Skip to main content

न्यूज अपडेट: राष्ट्रीय वाचन सोहळ्यात मालवणची श्रावणी खोत चमकली..!!

न्यूज अपडेट: राष्ट्रीय वाचन सोहळ्यात मालवणची श्रावणी खोत चमकली..!!

मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अध्यादेशाला अनुसरून शनिवार दिनांक १९ जून २०२१ रोजी ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार पश्चिम यांच्या मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्य असा राष्ट्रीय स्तरावर आंतरमहाविद्यालयीन वाचन दिन संपन्न झाला. गुगल मीटवर आयोजित केलेल्या या सुरेख वाचन सोहळ्यात मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक आणि स्तंभलेखक सॅबी परेरा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

देशभरातील वाचन प्रेमींना संबोधित करताना सॅबी परेरा म्हणाले, "फेसबुक, वॉटस् अप इत्यादी समाज माध्यमांवर सामायिक  झालेले साहित्य वाचल्यामुळे फारतर वाचक समाज निर्माण होईल परंतु ग्रंथांचे आणि पुस्तकांचे वाचन केले तरच वाचन संस्कृती निर्माण होऊन समाजाचे उन्नयन होईल." ते पुढे म्हणाले,"तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केवळ शासनाने करावे असे नाही, तर ती जबाबदारी पालकांनी आणि ज्ञानदीप मंडळा सारख्या संस्थांनी स्वीकारायला हवी." सॅबी परेरांनी कुपारी बोलीत सादर केलेल्या स्वरचित कवितेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या राष्ट्रीय वाचन सोहळ्यात मालवणची श्रावणी खोत चमकली. टोपीवाला महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या श्रावणीने मालवणी बोलीत लिहिलेल्या किसन पेडणेकर यांच्या 'भिरंडा' या विनोदी कथेतील एका भागाचे वाचन करून उपस्थितांची शाबासकी मिळवली.

या वाचन सोहळ्यात बोलताना ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष फ्रान्सिस तुस्कानो म्हणाले, "ययाती, छावा या सारखी अनेक दर्जेदार पुस्तके आम्ही मराठी माध्यमातून शिकल्यामुळे शालेय जीवनात वाचता आली. आपापल्या उद्योग व्यवसाय याच्याशी संबंधित वाचनाने आपण आपल्या क्षेत्रात चांगली प्रगती करू शकतो." या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या भूतपूर्व प्राचार्या डॉ. जयश्री मेहता यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी वाचक प्रेमींना संबोधित करताना एकच विधान विविध अंगाने कसे वाचता येते आणि त्याची परीणामकारकता वाढविता येते, हे उदाहरण देऊन पटवून दिले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ सुभाष डिसोझा यांनी आपल्या भाषणात कुपारी बोलीत प्रचलित असणार्‍या म्हणी बोलून दाखविल्या. त्यांनी आपल्या मनोगतातून वाचना बरोबर बोली भाषांचे महत्व अधोरेखित केले. 

कान तृप्त करणारा वाचन समारंभ 'वसई फास्ट' दैनिकाचे संपादक मोहन पाटील यांच्या उपस्थितीने अधिक उठावदार झाला. ते आपल्या भाषणात म्हणाले, "वाचनाने अफाट ज्ञान तर मिळतेच पण वाचन हे मनोरंजनाचे उत्तम साधन आहे." ते पुढे म्हणाले,"प्रत्येक संपादकाला भरपूर वाचावे लागते कारण तेच अग्रलेख लिहिताना उपयुक्त ठरते."

सदर राष्ट्रव्यापी वाचन समारंभाची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणारे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख सहा प्रा. जगदीश संसारे यांनी मान्यवरांची ओळख करून दिली तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि आपल्या सहज ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन देखील केले. वाचन दिनाचे सहआयोजक ग्रंथपाल डॉ. दिनेश सनदी यांनी उपस्थित वाचन प्रेमी आणि मान्यवरांचे लाघवी भाषेत आभार मानले. अनएडेड वाणिज्य विभाग प्रमुख सहा प्रा. संगिता पंडित यांनी कार्यक्रमाची तांत्रिक बाजू भक्कमपणे संभाळली.

संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाच्या आय क्यू ए सी अंतर्गत पार पडला -

कर्नाटक, गोवा, झारखंड, तमिळनाडू, गुजरात या राज्यातील मराठी भाषा आणि वाचन प्रेमींनी उपक्रमात आपला सहभाग नोंदवला, हे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले. महाविद्यालयात कार्यरत असलेल्या सहा. प्रा. प्रसाद डाबरे (सुवर्णकण) कार्यालयीन अधीक्षक विल्यम रॉड्रीग्ज (बायबल) यांनी देखील उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. सहा. प्रा. प्रणिता बिलोलीकर (झारखंड), ग्रंथपाल डॉ. संतोष कांबळे (चेन्नई) यांनी देखील अनुक्रमे महात्मा गांधी आणि ड। बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील उतार्‍यांचे वाचन केले. अनुश्री पाटणकर (झारखंड) व प्रफुल्ल काळे (गुजरात), दिपाली शेट्ये (कर्नाटक), श्रावणी सुर्वे आणि वैष्णवी नाईक (गोवा) यांनी उपक्रमात सहभाग नोंदवला.

होली क्रॉस हायस्कूलचे माजी उपप्राचार्य फ्रान्सिस आल्मेडा, महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले समुपदेशक प्रा. रॉबर्ट आल्मेडा, समाजसेवक जाॅन परेरा तसेच अनेक महाविद्यालयातील वाचनप्रेमी प्राध्यापकांनी कार्यक्रमास हजेरी लावली होती.

ज्ञानदीप मंडळाचे दोन्ही उपाध्यक्ष वेलेरीयन रॉड्रीग्ज आणि जो अल्फान्सो, सचिव स्टॅनी लोबो तसेच खजिनदार टोनी डाबरे यांनी केलेले मार्गदर्शन तितकेच महत्त्वाचे ठरले.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे