न्यूज अपडेट: २१ जून २०२१ जागतिक योग दिवस आणि जागतिक संगीत दिवस :
नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- २१ जून या दिवशी कौन्सिलिंग सायकोलॉजिस्ट डॉक्टर अलका नाईक यांचा मानसिक स्वास्थ्य- (मेंटल हेल्थ) या विषयावर NPAFinc कॅनडा, या टीव्ही चॅनल वर तिसऱ्यांदा इंटरव्यू आणि मार्गदर्शनपर भाषण झाले.२० देशांमध्ये १४ पेक्षा जास्त चॅनल्सवर हे प्रसारित झाले. अशाप्रकारे तीन वेळा आमंत्रित केल्या जाणाऱ्या या पहिल्याच व्यक्ती आहेत असे एन पी ए एफ चे फाउंडर डायरेक्टर डॉक्टर प्रणव यांनी सांगितले. समाज कल्याणासाठी डॉ. अलका नाईक यांनी वेग वेगळ्या संस्थांमार्फत आजवर अनेक कामे केलेली आहेत आणि त्याबद्दल त्यांना पाऊणशे पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यासंदर्भात बोलताना डॉक्टर प्रणव म्हणाले की मॅडमचे कार्य शैक्षणिक, स्वास्थ्य, सामाजिक साहित्यिक, सांस्कृतिक, अशा सर्वच विविध पातळ्यांवर असल्यामुळे त्यांचा अनुभव दांडगा आहे म्हणूनच आजच्या कोरोना कालावधीमध्ये सुद्धा त्यांचे हेल्थ कौन्सिलिंगचे कार्य अतिशय जोरात चालू आहे, त्यासाठी त्यांना "कोरोना योद्धा" म्हणून दोन वेळा पुरस्कृत करण्यात आले आहे.
आत्ताच त्यांना आय पी ए चा Best Humanitarian Award चा सन्मान मिळाला आहे. आदर्श शिक्षक पुरस्कार, हिरकणी पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार असे अनेक राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. त्या एक शिक्षक पत्रकार, संपादिका, समाजसेविका, कवयित्री, लेखिका, मेंटल हेल्थ कौन्सिलर इत्यादी विविध कार्ये विविध संस्थांबरोबर करत आहेत. प्रचंड आत्मविश्वास आणि सेवावृत्ती असल्यामुळे हे सर्व शक्य होते असे त्या म्हणाल्या आल्या दुसऱ्यांना मदत करून जे मानसिक समाधान मिळते त्याचा आनंद सर्वानी घ्यावा आणि स्वतःला सक्षम बनवावे, आजच्या परिस्थितीत तर हे अत्यंत आवश्यक आहे. जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींचा,थोरांचा आदर करावा आणि शिकण्याची प्रवृत्ती कायम ठेवावी, नैसर्गिक संपत्तीचा जपून वापर करावा असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.