Skip to main content

न्यूज अपडेट: सरकारी व खाजगी कोविड हॉस्पिटल मध्ये ICU विभागात सीसी टीव्ही कॅमेरा लावण्यात यावे अशी मागणी रुपालीताई शिंदे यांनी केली:

न्यूज अपडेट: सरकारी व खाजगी कोविड हॉस्पिटल मध्ये ICU विभागात सीसी टीव्ही कॅमेरा लावण्यात यावे अशी मागणी रुपालीताई शिंदे यांनी केली:

पनवेल (प्रतिनिधी) :- तात्काळ कोविड सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल मधील कोविड ICU विभागात सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्याचे आदेश देणे बाबत विनंती मा. सौ रुपाली ताई यांनी मेल द्वारा  मागणी केली आहे, आज देशामध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. महाराष्ट्र राज्यात तर कोरोना विषाणुने हाहाकार माजवला आहे. तसेच नवी मुंबई, मुंबई या ठिकाणी देखील कोरोनाने हैदोस घातला आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांसाठी बेड, रेमडेसिवर, ऑक्सीजन व औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात आपल्या घरच्या व्यक्तींना वाचविण्यासाठी पळापळ धावपळ सुरू आहे. त्यातच सन 2020 पासून कोरोना विषाणूने जिल्ह्यातील अनेक सामान्य गरीब जनतेचे कमरडे मोडलेले असून, हातात पैसे नसल्याने अनेक मध्यमवर्गीय गरीब जनता सरकारी व खाजगी रुग्णालयांची वाट धरीत आहेत. पण याच सरकारी व खाजगी रुग्णालयात कोविड वर उपचार घेत असलेल्या रुग्णाची स्थिती अत्यंत बिकट होत असल्याचे दिसून येत आहे. 

कोरोनाग्रस्त लोकांना रुग्णालयात बेड, ऑक्सीजन, कोविड प्लाझ्मा व रेमडेसिवर उपलब्ध न झाल्याने, अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. तर याच कोविड ICU विभागात कश्या प्रकारे कोरोनावर उपचार करण्यात येतात याची माहिती आता नागरिकांना, हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना असणे गरजेचे आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांना भेटता येत नाही, त्यांना धड पाहता येत नाही. आपला रुग्ण बरा आहे कि कसा आहे याची नातेवाईकांना माहीतही नसते. 20 - 25 दिवस कोरोनावर उपचार करून तरीदेखील रुग्ण आपला प्राण सोडत आहे, का आणि कश्या मुळे? हे जाणून घेणे अंत्यत गरजेचे आहे. कोविड विभागात उपचार घेत असलेला रुग्ण उपचाराला कशाप्रकारे प्रतिसाद देत आहे? डॉक्टर कश्या पद्धतीने उपचार करीत आहे? कोणत्या रुग्णाला काही त्रास जाणवत आहे का किंवा त्याच्या प्रकृती मध्ये काही बिघाड होत आहे का? हे बाहेर वाट बघणाऱ्या त्या रुग्णांच्या नातेवाईकांना माहीत देखिल नसते, त्यात रुग्ण जास्त त्यामुळे डॉक्टरांनाही संबंधित नातेवाईकांना रुग्णांच्या परिस्थिती विषयी सांगणे अवघड झाले आहे.

अश्यावेळी क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या वतीने आपण सदर कोविड हॉस्पिटलांमध्ये कोविड विभागात सीसी टीव्ही कॅमेरा त्वरित लावावा, जेणेकरून आत चाललेल्या घडामोडी रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर लावलेल्या टीव्हीवर पाहता येतील.. आपला रुग्ण बरा आहे, किंवा त्याची प्रकृती खालावत चालली आहे, याविषयी नातेवाईकांना माहिती होईल. आपण याकडे. विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व लवकरात लवकर सदर हॉस्पिटल्सला सी सी टीव्ही ची सोय करावी असे प्रशासनाने आदेश द्यावेत ही अशी विनंती सौ. रूपालीताई शिंदे यांनी केली आहे.









महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे