Skip to main content

न्यूज अपडेट: केंद्र सरकारन कडून पेन्शनधारक आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देणारा निर्णय:

न्यूज अपडेट: केंद्र सरकारन कडून पेन्शनधारक आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देणारा निर्णय:

नवी मुंबई (रूपाली वाघमारे) :-  केंद्र सरकारनं पेन्शनधारक आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देणार निर्णय घेतला आहे. एखाद्या पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला पेन्शनसाठी करावी लागणारी धावपळ कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेन्शनसंदर्भातील नियम शिथील करण्यात आले आहेत. पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर निवडक कागदपत्र जमाक करुन त्यांचे नातेवाईक मासिक पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. कौटुंबिक पेन्शन संदर्भातील प्रकरण लवरकरात लवकर सोडवण्यासाठी सरकारनं बँकाना देखील निर्देश दिले आहेत.

कौटुंबिक पेन्शन मिळणाऱ्या कुटुंबातील पती आणि पत्नीला विविध कागदपत्र जमा करावी लागतात. याशिवाय अन्य काही बाबी पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे पेन्शन संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ निघून जातो. या समस्या दूर करण्यासाठी मनुष्यबळ आणि पेन्शन मंत्रालयाच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागानं बँकांना लवकरात लवकर नियमांमध्ये बदल करण्यास सांगितलं आहे.

काही कागदपत्रांची पूर्तता-

पती आणि पत्नी, किंवा पेन्शनधारकाच्या पीपीओमध्ये नाव नोंदवलेल्या कुटुंबातील व्यक्तीला पेन्शन मिळवण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज आहे. पती आणि पत्नीचं संयुक्त खातं असेल आणि पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास तर एक अर्ज, मृत्यू प्रमाणपत्र, पेन्शन मिळणाऱ्या व्यक्तीला जारी करण्यात आलेल्या पीपीओच्या प्रती, अर्जदाराचा वयाचा दाखला, जन्मतारखेच्या दाखल्याची प्रत सादर करण्याची गरज आहे. ही कागदपत्रे सादर केल्यानंतर पडताळणी केली जाईल. यानंतर पेन्शनधारकाच्या नातेवाईकांना पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल. 

पेन्शनधारकाचं संयुक्त खातं नसेल तर काय करावे.??

काही वेळा पेन्शनधारकाचं खातं हे संयुक्त नसतं. त्यावेळी काय करायचे असा प्रश्न निर्माण होतो. कौटुंबिक पेन्शन मिळवण्यासाठी दोन साक्षीदारांच्या सहीनं फॉर्म क्र. 14 सादर करावा लागतो. मृत्यू झालेल्या पेन्शनधारकाचं मृत्यू प्रमाणपत्र, पेन्शनधारकाला जारी करण्यात आलेल्या पीपीओची प्रत, अर्जदाराचा जन्म दाखला, वय दर्शवणारी कागदपत्रं सादर करावी लागतील. 

पीपीओमध्ये नाव नसेल तर..??

तसेच, ही सर्व कागदपत्रं स्वयंसाक्षांकित करावी लागतील, पेन्शनधारक पती आणि पत्नीचा मृत्यू झाल्यास कौटुंबिक पेन्शन कुटुंबातील अन्य सदस्यांना पेन्शन द्यावी लागते. यामध्ये पीपीओमध्ये कुटुंबातील अन्य व्यक्तीचं पीपीओमध्ये नामनिर्देशन केलेलं असणं आवश्यक आहे. जर पीपीओमध्ये कुटुंबातील सदस्याचं नाव नसेल तर नवीन पीपीओ साठी त्यांना पेन्शन कार्यालयाशी संपर्क करावा लागेल. यासाठी पेन्शनधारकानं जिथे सेवा केली असेल तिथं भेट द्यावी लागेल.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे