाट आल्यानंतर कोरोना व्यतिरिक्त इतरही गंभीर आजार आहेत याचा बहुसंख्य नागरिकांना बहुदा विसर पडत चालला आहे  कारण कोरोना महामारीमुळे होणाऱ्या नुकसानाची दाहकता आपण सर्वजण बघतच आहोत. आपल्याला कोरोनाशी तर लढायचं आहे परंतु इतर जीवघेण्या आजारांवर सुद्धा आपले ध्यान वळवले पाहिजे. अगदी चोरपावलांनी आपल्या शरीरात नकळत प्रवेश करणारा उच्च रक्तदाब या आजाराची जागरूकता करण्यासाठी जगातील अनेक आरोग्य संघटना मे  महिना हा राष्ट्रीय उच्च रक्तदाब जागरूकता महिना साजरा करतात परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे या व्याधींकडे अनेकांचे दुर्लक्ष झाले असून उच्च रक्तदाब आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाची जास्त भीती असल्यामुळे त्यांनी याबाबत दक्ष राहणे महत्वाचे आहे. 

याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व फिजीशियन आणि इंटेंसिव्हिस्ट डॉ. प्रदीप शेलार सांगतात, "अनियंत्रित उच्च रक्तदाब, म्हणजे हायपरटेन्शन, हे हृदयविकाराचा झटका वाढण्याचे देशातील सर्वात महत्वाचे  कारण आहे कारण  उच्च रक्तदाबाची लक्षणे लवकर दिसून येत नसल्यामुळे, उच्च रक्तदाबाचे अस्तित्व शोधणे कठीण आहे. उच्च रक्तदाब व्यक्तीस हळू हळू मृत्यूच्या दारात घेऊन जातो, म्हणूनच या रोगाला सायलेंट किलर असे म्हणतात.  उच्च रक्तदाबाचे आर्टिरियल नावाच्या धमन्यांचे कनेक्शन आहे. आर्टिरियल्स आपल्या शरीरातील रक्तप्रवाह नियमित करण्यासाठी कार्य करतात. जेव्हा ते पातळ होते, तेव्हा हृदय रक्त पंप पंप करण्यासाठी अधिक प्रयत्न करते. त्यासोबतच नसांमध्ये दबावही लक्षणीय वाढतो. चक्कर येणे, घबराट होणे, घाम येणे आणि झोपेची तीव्रता उच्च रक्तदाबची लक्षणे असू शकतात. परंतु ही लक्षणे इतकी सामान्य आहेत की ९० टक्के नागरिक या लक्षणांकडे हमखास दुर्लक्ष करतात तर कधी कधी नकळत दुर्लक्ष होते. 

लोकांमध्ये रक्तदाबाबद्दल अनेक संभ्रम आहेत आणि योग्य ज्ञानाअभावी अनेक नागरिक  रक्तदाब योग्य ठेवण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यास अयशस्वी ठरतात. गेल्या वर्षी ६ एप्रिलला कोरोना भारतात आल्यानंतर मधुमेह व उच्च रक्तदाब याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले होते व ही भीती रास्तही होती. कोरोना भारतात आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच " मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना कोरोनाचा धोका जास्त " उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांना कोरोनाचा विळखा " अशा प्रकारच्या हेडलाईनमुळे अनेक नागरिकांनी आपला रक्तदाब नियमित तपासणी  सुरु केली तर अनेकांना आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे याचे पहिल्यांदा निदान झाले. कोणत्याही आरोग्य महामारीमध्ये एका ठरावीक वयोगटातील नागरिक भरडले जातात परंतु कोरोनाच्या महामारीमध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांना  कोरोनाची चिंता सतावत आहे."

उच्च रक्तदाब व हृदयविकाराविषयी अधिक माहिती देताना शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, " मधुमेह आणि उच्च-रक्तदाब हे सायलेंट किलर्स आहेत. याची लक्षणं लवकर समजून येत नाहीत. अनेक नागरिकांना आपल्याला मधुमेह, उच्च-रक्तदाब आहे हे माहिती नसते. साधारणत: चाळीशी पर्यत अनेक नागरिक शरीराची नियमित  तपासणी करत नाही. त्यामुळे  मधुमेह, उच्च-रक्तदाब यासारखे आजार  निदान न करताच राहून जातात, त्यामुळे अनेक नागरिकांना हृदयविकाराची लागण होत आहे. उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांना कोरोनाचा धोका जास्त असतो विशेषतः ज्यांना ज्यांना कोरोना झाला त्यांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे घेणे गरजेचे आहे. 

उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांनी सेल्फ मेडिकेशन करणे टाळावे, रक्तदाब नियंत्रणात असेल, तर कोरोना व इतर आजारांची गुंतागुंत होण्याची शक्यता बरीच कमी होते. त्यामुळेच घरच्या घरी नियमितपणे रक्तदाबाची तपासणी करावी व फॅमिली डॉक्टरांचा टेलिफोनिक सल्ला घेऊन रक्तदाब नियंत्रणात ठेवणे हे लॉकडाउन काळामध्ये गरजेचे आहे". जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये . शहरी भागात याचे प्रमाण ६ ते ७ टक्के, तर ग्रामीण भागात ३.५ ते ४ टक्के आहे. वय, अनुवंशिकता, पौष्टिक आहाराचा अभाव तसेच वेळीअवेळी खाणे, स्थुलता, अपुरी झोप, मांसाहाराचे अतिसेवन, तेलकट पदार्थ, तिखट पदार्थ आणि जंक फूड चे अतिसेवन, स्टेरॉइड्सचा वापर  मानसिक ताणतणावआदी घटक उच्च रक्तदाबाचा कारणीभूत ठरतात.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे