न्यूज अपडेट: नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकेनेत दि. बा. पाटील ह्यांचे नाव देण्याची मागणी पंचमहाभूत संघटनेने खा. उदयनराजे ह्यांना केले निवेदन:
न्यूज अपडेट: नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकेनेत दि. बा. पाटील ह्यांचे नाव देण्याची मागणी पंचमहाभूत संघटनेने खा. उदयनराजे ह्यांना केले निवेदन:
नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरण विषयावर गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी आपले मत ठामपणे, मांडत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील ह्यांचे नाव लागावे ह्यासाठी वाटचाल सुरू केली आहे आणि तशी शिफारस देखील राज्य सरकारला केली आहे. गुरुवार दिनांक १७ रोजी आंदोलनात सहभागी असलेल्या पंचमहाभूत संघटनेतील गणेश पाटील, रुपेश धुमाळ, सर्वेश तरे ह्या तीन सदस्यांनी नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा.पाटील ह्यांचे नाव देण्याची मागणी करत, सातारा जिल्ह्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवेदन केले आहे. मुंबई, ठाणे,रायगड, पालघर ह्या चार जिल्ह्यांतील सर्वच समाजातील व्यक्तती, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, अनेक संघटना देखील नवी मुंबई अंततरराष्ट्रीय विमानतळाला लोकेनेते दि.बा. पाटील ह्याचे नाव द्यावे ह्यासाठी आपला सहभाग दाखवत आहेत.
लोकेनेते दि. बा. पाटील ह्यांची कार्ये फार महान आहेत. त्यांनी कोकण-ठाणे विभागातच नव्हे तर महाराष्ट्रभर-देशभर कार्ये केली आहेत.म्हणून नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे अशी मागणी ह्या निवेदनात केली गेली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्याबद्दल नितांत आदर आहे परंतु त्यांचे नाव महाराष्ट्रातील इतर मोठ्या प्रकल्पांना देण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. याबाबत खा. उदयन राजे ह्यांनी आपला सकारात्मक प्रतिसाद दाखवला असून, "घाबरायचं नाही आगरी आहात तुम्ही, आपली सारी पोरं आगरी आहेत आणि दिबांचे कार्य मोठे आहे" अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सदर विषयासंदर्भात लवकरच ते बोलणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.