न्यूज अपडेट: देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल बाळगणाऱ्या नेपाळी नागरिकास अटक..!
नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- तुर्भे येथील आंबेडकरनगर परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर, नेपाळ देशातुन आलेल्या नागरिकाने देशी बनावट लोखंडी पिस्टल विनापरवाना बाळगले होते, त्यामुळे तुर्भे पोलिसांनी ह्या आरोपीला विनापरवाना पिस्टल हाताळल्या बद्दल ताब्यात घेतले.
राजबहादूर तुलबहादूर थापा असे ह्या आरोपीचे नाव असून तो बिगारी काम करतो. त्याच्याकडे देशी बनावटीचा लोखंडी पिस्टल असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना बातमीदारातर्फे मिळाली. या बाबत खात्री करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला व सदर ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले व त्याची झडती घेण्यात आली. व आरोपीजवळ पिस्टल मिळाले आणि तुर्भे पोलिसांनी आरोपीस अटक केली. आरोपी थापा हा आता पोलीस कोठडीत असून सदर घटनेबाबत अधिक तपास सहकारी पोलीस निरीक्षक पवन नांद्रे करतअसल्याचे तुर्भे पोलिसांनी सांगितले आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.