Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

ब्रेकिंग न्यूज : राज्यात डेल्टा प्लसच्या वाढत्या आजारामुळे अनलॉक मध्ये महत्त्वपूर्ण बदल..!!

ब्रेकिंग न्यूज : राज्यात डेल्टा प्लसच्या वाढत्या आजारामुळे अनलॉक मध्ये महत्त्वपूर्ण बदल..!! नवी मुंबई (प्रतिनिधी/अनंत गोळे) :- आज राज्यभरात  कोरोना दुसरी लाट ओसरल्यानंतर महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण सध्या स्तिथि पाहता २ ते ३ आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याच पाठोपाठ आता कोरोनाचे नवीन रूप डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. डेल्टा प्लसचे रुग्ण काही जिल्ह्यांत आढळून आल्याने आणि त्याची संख्या हळूहळू वाढू लागल्यामुळे काही प्रमाणात पुन्हा निर्बंध घातले जाण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आता आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर केले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ४ जून रोजी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार ५ गटांमध्ये जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी करण्यात आली होती. यामध्ये त्या त्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सीचं

न्यूज अपडेट: हसत हसत जगता यायला हवे: प्रा. जगदीश संसारे ।।

न्यूज अपडेट: हसत हसत जगता यायला हवे: प्रा. जगदीश संसारे ।। मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- शिवकार्यच लय भारी या समुहाने 'संवाद शिवकार्यचा' या उपक्रमांतर्गत विविध वक्त्यांची व्याख्याने आयोजित केली आहेत. सदर व्याख्यानमालेत शुक्रवार दिनांक २५ जून २०२१ रोजी झूम मिटिंगद्वारे ६८ वे पुष्प गुंफताना प्रा. जगदीश संसारे म्हणाले,"समस्यांचा डोंगर प्रत्येकाला चढून जावाच लागतो. आपले दुःख उगाळत बसायला ते काही चंदन नाही. आपल्या प्रत्येकाला हसत हसत जगता यायला हवे." ते पुढे म्हणाले,"आपल्या चेहर्‍यावर नेहमीच हास्य असावे त्यामुळे आपले मन प्रसन्न रहातेच पण समोरचा देखील आपल्याला पाहून क्षणभरासाठी त्याचे दुःख विसरतो." आपल्या मिश्किल संवांदांनी आणि विनोदी कविता सादर करून संसारे यांनी महाराष्ट्रातील १०० हून अधिक रसिकांना मंत्रमुग्ध केले. शिवकार्यच लई भारी समूहाचे संस्थापक दीपक गांगुर्डे, शिवचरित्रकार रोशन गांगुर्डे, कैलास नाथ पाटील, अनिल घव्हाणे, समाधान गांगुर्डे, नंदू पवार, अतुल कासव हे मान्यवर देखील कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. सुखदेव आहेर यांनी सूत्रसंचालन आणि प्रास्ताव

न्यूज अपडेट: नवी मुंबई संभाजी ब्रिगेडच्या जनसंपर्क कार्यालयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा व तसेच नवीन पदांची नियुक्ती:

न्यूज अपडेट: नवी मुंबई संभाजी ब्रिगेडच्या जनसंपर्क कार्यालयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा व तसेच नवीन पदांची नियुक्ती : नवी मुंबई (प्रतिनिधी/संतोष शिरावले) :-  रविवारी दिनांक २७ जून रोजी नवी मुंबई संभाजी ब्रिगेडच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री ॲड. मनोजदादा आखरे साहेब व प्रदेश महासचिव शिवश्री सौरभ दादा खेडेकर साहेब, शिवश्री अण्णासाहेब सावंत प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शिवश्री डॉ. योगेश पाटील ठाणे विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शिवश्री संदीपजी बारड साहेब केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, शिवश्री मारुती शंकर खुटवड जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई व जनार्दन चंद्रकांत शिरावले महानगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारणी व महानगर कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मीटिंग मध्ये मराठा समाजाचे ओबीसीकरण व ओबीसी आरक्षणाला संरक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यावर तातडीची मीटिंग घेण्यात आली. संभाजी ब्रिगेड नवी मुंबईत नवीन पद नियुक्ती- तसेच, शिवमती रुपाली मोहन वाघमारे जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण

न्यूज अपडेट: विकासकाचा बाप ही मूळझोपडी धारकांचे काहीही वाकडे करू शकणार नाही; डॉ. राजन माकणीकर:

न्यूज अपडेट: विकासकाचा बाप ही मूळझोपडी  धारकांचे काहीही वाकडे करू शकणार नाही; डॉ. राजन माकणीकर: नवी मुंबई (प्रतिनिधी/आनंत गोळे) :- नोटीस पाठवून पुनरावलोकन करण्यात येत आहे, मात्र: कोणीही पुनरावलोकन करण्यास उपस्थित राहू नये, विकासकच काय तर त्याचा बापही मूळ झोपडी धारकांचे काहीही वाकडे करू शकणार नाही असे आवाहन डॉ. राजन माकणीकर यांनी केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर पुढे म्हणाले की, आकृती/हब टाऊन विकासक विमल शहाची मर्जी राखण्यासाठी मंत्री स्तरीय आदेशाचे पालन करण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाचे सर्व अधिकारी विकासकांचे गुलाम झाले आहेत. आकृती/हबटाऊन विकासकाने मंजूर परिशिष्ट-२ मधील २३३ पात्र झोपडीधारकांच्या पात्रतेवर आक्षेप घेतल्या मूळे पात्र झोपडी धारकांच्या पात्रतेचे पुनरावलोकन होण्याची नोटीस नुकतीच बजावण्यात आली आहे. हे कृत्य फार निंदनीय आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक अश्या पीडित, वंचित मूळ झोपडी धारका सोबत असून काहीही झाले तर पुनरावलोकणास उपस्तिथ राहू नये असे आवाहन त्यांनी केले असून पुनरावलोकन थांबवून थकीत भाडे धनादेश व सदनि

न्यूज अपडेट: केंद्र सरकारन कडून पेन्शनधारक आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देणारा निर्णय:

न्यूज अपडेट: केंद्र सरकारन कडून पेन्शनधारक आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देणारा निर्णय: नवी मुंबई (रूपाली वाघमारे) :-  केंद्र सरकारनं पेन्शनधारक आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देणार निर्णय घेतला आहे. एखाद्या पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला पेन्शनसाठी करावी लागणारी धावपळ कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेन्शनसंदर्भातील नियम शिथील करण्यात आले आहेत. पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर निवडक कागदपत्र जमाक करुन त्यांचे नातेवाईक मासिक पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. कौटुंबिक पेन्शन संदर्भातील प्रकरण लवरकरात लवकर सोडवण्यासाठी सरकारनं बँकाना देखील निर्देश दिले आहेत. कौटुंबिक पेन्शन मिळणाऱ्या कुटुंबातील पती आणि पत्नीला विविध कागदपत्र जमा करावी लागतात. याशिवाय अन्य काही बाबी पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे पेन्शन संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ निघून जातो. या समस्या दूर करण्यासाठी मनुष्यबळ आणि पेन्शन मंत्रालयाच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागानं बँकांना लवकरात लवकर नियमांमध्ये बदल करण्यास सांगितलं आहे. काही कागदपत्रांची पूर्तता- पती आणि पत्नी, किंवा पेन्शनधारकाच

न्यूज अपडेट: जयश्री चौधरी यांनी दिले "दान कवितेचे"..!!

न्यूज अपडेट: जयश्री चौधरी यांनी दिले "दान कवितेचे"..!! मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- जयश्री चौधरी यांच्या "दान कवितेचे" या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मुंबईच्या अनुयोग शिक्षण संस्थेच्या दाभोळकर सभागृहात दिमाखात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती आणि दीप पूजनाने झाली. प्रकाशन सोहळ्यास अनुयोग शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा सतिशचंद्र चिंदरकर हे अध्यक्ष तसेच सुप्रसिद्ध लेखक आणि कवी महेश घाटपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. मान्यवरांच्या कविता आणि विचार यांनी कार्यक्रम कायम स्मरणात राहील असा झाला. सृजनसवांद प्रकाशनने सदर काव्यसंग्रहाच्या निर्मितीस न्याय दिला आहे. सुरेख बांधणी आणि उत्तम कागद तसेच छपाईमुळे पुस्तक सुंदर झाले आहे. सदर काव्यसंग्रहाचे  मुखपृष्ठ तेज वाघ यांनी तयार केले आहे. तर ख्यातकीर्ती नी. ना. श्रीखंडे यांनी त्यांच्या ओघवत्या लेखणीच्या सहाय्याने लक्षवेधक प्रस्तावना लिहिली आहे.  महेश घाटपांडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम कविता कशी असते याचा आढावा घेऊन "दान कवितेचे" ह्या काव्यसंग्रहातील वैविध्यपूर्ण कवितांची त्यांच्या नेहमीच्य

न्यूज अपडेट: नवीन पनवेल येथील शाळेची फी न भरल्याने 300 विद्यार्थी केले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित:

न्यूज अपडेट: नवीन पनवेल येथील शाळेची फी न भरल्याने 300 विद्यार्थी केले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित: ● नवीन पनवेल येथील मुजोर शाळेने 300 विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून केले वंचित, फी साठी जाब विचारायला गेलेल्या पालकांना शाळेच्या आवारात कोंडलं ● कोव्हीडच्या या महामारीच्या काळात शाळेची फी वाढ न करण्याचा राज्य सरकारने आदेश दिला असताना देखील बर्‍याच शाळांकडून याला केराची टोपली दाखवली जात आहे पनवेल (प्रतिनिधी) :- कोव्हीडच्या या महामारीच्या काळात शाळेची फी वाढ न करण्याचा राज्य सरकारने आदेश दिला असताना अनेक शाळांकडून याला केराची टोपली दाखवली जात आहे. नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेने तर फी न भरणाऱ्या 300 विद्यार्थ्यांना ॲानलाईन शिक्षणातून बाहेर काढल्याचा आरोप पालकांनी केलाय. याबाबत पालकांनी 26 जून रोजी सकाळी 8 वाजता शाळेत जाऊन विचारपूस केली असता शाळा प्रशासनाकडून पालकांनाच शाळेच्या आवारात बंद करून ठेवले गेले. फी बाबत काही तो निर्णय घ्या आणि नंतरच शाळेच्या बाहेर जा, असा अजब प्रकार शाळेने केला आहे. काय प्रकार घडला शाळेत..?? शाळेच्या मुख्य गेटलाच कुलूप लावल्याने शाळेत गेलेल्या पालकांना बाहेर जाता

न्यूज अपडेट: देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल बाळगणाऱ्या नेपाळी नागरिकास अटक..!

न्यूज अपडेट: देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल बाळगणाऱ्या नेपाळी नागरिकास अटक..! नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :-  तुर्भे येथील आंबेडकरनगर परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर, नेपाळ देशातुन आलेल्या नागरिकाने देशी बनावट लोखंडी पिस्टल विनापरवाना बाळगले होते, त्यामुळे तुर्भे पोलिसांनी ह्या आरोपीला विनापरवाना पिस्टल हाताळल्या बद्दल ताब्यात घेतले. राजबहादूर तुलबहादूर थापा असे ह्या आरोपीचे नाव असून तो बिगारी काम करतो. त्याच्याकडे देशी बनावटीचा लोखंडी पिस्टल असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना बातमीदारातर्फे मिळाली. या बाबत खात्री करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला व सदर ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले व त्याची झडती घेण्यात आली. व आरोपीजवळ पिस्टल मिळाले आणि तुर्भे पोलिसांनी आरोपीस अटक केली. आरोपी थापा हा आता पोलीस कोठडीत असून सदर घटनेबाबत अधिक तपास  सहकारी पोलीस निरीक्षक पवन नांद्रे करतअसल्याचे तुर्भे पोलिसांनी सांगितले आहे. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

न्यूज अपडेट: कोपरखैरणे येथे इमारतीवर चढून आत्माहत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश:

न्यूज अपडेट: कोपरखैरणे येथे इमारतीवर चढून आत्माहत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश: नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- कोपरखैरणे येथील एक तरुणी आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या धोकादायक ठिकाणी जाऊन बसली असता, अग्निशमन दलाला ह्या मुलीला वाचवण्यात यश आले आहे.   सुमारे दोन तास ही तरुणी इमारतीच्या कडेच्या ठिकाणी उभी होती तिची मनधरणी करूनही ती ऐकायला तयार नव्हती अखेर जवानांनी तिला सुखरूपपणे बाहेर काढली व तिचे प्राण वाचवले. कोपरखैरणे सेक्टर २ येथील इमारतीच्या दुसऱ्या बाजूच्या मजल्यावर राहणारी तरुणी बाल्कनी बाहेरील धोकादायक ठिकाणी जाऊन तिथे बसली होती. ह्याबाबतची माहिती मिळताच ऐरोली व कोपरखैरणे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्या मुलीची समजूत काढू लागले. तिची अनेकदा समजून काढून सुद्धा ऐकत नसल्याने अग्निशमन दलाची दुसरी टीम इमारतीच्या खाली राहून तिला धीर देत होते. वाशी अग्निशमन दलाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरोषात्तम जाधव ह्यांनी त्या तरुणीकडे झेप घेतली व तिची समजूत काढली. त्यांच्या पाठोपाठ कोपरखैरणे अग्निशमन दलाचे विवेक कलगुटकर व ऐरोली दलाचे मह

न्यूज अपडेट: डेल्टा प्लसमुळे राज्यात सोमवारपासून निर्बंध लागू..!!

न्यूज अपडेट: डेल्टा प्लसमुळे राज्यात सोमवारपासून निर्बंध लागू..!! पनवेल (प्रतिनिधी) :- राज्यात हळूहळू कोरोना परिस्थिती नियंत्रणात येते असली तरी डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. देशात सर्वाधिक डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीत बदल केला आहे. या नियमावलीनुसार सोमवारपासून राज्यातील सर्व जिल्हे पाच टप्प्यापैकी तिसऱ्या टप्प्यात असणार आहे. म्हणजेच तिसऱ्या टप्प्यातील नियम संपूर्ण राज्यात सोमवारपासून लागू होणार आहेत. राज्यातील कोणताही जिल्हा तिसऱ्या टप्प्याच्या खाली नसणार आहे. म्हणजेच आता राज्य आता मिनी लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान राज्यातील जिल्ह्याची विभागणी पाच टप्प्यात होत होती. दर शुक्रवारी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पाच टप्प्यात विभागले जात होते. त्याचप्रमाणे आज देखील आढावा घेऊन सरकारने जारी केलेल्या नियमावलीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला गेला. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू होणार आहे. म्हणजे सर्व जिल्ह

न्यूज अपडेट - भूमिपुत्रांचा निश्चय आहे ठाम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव:

न्यूज अपडेट - भूमिपुत्रांचा निश्चय आहे ठाम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- दि .बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळास देण्यात यावे अशी मागणी आज लाखोंच्या संख्येने भुमीपूत्रांनी सिडकोच्या घेराव आंदोलनात आज सहभागी होते. तसेच, १५ ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव मिळालं नाही तर १६ तारखेपासून विमानतळाचं काम बंद पाडू असा इशारा आंदोलकांनी मंचावरून घोषणा करत दिला. नवी मुंबईतील आंदोलकांच्या शिष्टमंडळानं सिडको भवनला जाऊन निवेदन दिलं. शिष्टमंडळाने सिडको मुख्यालयात सिडकोचे व्यवस्थापकी (MD) संचालक संजय मुखर्जी यांची भेट घेवून भूमिपुत्रांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आमदार गणपत गायकवाड , माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार सुभाष भोईर, आमदार महेश बालदी, कृती समितीचे सदस्य दशरथ भगत, जे.डी. तांडेल, भूषण पाटिल आदि उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरण संदर्भात केलेला ठराव रद्द करावा आणि लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने नवीन ठराव करावा अशा प्रकारची मागणी शिष्टमंडळाने सिडकोकडे केली. 24 जून लोकनेते

न्यूज अपडेट: ना. देसाईंचा महाचोर विकासक विमल शहाला वरद..?? जनता झाली गारद..!!

न्यूज अपडेट: ना. देसाईंचा महाचोर विकासक विमल शहाला वरद..?? जनता झाली गारद..!! उद्योगमंत्री साहेब पुनर्वसन प्रकल्पाकडे लक्ष द्या- डॉ. राजन माकणीक नवी मुंबई (प्रतिनिधी/उमेश खांदेकर) :- आकृती हब टाऊन विकासक विमल शहा ला उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्या वरद आहे की काय? मूळ झोपडीधारक गारद झाला असताना, विकासकांची मुजोरी वाढत आहे अन  मंत्री महोदय चुप्प का आहेत. असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसार माध्यमांना विचारला आहे. १५ ते २० वर्षा आधी आकृती हब टाऊन विकासकाने परिशिष्ट बनवून एमआयडीसी ने पात्र ठरवून झोपडी धारकांना सदनिकेचा ताबा देण्यात आला आहे. मात्र; आकृती/हबटाऊन विकासकाने मंजूर परिशिष्ट-२ मधील १३३ पात्र झोपडीधारकांच्या पात्रतेवर आक्षेप घेतल्या मूळे पात्र झोपडी धारकांच्या पात्रतेचे पुनरावलोकन होण्याची नोटीस नुकतीच बजावण्यात आली आहे. हे कृत्य निंदनीय आहे. विकासक विमल शहाच्या सांगण्याहून उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसी प्रशासनाला पुनरावलोकनाचे तोंडी आदेश दिले आहेत, आहेत आणि कोणी आमचे बिघडवू शकत नाहीत अशा अफवांचे पेव विकासकाचे दलाल प

न्यूज अपडेट: शब्द शंकरपाळी साहित्य समूहाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण..!!

न्यूज अपडेट: शब्द शंकरपाळी साहित्य समूहाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण..!! नवी मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- मराठी साहित्य क्षेत्रातील मुंबईतील "शब्द शंकरपाळी साहित्य समूह" यांच्या बोध चिन्हाचे (लोगो) नुकतेच ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले असे समूहाचे संस्थापक भूषण सहदेव तांबे यांनी ऑनलाईन जाहीर केले. या अप्रतिम बोधचिन्हासह समूह तांबे यांनी एक घोषवाक्य सुध्दा जाहीर केले. "शब्दालंकाराचे कौशल्य" असे हे एकमेव आणि आकर्षक घोषवाक्य या बोधचिन्हाला देण्यात आले आहे. प्रकाशन होताच या बोधचिन्हाचे सर्व स्तरावरून खूप कौतुक करण्यात येत आहे. शब्द शंकरपाळीसाठी मिळालेली ही नवी ओळख त्याचे नावलौकिक अजून उच्च स्तरावर नेईल यात कोणतीच शंका नसेल अशी आशा तांबे यांनी व्यक्त केली आहे.  या बोधचिन्हाची निर्मिती विघ्नेश पाष्टे, रत्नागिरी यांनी तर घोषवाक्य भूषण सहदेव तांबे यांनी केले. अवंतिका महाडिक यांच्या पुढाकाराने आणि नेतृत्वाने हे कार्य यशस्वी होण्यास फार मोठे सहकार्य लाभले, असे तांबे यांनी नमूद केले आहे. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम

न्यूज अपडेट: नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी २४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी; आत्मदहन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही:

न्यूज अपडेट: नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी २४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी; आत्मदहन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही: ● मुख्यमंत्र्यांनी लोकभावना समजूनच घेतल्या नाहीत दिबासाहेबांच्या नावासाठी संघर्षाचा लढा कायम राहणार २४ जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी ; वेळ पडल्यास आत्मदहन आंदोलन दडपण्यासाठी पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर असेल तर आम्ही रिॲक्शन मोडवर असणार  पनवेल (प्रतिनिधी/किरण पवार) :- रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हहामुळे दुसऱ्या फेरीची चर्चाही फिसकटली आहे . त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला त्यांचा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी घेतलेली हि भूमिका प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त गावांवर अन्यायकारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या या हेकेगिरी भूमिकेला आमचा प्रखर विरोध असून प्रकल्पग्रस्ताचे लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी घोषित दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने दिनांक २१ जून रोजी आयोजित करण्यात आलेले पत्रकार परि

न्यूज अपडेट: महापालिकेची खारघरमधील बोगस डॉक्टरवर कारवाई..!!

न्यूज अपडेट: महापालिकेची खारघरमधील बोगस डॉक्टरवर कारवाई..!! पनवेल (प्रतिनिधी) :-  खारघर मधील सेक्टर १५ येथील खारघर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका बोगस डॉक्टरवरती पनवेल महानगरपालिका आणि पोलिस दलाच्यावतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. खारघर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात निवासी वैद्यकिय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या बोगस डॉक्टरवरती आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या परवानगीने मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील डॉ. भक्तराज भोईटे, डॉ.सुरेश पंडित, विजय महाले, स्टाफ नर्स संगीता पाटील, विकास तीरगुळ यांच्या मदतीने सापळा रचून बोगस डॉक्टरला पकडण्यात आले.  खारघर पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्त स्टींग ऑपरेशन करून बोगस डॉक्टरवरती कारवाई करण्यात आली. सदर डॉक्टरकडे वैद्यकिय व्यवसाय करण्याचा परवाना नसल्याचे सिध्द झाल्याने खारघर पोलिस स्थानकांमध्ये या डॉक्टरवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णाल

न्यूज अपडेट: २१ जून २०२१ जागतिक योग दिवस आणि जागतिक संगीत दिवस :

न्यूज अपडेट: २१ जून २०२१ जागतिक योग दिवस आणि जागतिक संगीत दिवस : नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- २१ जून या दिवशी कौन्सिलिंग सायकोलॉजिस्ट डॉक्टर अलका नाईक यांचा मानसिक स्वास्थ्य- (मेंटल हेल्थ) या विषयावर NPAFinc कॅनडा, या टीव्ही चॅनल वर तिसऱ्यांदा इंटरव्यू आणि मार्गदर्शनपर भाषण झाले.२० देशांमध्ये १४ पेक्षा जास्त चॅनल्सवर हे प्रसारित झाले. अशाप्रकारे तीन वेळा आमंत्रित केल्या  जाणाऱ्या  या  पहिल्याच व्यक्ती आहेत असे एन पी ए एफ चे फाउंडर डायरेक्टर डॉक्टर प्रणव यांनी सांगितले. समाज कल्याणासाठी डॉ. अलका नाईक यांनी वेग वेगळ्या संस्थांमार्फत आजवर अनेक कामे केलेली आहेत आणि त्याबद्दल त्यांना पाऊणशे पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यासंदर्भात बोलताना डॉक्टर  प्रणव म्हणाले की मॅडमचे कार्य शैक्षणिक, स्वास्थ्य, सामाजिक साहित्यिक, सांस्कृतिक, अशा सर्वच विविध पातळ्यांवर असल्यामुळे त्यांचा अनुभव दांडगा आहे म्हणूनच आजच्या कोरोना कालावधीमध्ये सुद्धा त्यांचे हेल्थ कौन्सिलिंगचे कार्य अतिशय जोरात चालू आहे, त्यासाठी त्यांना  "कोरोना योद्धा" म्हणून दोन वेळा पुरस्कृत करण्यात आले आहे. आत्ताच त्यांना

न्यूज अपडेट: नवी मुंबई अंतराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं - राज ठाकरे :

न्यूज अपडेट: नवी मुंबई अंतराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं - राज ठाकरे : नवी मुंबई (प्रतिनिधी) :- नवी मुंबई विमातनतळ नामकरणावरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा निर्णय घेतला असताना स्थानिकांकडून दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत आहे. दरम्यान या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं असून नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं असं मत मांडलं आहे. आमदार प्रशांत ठाकूर तसंच इतरांनी भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आहे. तर बाळासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यातून संघर्ष होत असून पाठिंबा मागण्यासाठी माझ्याकडे प्रशांत ठाकूर आले होते,” अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. “कोणतंही विमानतळ जेव्हा येतं तेव्हा ते शहराच्या बाहेर येतं. त्यामुळे तेव्हाच्या मुंबईप्रमाणे ते सांताक्रूझमध्ये आलं. नंतर वाढवत ते सहारपर्यंत गेलं आणि त्याला सांताक्रूझ आणि सहार विमानतळ असं नाव मिळालं. नवी

न्यूज अपडेट: अंबिका कुटीर योगतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा:

न्यूज अपडेट: अंबिका कुटीर योगतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा: ● रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम व योगासने महत्वाची - रामचंद्र सुर्वे ठाणे (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :-  आज संपूर्ण जगात कोरोना महामारीचे संकट असतांना योगाभ्यासाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जगाने योगाला राजमान्यता दिली आहे. आपण शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर दिला पाहिजे. सर्वांनी आत्मनिर्भर बनले पाहिजे.  आजच्या काळात दररोज योगसाधना, नियमित व्यायाम आणि योगासन करणे गरजेचे आहे. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्यायाम व योगासने करणे महत्वाचे आहे. असे स्पष्ट प्रतिपादन अंबिका कुटीर योगचे सचिव  रामचंद्र सुर्वे यांनी योगदिनी व्यक्त केले.  आज ठाणे येथील अंबिका कुटीर योगमध्ये भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार  ऑनलाईनद्वारे आंतरराष्ट्रीय योगदिन संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील कुलकर्णी यांनी केले.याप्रसंगी रामचंद्र सुर्वे यांनी आपल्या मार्गदर्शनात पुढे सांगितले की, गेली ५५ वर्षे आम्ही हठयोगी निकम गुरुजी यांनी स्थापन केलेल्या अंबिका कुटीर योगतर्फे देश विदेशात

न्यूज अपडेट: विमल व मुर्जी यांना अटक करवण्यासाठी डेमोक्रॅटिक रिपाइंचे पावसाळी अधिवेषणावर "दे धडक बे धडक" धरणे आंदोलन:

न्यूज अपडेट: विमल व मुर्जी यांना अटक करवण्यासाठी डेमोक्रॅटिक रिपाइंचे पावसाळी अधिवेषणावर "दे धडक बे धडक" धरणे आंदोलन: आता नाही तर कधीच नाही.: डॉ. राजन माकणीकर- मुंबई (प्रतिनिधी) :- महाठग विमल शहा ची मस्ती व महादलाल मुर्जी पटेल च्या दादागिरीला लगाम घालून यांना अटक करवून प्रकल्पापासून वंचित पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पावसाळी अधिवेषणावर "दे-धडक बे-धडक" धरणे आंदोलनात करणार असल्याची माहिती डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत आकृती / हब टावून विकासक महाचोर विमल शहा व याचा मास्टरमाइंड महादलाल मुर्जी पटेल यांनी एमआयडीसी च्या तत्कालीन भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून अंदाजे १० हजार रुपये करोडोंचा महाघोटाला केला आहे. याचे सबलपुरावे व वंचितांच्या  तक्रारी आमच्याकडे उपलब्ध असल्याचे डॉ माकणीकर यांनी सांगितले. प्रकल्पाला चालू होऊन वीस वर्षे झाली, मात्र: आजही शेकडो मूळ झोपडी धारकांना सदनिका व भाडे धनादेशापासून वंचित ठेवले आहे. आकृती हब टाऊन विकासकाने ज्या-ज्या ठिकाणी प्रकल्प राबवले आहेत त्या-त्या ठिक

न्यूज अपडेट: राष्ट्रीय वाचन सोहळ्यात मालवणची श्रावणी खोत चमकली..!!

न्यूज अपडेट: राष्ट्रीय वाचन सोहळ्यात मालवणची श्रावणी खोत चमकली..!! मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अध्यादेशाला अनुसरून शनिवार दिनांक १९ जून २०२१ रोजी ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार पश्चिम यांच्या मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य असा राष्ट्रीय स्तरावर आंतरमहाविद्यालयीन वाचन दिन संपन्न झाला. गुगल मीटवर आयोजित केलेल्या या सुरेख वाचन सोहळ्यात मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक आणि स्तंभलेखक सॅबी परेरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  देशभरातील वाचन प्रेमींना संबोधित करताना सॅबी परेरा म्हणाले, "फेसबुक, वॉटस् अप इत्यादी समाज माध्यमांवर सामायिक  झालेले साहित्य वाचल्यामुळे फारतर वाचक समाज निर्माण होईल परंतु ग्रंथांचे आणि पुस्तकांचे वाचन केले तरच वाचन संस्कृती निर्माण होऊन समाजाचे उन्नयन होईल." ते पुढे म्हणाले,"तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केवळ शासनाने करावे असे नाही, तर ती जबाबदारी पालकांनी आणि ज्ञानदीप मंडळा सारख्या संस्थांनी स्वीकारायला हवी.&

न्यूज अपडेट: लॉकडाउनमुळे नवी मुंबईतील जेष्ठ नागरिकांचे वाढले वजन..!!

न्यूज अपडेट: लॉकडाउनमुळे नवी मुंबईतील जेष्ठ नागरिकांचे वाढले वजन..!! ● वाढत्या वजनाने जेष्ठ नागरिकांमध्ये वाढल्या आरोग्याच्या तक्रारी नवी मुंबई (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- कोरोना संक्रमणामुळे गेल्या दीड वर्षांपासून आपण सर्वजण घरामध्ये अडकून पडलो आहोत व याचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर झाले असून याचा सर्वात जास्त फटका जेष्ठ नागरिकांना बसला आहे. आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानंतर सरतं आयुष्य सुसह्य, शांत आणि समाधानी करायचं अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु लॉकडाउन काळामध्ये जेष्ठ नागरिकांना  सर्वात जास्त मानसिक व शारीरिक त्रास झाला आहे असे अनेक निरिक्षणातून आपल्याला दिसून आले आहे. नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार नवी मुंबईतील  ३० ते ४० टक्के जेष्ठ नागरिकांचे वजन वाढले असून यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे अस्थी व्यंग तज्ञ व शल्यविशारद डॉ समीर चौधरी म्हणाले, " एक जून पासून तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे कोरोना नियमांचे पालन करून जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्यव

न्यूज अपडेट: नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकेनेत दि. बा. पाटील ह्यांचे नाव देण्याची मागणी पंचमहाभूत संघटनेने खा. उदयनराजे ह्यांना केले निवेदन:

न्यूज अपडेट: नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकेनेत दि. बा. पाटील ह्यांचे नाव देण्याची मागणी पंचमहाभूत संघटनेने खा. उदयनराजे ह्यांना केले निवेदन: नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरण विषयावर गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी आपले मत ठामपणे, मांडत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील ह्यांचे नाव लागावे ह्यासाठी वाटचाल सुरू केली आहे आणि तशी शिफारस देखील राज्य सरकारला केली आहे. गुरुवार दिनांक १७ रोजी आंदोलनात सहभागी असलेल्या पंचमहाभूत संघटनेतील गणेश पाटील, रुपेश धुमाळ, सर्वेश तरे ह्या तीन सदस्यांनी  नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा.पाटील ह्यांचे नाव देण्याची मागणी करत, सातारा जिल्ह्याचे खासदार छत्रपती  उदयनराजे भोसले यांना निवेदन केले आहे. मुंबई, ठाणे,रायगड, पालघर ह्या चार जिल्ह्यांतील सर्वच समाजातील व्यक्तती, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, अनेक संघटना देखील नवी मुंबई अंततरराष्ट्रीय विमानतळाला लोकेनेते दि.बा. पाटील ह्याचे नाव द्यावे ह्यासाठी  आपला सहभाग दाखवत आहेत. लोकेनेते दि. बा. पाटील

न्यूज अपडेट: मुंबई विद्यापीठ कुलगुरू यांच्या राजीनाम्यासाठी आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन चे उपोषण :

न्यूज अपडेट: मुंबई विद्यापीठ कुलगुरू यांच्या राजीनाम्यासाठी आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन चे उपोषण : मुंबई (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील एक महत्त्वाची विद्यार्थी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन संघटनेच्या वतीने दिनांक १७ जून २०२१ पासून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या अकार्यक्षम कार्यप्रणाली विरोधात उपोषणास सुरुवात होणार आहे. मुंबई महानगर, उपनगर व कार्यक्षेत्रातील महाविद्यालयीन प्रश्नासंदर्भात आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन ने कुलगुरू व कुलसचिव यांना वेळोवेळी तक्रार अर्ज दाखल केलेले आहेत. परंतू कुलगुरू व कुलसचिव यांच्या कडून हेतूपुरस्सर व जाणिवपूर्वक संघटनेने वारंवार केलेल्या तक्रार व कारवाईच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचबरोबर नियमबाह्य कार्यप्रणाली व गुंडगिरीच्या जोरावर महाविद्यालय ताब्यात घेणा-या प्राचार्य यांना अभय देण्याचा जो पायंडा पाडला जात आहे त्याविरोधात आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन कडून सनदशीर मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंब केला जाणार आहे. मुंबई विद्यापीठ कुलगुरू हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या प्राचार्य यांना अभय देत आहेत हे सिध्द होत असल्या

न्यूज अपडेट: डॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास..!!

न्यूज अपडेट: डॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा ; ६७ लाखांचा ऐवज लंपास..!! लोणावळा (प्रतिनिधी) :- येथील प्रधानपार्क येथे डाॅक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर गुरुवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यामध्ये ५० लाख रुपये रोख व दागिने असा साधारण ६६ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळविला आहे. गुरुवारी पहाटे २.३० वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा पडला. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लायडिंगची खिडकी खोलून सहा जण धारदार शस्त्रांसह घरात घुसले तर अन्य काही जण घराबाहेर थ‍ांबले होते. डाॅक्टर खंडेलवाल यांच्या बेडरुमचा दरवाजा उघडा असल्याने दरोडेखोर थेट घरात घुसले. त्यांनी डाॅक्टर व त्यांच्या पत्नी यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावत हात पाय बांधत घरातील सर्व रोख रक्कम व सोनं असा ऐवज त्यांच्या समक्ष लुटला. साधारण अर्धा तासाहून अधिक काळ दरोडेखोर घरात होते. यानंतर गच्चीवरून चादर बांधत ते खाली उतरले व लंपास झाले. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा