Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

ब्रेकिंग न्यूज:- राजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे दुःखद निधन:

ब्रेकिंग न्यूज:- राजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे दुःखद निधन: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव (आबा) देशमुख हे राजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व होते. त्यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्यसंपन्न पर्वाचा अंत झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदार संघाचे त्यांनी ५५ वर्षे प्रतिनिधीत्व केले.  सहकार चळवळीतून उभी केलेली सूत गिरणी उत्तम रितीने चालवून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. कृषी, सहकार, क्रीडा क्षेत्रासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. विधानसभेतील त्यांची भाषणे अभ्यासू व माहितीपूर्ण असायची. ते सभागृहात बोलायला उभे राहताच सभागृह शांतपणे त्यांचे भाषण ऐकायचे. राजकारणातील नव्या पिढीसाठी ते आदर्श होते. गणपतराव देशमुख आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने फक्त शेतकरी कामगार पक्षाचीच नाहीत महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात 1962 ते 2014 या कालावधीत 13 वेळा निवडणूक

न्यूज अपडेट: महाड पूरग्रस्तांना पनवेल महापालिकेने दिला मदतीचा हात:

न्यूज अपडेट: महाड पूरग्रस्तांना पनवेल महापालिकेने दिला मदतीचा हात: पनवेल (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे) :- महाड शहर परिसरामध्ये 22 जुलैला जोरदार अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेकांचे संसार वाहून गेले, अनेकांची दुकाने उध्वस्त झाली, पूरग्रस्तांना जीवनाश्यक मदतीसाठी सर्वत्र आवाहन होत आहे. या संकटकाळत महाडमधील पूरग्रस्तांना पनवेल महानगरपालिकेने मदतीचा हात देऊ केला आहे. आयुक्त श्री. गणेश देशमुख यांच्या निर्देशानूसार घनकचरा व आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, वाहन विभाग यांच्यावतीने तातडीने मदत पोहचविण्यात आली. घनकचरा व आरोग्य विभागातर्फे चालकासहित दोन जेसीबी, दोन पाण्याचे टँकर, तीन टन कचरा उचलू शकणारे चार टिपर, दोन फॉगींग मशिन्स, फवारणीसाठी  500 किलो जंतूनाशक केमिकल्स, याचबरोबर 1 पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 50 स्वच्छता कर्मचारी व 5 पर्यवेक्षक यांचे विशेष पथक पाठविण्यात आले आहेत. तसेच 10 हजार पाण्याच्या बाटल्या, 6 हजार बिस्कीट पुडे पाठविण्यात आले आहे आहेत. अग्निशमन विभागातर्फे एक फायर फायटर गाडी चार कर्मचाऱ्यांसहित तातडीने महाडला पाठविण्यात आले आहेत. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ

न्यूज अपडेट: २०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा; "सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम":

न्यूज अपडेट: २०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा; "सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम": नवी मुंबई (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे) :- मुंबई महानगरीत ज्यांना घर नाही अश्या बेहर जनतेला शासनाच्या वतीने २०२३ पर्यंत हजारोना घर उपलब्ध होणार असल्याची माहिती सम्यक मैत्रेय फौंडेशन च्या वतीने देण्यात  आली आहे. शासनाकडून जमीन हस्तांतरण करून त्यातील निम्म्या जमिनी वर खाजगी विकासाकाकडून गोरगरिबांना इमारतीमध्ये सदनिका उपलब्ध करून देण्याचा मानस संस्थेच्या वतीने बाळगण्यात आला आहे. दहिसर, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव,  मुलुंड, भांडुप व अन्य ज्या ठिकानी सरकारी जमीन जी नापीक असून भग्नावस्थेत पडली आहे, अश्या जमिनीची ९९ वर्षासाठी मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या मदतीने संस्थेच्या वतीने बेघर नागरिकांचे स्वतः च्या हक्काच्या गरचे स्वप्न लवकरच साकार होणार असून युद्धपातळीवर शासकीय कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. मात्र: लवकरच जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होऊन स्वप्नपूर्ती च्या दिशेने मार्गक्रम होत आहे, गोर गरिबांसाठी अल्पदरात सदनिका उपलब्ध करून हक्काचा निवारा उपलब्ध करवून देण्यास संस्थेला यश प्राप्त

न्यूज अपडेट: लयभारी ईबुक प्रकाशन आणि ऑनलाईन कवी संमेलन:

न्यूज अपडेट: लयभारी ईबुक प्रकाशन आणि ऑनलाईन कवी संमेलन: मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- लयभारी साहित्य समूहा तर्फे आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी हा उपक्रम पंधरा दिवस घेऊन पंढरीची वारी ह्या विषयावर काव्यलेखन मागवले. त्या कालावधीत आलेल्या ७८ कवितांचा ईबुक मध्ये समावेश करण्यात आला. आषाढी एकादशीच्या दिवशी शामला पंडीत, रंजना मांगले, संतोष रायबान यांच्या हस्ते ह्या कवितांचे ईबुक स्वरुपात प्रकाशन करण्यात आले. सोहळ्याचे मुख्य आयोजन प्रमोद सूर्यवंशी यांनी केले. त्याच दिवशी ऑनलाईन कवी संमेलनाचे नियोजन समूह संचालक अनिल केंगार यांनी केले. त्याचे सूत्रसंचालन धनंजय माने यांनी आपल्या बहारदार शैलीत करून कार्यक्रमाला रंगत आणली. वर्षा फटकाळे वराडे, संगीता महाजन, वर्षा शिदोरे, कविता वालावलकर, शामला पंडित (दीक्षित), वसुधा कोडगीरे, वैभवी मराठे, भाग्यश्री बागड, अनिता नागे/पाठे, रंजना मांगले, आम्रपाली धेंडे, सुचित्रा कुंचमवार, कल्पना अंबुळकर, प्रांजली काळबेंडे, शशिकला गुंजाळ, वसुधा नाईक, योगिता जाधव, नूतन पाटील, संगीता चव्हाण, अंजली राजाध्यक्ष, सुनीता बहिरट, संगीता जामगे, विकास पाटील, हरिदास गौतम,

न्यूज अपडेट: "महा हॅण्डलूम्स" या बोधचिन्हाचे अनावरण..।।

न्यूज अपडेट: "महा हॅण्डलूम्स" या बोधचिन्हाचे अनावरण..।। मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित हे महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत प्रतिष्ठान असून सन १९७१ पासून हातमाग व्यवसायाशी जुळलेले आहे. महाराष्ट्रातील परंपरागत हातमाग व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी व कुशल हातमाग विणकराव्दारे उत्पादीत उच्च प्रतीच्या कापडाची ओळख कायम असावी व विणकरांना रोजगार उपलब्ध होत राहावे, या सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाव्दारे करार पध्दती अंतर्गत विणकराकडून उत्पादन करुन घेण्यात येते व अशा उत्पादीत मालाच्या विक्रीची व्यवस्था विक्री केंद्रे, प्रदर्शनी तथा ऑनलाईनच्या माध्यमातून करण्यात येते. कोविड-१९ संसर्गामुळे संपूर्ण देशात मंदीचे वातावरण असून आर्थिक परिस्थिती डबघाईची झालेली आहे. प्रदर्शनी, मेळावे व उत्सव घेणे शक्य नाही.  हातमाग विणकरांनी तयार केलेल्या वस्त्रांच्या विक्रीवर आर्थिक मंदीमुळे फटका बसलेला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन काळात विणकराला (Work From Home) अंतर्गत आवश्यक सूत पुरवठा करणे, त्यांना मजूरी देणे; जेणेकरुन त्यांच्

न्यूज अपडेट: कष्ट करण्याची तयारी असेल तरच कला शाखा निवडा - प्रा. जगदीश संसारे..!!

न्यूज अपडेट: कष्ट करण्याची तयारी असेल तरच कला शाखा निवडा - प्रा. जगदीश संसारे..!! मुंबई (प्रतिनिधी/ गुरुदत्त वाकदेकर) :- ‘‘कष्टाळू, कष्ट टाळू व कसे टाळू ह्या तीन प्रवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांनी आपण कोणत्या प्रवृत्तीत आहोत, हे ठरवा मगच कला शाखेकडे वळा. आज दहावी व बारावीला कमी मार्क्स मिळाले म्हणून कला शाखेकडे विद्यार्थी वळतात तो काळ मागे पडला आहे. आज कला शाखेत नव्वद टक्क्यांना देखील प्रवेश मिळत नाही. जे विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थी करू शकत नाही ते कला शाखेतील विद्यार्थी करू शकतात. कला शाखेतील विद्यार्थ्यांकडे करिअर निवडीचे प्रचंड मार्ग आहेत. साहित्य, कला, नाटय, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, लेखक, पटकथा लेखक, समीक्षक, ग्रंथपाल, भाषाशास्त्रज्ञ, माहितीतज्ञ, नाणेशास्त्र, इतिहासतज्ञ, टंकलेखक, राजकीयतज्ञ, अर्थविश्लेषक, समुपदेशक, प्रशासकीय सेवा, मानवी हक्क तज्ञ, पर्यटन मार्गदर्शक, वस्तूसंग्रहालय तज्ञ, जाहिरात लेखन वगैरे वगैरे अशा नाना संधी फक्त कला शाखेतच  उपलब्ध आहेत.’’ असे उद्गार ‘संधी कला शाखेतील’ मराठी विषयात पदवी  घेणाऱ्या विद्यार्थींनीना मार्गदर्शनपर व्याख्याना प्रसंगी सेंट जोसेफ

न्यूज अपडेट: कविता जगण्याचे बळ देते- डॉ सुभाष डिसोझा:

न्यूज अपडेट: कविता जगण्याचे बळ देते- डॉ सुभाष डिसोझा: मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सत्पाळा विरार पश्चिम यांच्या मराठी विभागाने महिला सक्षमीकरण व मराठी भाषेचा विकास या उपक्रमांतर्गत ‘मुली रंगल्या काव्यात’ ह्या स्वरचित कवितेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात कविते विषयी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष डिसोझा म्हणाले, "कविता जगण्याचे बळ देते." ते पुढे म्हणाले, ‘‘आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास जयंती म्हणून साजरा केला जातो.  आषाढ महिन्याचे आगमन होताच कवितेची चाहूल लागते आणि कवितेच्या गावी जावे असेच वाटत रहाते. कविता गावीशी वाटणे, गाणे गुणगुणावेसे वाटणे आणि हे करताना सहजच त्या काव्यात एकात्म पावणे हा एक अद्वैतानुभवच आहे. कविता म्हणजे तरी काय तर सृजनात्मकता माझ्या मते, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सृजनात्मकता ही असते.’’ महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.जगदीश संसारे ह्यांच्या मार्गदर्शनाने ‘मुली रंगल्या काव्यात’  ह्या आंतरमहाविद्यालयीन काव्योत्सववाची संकल्प

न्यूज अपडेट: प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सृजनात्मकता दडलेली असतेच - प्राचार्य डॉ. लीना राजे!

न्यूज अपडेट: प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सृजनात्मकता दडलेली असतेच - प्राचार्य डॉ. लीना राजे! मुंबई (प्रतिनिधी/ गुरुदत्त वाकदेकर) :- ‘आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास जयंती म्हणून साजरा केला जातो. आषाढ महिन्याचे आगमन होताच कवितेची चाहूल लागते आणि कवितेच्या गावी जावे असेच वाटत रहाते. कविता गावीशी वाटणे, गाणे गुणगुणावेसे वाटणे आणि हे करताना सहजच त्या काव्यात एकात्म पावणे हा एक अद्वैतानुभवच आहे. कविता म्हणजे तरी काय तर सृजनात्मकता माझ्या मते, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सृजनात्मकता ही असतेच’’ असे उद्गार ‘मुली रंगल्या काव्यात’ ह्या स्वरचित कवितेच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी सेवा मंडळ एज्यूकेशन सोसायटी संचालित श्रीमती एम. एम. पी. शाह महिला स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. लीना राजे ह्यांनी काढले. मराठी विभाग आणि विश्वभान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुली रंगल्या काव्यात’ ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विश्वभान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. जगदीश संसारे ह्यांच्या मार्गदर्शनाने ‘मुली रंगल्या काव्यात’ ह्या आंतरमहाविद्यालयीन दहा विद्यार्थींना एकत्र घेऊन आताच्या काळ

न्यूज अपडेट: "स्वामी" तर्फे शालेपयोगी साहित्याचे वाटप:

न्यूज अपडेट: "स्वामी" तर्फे शालेपयोगी साहित्याचे वाटप: मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- "स्वामी" (Swamee) सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल अँण्ड एन्वायर्नमेंट, परेल, मुंबई स्थित संस्थेकडून गेली २० वर्षा पासून अनेक उपक्रम राबवले जातात. विद्यार्थी सहाय्य योजना हा त्यातील एक उपक्रम दिनांक ११ जुलै २०२१ रोजी घेण्यात आला. त्यामध्ये ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तू देण्यात आल्या. एकूण ३५० विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला. शालेपयोग वस्तूंमध्ये ५ वी ते ७   वी च्या विद्यार्थांना (अे४ आकाराच्या ८ वह्या, पाउचसहित २ पेन, २ पेन्सिल व खोडरबर) तर ८ वी ते १० वी च्या  विद्यार्थ्यांसाठी (अे४ आकाराच्या १२ वह्या, पाउचसहित २ पेन, २ पेन्सिल व खोडरबर) ह्या साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी शरद डिचोलकर - अध्यक्ष, फेसकॉम्, ज्येष्ठ नागरिक संघ, मुंबई, दिलीप सावंत - गुणवंत कामगार व वृतलेखक, गुरुदत्त वाकदेकर - साहित्यिक व पत्रकार, चारूहास हांबीरे - कोळी बांधवांचे समाजसेवक, विद्याधर जाधव - समाजसेवक या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालोपयोगी

न्यूज अपडेट: घणसोली येथे मित्रानेच केला मित्राचा घात; निर्घृणपणे हत्या करून फरार झालेला आरोपी गजाआड:

न्यूज अपडेट: घणसोली येथे मित्रानेच केला मित्राचा घात; निर्घृणपणे हत्या करून फरार झालेला आरोपी गजाआड: नवी मुंबई (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- घणसोली येथे राहत असलेल्या नागेंद्र पांडे हा बेपत्ता असल्याची तक्रार त्याची बायको सुनैना नागेंद्र पांडे ह्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास सुरू केल्यावर असे समोर आले की नागेंद्र पांडे याची हत्या त्याचा मित्र अर्जुन हरिनारायन चौधरी याने केली असून मृतदेह बाथरूम मध्ये टाकून आरोपी फरार असल्याचे पोलिसांच्या समोर आले.   सदर घटना ही घणसोली येथील कौलआळी परिसरात घडली आहे ह्याबाबत अधिक तपास करण्यासाठी गेले असताना कौलआळी येथे आरोपीच्या राहत्या घराला कुलूप लागले होते, तर घराबाहेर चप्पल आणि छत्री दिसून आली तसेच खिडकीतून डोकावले असतांना घरात रक्ताचे डाग, पोलिसांना पाहायला मिळाले. पोलिसांनी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केल्यावर त्यांच्या समोर रक्ताने माखलेल्या नागेंद्र पांडेचा मृतदेह मिळाला.फरार आरोपी अर्जुन चौधरी ह्याला ठाणे पोलीस पथकाकडून इगतपुरी येथून ताब्यात घेण्यात आले. ह्याबाबत आरोपीचा अधिक तपास घेतल्यावर असे समोर आले की, म

न्यूज अपडेट: अबब ! आगरी साहित्यिक सर्वेश तरेंच नाव नासाच्या 'मंगळ मोहिमेत'..!!

न्यूज अपडेट: अबब ! आगरी साहित्यिक सर्वेश तरेंच नाव नासाच्या 'मंगळ मोहिमेत'..!! नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- आजच्या २१व्या शतकात जगभर सर्वच देश प्रगतीपथावर जात आहेत. विज्ञानाच्या जोडीने सर्व काही शक्य झाले आहे हे सर्वांना माहीत आहे, विज्ञानातील सर्वात मोठा आकर्षणाचा भाग असलेल्या अंतराळाचे वेड सर्वांनाच आहे. व यासाठी अंतराळप्रेमी देखील जोमात तयारी करीत पुढे जात आहेत. अमेरिकेतील नासा ह्या अंतराळ संशोधन संस्थेचे आकर्षण सर्वांनाच आहे. नासा द्वारे २०२६ रोजी मंगळावर यान पाठविण्याची मोहिम होणार आहे त्यासाठी गेले कित्येकवर्ष विषेश तयारी चालु आहे. या मोहिमेची जनमानसात जनजागृती व्हावी आणि मोहिमेबद्दल उत्सुकता वाढावी यासाठी नासाने ‘मंगळावर नाव पाठविण्याची’ अधिकृत मोहिम चालु केली आहे.  ह्या मध्ये कुणाही आपला अर्ज करुन त्यातील माहिती भरून नोंद करु शकतात आणि मग आपले नाव डिजीटल स्वरुरपात यानात चिप द्वारे पाठविण्यात येणार असून नासा थेट त्याचे आपल्याला प्रमाणपत्र वजा तिकीटही देते. अंतराळ प्रेमींना ह्याचा लाभ घेण्याची ही अतिशय उत्तम संधी आहे. जगभरातून अनेकांनी ह्या मोहिमेत आपला सहभाग दाख

न्यूज अपडेट: पावसाळ्यामध्ये पोटाच्या विकारांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ..!

न्यूज अपडेट: पावसाळ्यामध्ये पोटाच्या विकारांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ..!  ● रस्त्यावरील खाद्यपदार्थ हगवण व जुलाबाला ठरतायेत कारणीभूत ठाणे (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- बदलत्या जीवनशैलीमुळे खाणे-पिणे, झोप, मानसिक स्वास्थ आणि आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, पोटाच्या लहानसहान तक्रारीही भविष्यात गंभीर रूप धारण करू लागल्या आहेत परंतु पावसाळ्यामध्ये बाहेरील पदार्थ खाल्ल्यामुळे आता पोटविकारांमध्ये वाढ झाल्याचे निदेर्शनास आले आहे. पावसाळ्यात अनेकांना बाहेरचे गरमागरम पदार्थ खायला आवडतात विशेषतः तळलेले पदार्थ म्हणजेच कांदा - बटाटा भजी तसेच चायनीज पदार्थांचा मोह आवरता येत नाही परंतु हेच पदार्थ पोटाच्या विकाराला कारणीभूत ठरत आहे, कल्याण शहरातील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी  हॉस्पिटलच्या सर्वेक्षणानुसार पावसाळ्यामध्ये बाहेरील खाद्य पदार्थ खाल्यामुळे पोटाच्या विकारात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे तसेच किडनीच्या विकारातही लक्षणीय वाढ झाली आहे. खाद्यपदार्थ खाल्ल्यावर तेथे उपलब्ध असलेले निकृष्ट दर्जाचे पिण्यासाठी पाणी व  खाण्याच्या पदार्थावर घोंघावणाऱ्या माश्या यातून बरेचदा जिवाणूंना आपल्या शरीरात प्रवेश कराय

न्यूज अपडेट: पनवेलचे भूमिपुत्र अभिजीत पाटील मेड इन इंडिया आयकॉन 2021 चे मानकरी:

न्यूज अपडेट: पनवेलचे भूमिपुत्र अभिजीत पाटील मेड इन इंडिया आयकॉन 2021 चे मानकरी: ● पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा ● महामहीम राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार ● अभिजित पाटील यांची केंद्रीय मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर झाली होती निवड पनवेल (प्रतिनिधी) :- मेड इन इंडिया आयकॉन 2021 या नामांकित पुरस्काराचे वाटप सोहळा भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य अभिजित पाटील यांना मुंबईतील राजभवन येथे प्रदान करण्यात आला. राज्याचे राज्यपाल मा. श्री.भगतसिंगजी कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन या ठिकाणी दिनांक 20 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावेळी पनवेलचे भूमिपुत्र अभिजीत पाटील यांना सामाजिक आणि पर्यावरणासाठीच्या केलेल्या कामाची दखल घेत त्यांना मेड इन इंडिया आयकॉन 2021 महाराष्ट्र सन्मान प्रदान करण्यात आला. अभिजीत पाटील यांच्यासह गायक उदित नारायण, कुमार सानू , मराठी कलाकार स्वप्निल जोशी, भरत जाधव, प्रशांत दामले, उद्योगपती सौ लोढा , पोलिस अधिकारी यांनासुद्धा

न्यूज अपडेट: ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट, माथाडी अँड जनरल कामगार युनियनच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी राजकुमार जैस्वाल यांची नियुक्ती:

न्यूज अपडेट: ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट, माथाडी अँड जनरल कामगार युनियनच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी राजकुमार जैस्वाल यांची नियुक्ती: पनवेल (प्रतिनिधी/विशाल कोरगावकर) :- संपूर्ण भारतात ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट, माथाडी अँड जनरल कामगार युनियन  कार्यरत असून संघटनेमार्फत जनतेच्या न्यायासाठी, त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी एकमेव हक्काची संघटना म्हणून गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मुंबई, पनवेल, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, पुणे, नाशिक,  याठिकाणी कार्यरत आहे. युनियनच्या  कामांनी अनेक नवतरुण भारावून गेले असून पक्षीय राजकारणाला कंटाळून अनेक जण युनियन मध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. सध्या कोरोना व लॉकडाऊन काळामध्ये युनियनतर्फे  सुरु असलेली कामे पाहता एखाद्या राजकीय पक्षाला देखील लाजवेल असे कामांचे स्वरूप आहे.  तसेच, या कामांचे व संघटनेचे महत्व जाणुन तसेच युनियनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांच्या नेतृत्वात आज नवी मुंबई येथील जेष्ठ समाजसेवक राजकुमार जैस्वाल यांची ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट, माथाडी अँड जनरल कामगार युनियनच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. वाशी नव

न्यूज अपडेट: फक्त ४ तास काम करा आणि कमवा ५० ते ६० हजार Amazon ॲप सोबत..!!

न्यूज अपडेट: फक्त ४ तास काम करा आणि कमवा ५० ते ६० हजार Amazon ॲप सोबत..!! नवी मुंबई (प्रतिनिधी) : - दिग्गज ई कॉमर्स कंपनी ऍमेझॉनने लोकांना आपल्यासोबत कमाई करण्याची संधी दिली आहे. जे लोक कोणत्याही वेळेचे बंधन नसेल अशा नोकरीच्या शोधात असतील. त्या लोकांसाठी चांगली संधी आहे. तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे काम करून ५५ ते ६० हजार रुपये महिना कमाई करू शकता. दिग्गज ई कॉमर्स  कंपनी ऍमेझॉनने लोकांना आपल्यासोबत कमाई करण्याची संधी दिली आहे. जे लोक कोणत्याही वेळेचे बंधन नसेल अशा नोकरीच्या शोधात असतील. त्या लोकांसाठी चांगली संधी आहे. तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे काम करून ५५ ते ६० हजार रुपये महिना कमाई करू शकता डिलिवरी बॉय- ऍमेझॉन भारतात आपला व्यवसाय वाढवत आहे. यासाठी सर्वात महत्वाचे काम म्हणजेच प्रोडक्ट डिलिवरी होय. जवळपास प्रत्येक शहरात कंपनी डिलिवरी बॉयच्या शोधात आहे. यामद्ये ग्राकांना पॅकेज वेअरहाऊसमधून घेऊन घरी पोहचवावे लागते. जर तुम्ही हे काम करू शकत असाल तर ऍमेझॉनच्या वेअरहाऊसशी संपर्क करा. डेलिवरी बॉयला १०० ते १५० पार्सल एका दिवसात डिलिवरी करावे लागतात. हे पार्सल वेअरहाऊसच्या १० ते १५ किमीच्या प

न्यूज अपडेट: सिप्ला कंपनीतर्फे पनवेल महानगरपालिकेस आरटीपीसीआरसाठी व्हिटिएम टेस्ट किट:

न्यूज अपडेट: सिप्ला कंपनीतर्फे पनवेल महानगरपालिकेस  आरटीपीसीआरसाठी व्हिटिएम टेस्ट किट: पनवेल (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे) :- रसायनी येथील सिप्ला कंपनीच्या सिप्ला फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून पनवेल महानगरपालिकेस ३ हजार व्हिटीएम आर.टी.पी.सी.आर किट देण्यात आले. यावेळी सिप्ला कंपनीचे साईट प्रमुख विजय थानगे, सिप्ला फाऊंडेशनच्या सीएसआर हेड उल्का धुरी, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, वैद्यकिय अधिकारी डॉ.पुनम जाधव, सिप्ला फाऊंडेशन सीएसआर मॅनेजर सुनिल मकरे उपस्थित होते. कोरोना साथरोगामध्ये नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे का नाही याचे  निदान करण्यासाठी ॲन्टीजन आणि आरटीपीसीआर चाचणी  महत्त्वाची असते. सध्या  महानगरपालिका कार्यक्षेत्रात  आयुक्त श्रीगणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्यांच्या किटची गरज भासत असून सिप्ला कंपनीच्यावतीने देण्यात आलेले आरटीपीसीआर किट महापालिकेस कोरोना चाचण्यासाठी अत्यंत उपयोगी असणार आहेत. आयुक्त श्री. गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी व वैद्यकिय अधिकारी डॉ. पूनम जाधव यां

न्यूज अपडेट: केंद्र शासनाच्या ट्रान्सपोर्ट फॉर ऑल इनोव्हेशन चॅलेंजमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा; महापालिकेचे आवाहन:

न्यूज अपडेट: केंद्र शासनाच्या ट्रान्सपोर्ट फॉर ऑल इनोव्हेशन चॅलेंजमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा; महापालिकेचे आवाहन: पनवेल (प्रतिनिधी/विशाल कोरगावकर) :- केंद्र शासनाच्या ट्रान्सपोर्ट फॉर ऑल इनोव्हेशन चॅलेंज या उपक्रमामध्ये महापालिकेने सकारात्मक सहभाग घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत  महानगरापालिकेमार्फत ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या www.panvelcorporation.com   या वेबसाईटवर Transport for all या लिंकवर जाऊन गुगल फॉर्म भरवा. महापालिका क्षेत्रातील परिवहन सेवेबाबत नागरिकांनी आपल्या सुचना व हरकती द्याव्यात असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना परिवहन सोयीसुविधेमध्ये काही समस्या असतील तर त्या सोडविण्याचा प्रयत्न  केला जाणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांच्या परिवहनाबाबतीतल्या गरजा समजून घेण्यात येणार आहेत. तसेच सुरक्षित स्वस्त्, आणि अधिक विश्वसनीय परिवहन सुविधा देण्यासाठी मदत केली जाणार आहे. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नि

न्यूज अपडेट: पनवेल महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभेत विविध विषयांना मंजूरी:

न्यूज अपडेट: पनवेल महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभेत विविध विषयांना मंजूरी: पनवेल (प्रतिनिधी/प्रदीप पाटील) :- पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा 20 जुलै 2021 रोजी महापालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा एकदा रूजू झाल्याबद्दल आयुक्त श्री. गणेश देशमुख यांचा महासभेच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच सचिव तिलकराज खापर्डे हे निवृत्त होत असल्याने त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रश्नोत्तरांच्यावेळी ई टॉयलेट व फूटपाथवरील वाचानालय या विषयावरती चर्चा करण्यात आली- पनवेल महानगरपालिकेमार्फत (कोविड19) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगाने बाधित रुग्णांवर उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय येथील विलगीकरण कक्ष, इंडिया बुल्स् येथील विलगीकरण केंद्र आणि जम्बो कोव्हिड सेंटर येथे उपचारासाठी आलेल्या रूग्णांना अल्पोपहार पुरविण्याच्या विषयाला महासभेने चर्चा करून मान्यता दिली. महानगरपालिका हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया करणेकामी शासनाकडून खानाव येथील गट क्र.83 - अ ची ज

न्यूज अपडेट: तज्ज्ञांनी सांगितली ही महत्वाची माहीती ज्या लोकांना आजवर कोरोना झालेला नाही..???

न्यूज अपडेट: तज्ज्ञांनी सांगितली ही महत्वाची माहीती ज्या लोकांना आजवर कोरोना झालेला नाही..??? ● राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र असतानाच; डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे नवी मुंबई (प्रतिनिधी/अनंत गोळे) :- राज्यात आणि देशात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना या रुग्णसंख्येत मध्येच वाढ होताना दिसून येत आहे. तर कधी रुग्णसंख्या कमी होत आहे. आता दुसरी लाट ओसरत आहे. त्याचवेळी तिसऱ्या लाटेचा धोकाही देण्यात आला आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. मात्र, आतापर्यंत ज्या लोकांना आजवर कोरोना झालेला नाही, त्यांच्यासाठी तज्ज्ञांनी महत्वाची माहिती सांगितली आहे. कोरोना काळात मास्क वापरणे, सोशल डिस्टन ठेवणे गरजेचे आहेच. त्याचवेळी हातही स्वच्छ साबणाने धूणे आवश्यक आहे. ज्यांनी लस घेतलेली आहे, त्यांनीही कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आता अशात तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. आजवर ज्या लोकांनी कोरोनाला दूर ठेवले आहे. म्हणजेच कोरोना अद्याप झालेला नाही त्यांनी कमीत कमी एक डोस तरी घेतला पाहिजे. महाराष्ट्र आणि

न्यूज अपडेट: कळंबोली विभागातील घरांच्या मालमत्ता कर वसूलीची स्थगिती देण्याची शिवसेनेची केली मागणी...!

न्यूज अपडेट: कळंबोली विभागातील घरांच्या मालमत्ता कर वसूलीची स्थगिती देण्याची शिवसेनेची केली मागणी...! पनवेल (प्रतिनिधी) :-  कळंबोली परिसरातील घरांच्या मालमत्ता कर वसूलीस स्थगिती द्यावी तसेच नुकत्याच अतिवृष्टीमुळे झालेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपायी द्यावी अशी मागणी आज शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत व महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन केली.  दोन दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टी होऊन कळंबोली येथील एलआयजी तथा केएल 3, 4 व 5 या भागात पाण्याचा योग्य तऱ्हेेने निचरा न झाल्याने घरात तसेच सोसायटीत पाणी साचून गरीब व माथाडी कामगारांच्या घरात पाणी शिरले. तसेच त्यांच्या मालमत्तेचे अपरिमित असे नुकसान झालेले आहे. आधीच कोव्हिड संसर्गजन्य रोगामुळे गरीब लोकांचा आर्थिक कणा मोडला होता. यातच महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे नाले सफाई तथा खराब विद्युत पंपामुळे सामान्य जनतेची घरे पाण्याखाली बुडाली होती. तरी या गरीब जनतेचे अतिवृष्टीमुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. माथाडी बांधवांचेसुद्धा मोठे

न्यूज अपडेट: आगरी साहित्यिक सर्वेश तरेंची नवी संकल्पना; आईचे स्वप्न साकारत "चिऊताई फाउंडेशन" द्वारे कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी आवाहन:

न्यूज अपडेट: आगरी साहित्यिक सर्वेश तरेंची नवी संकल्पना; आईचे स्वप्न साकारत "चिऊताई फाउंडेशन" द्वारे कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी आवाहन: ठाणे (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- आगरी साहित्यीक सर्वेश तरे यांनी आपल्या आईचे स्वप्न साकारण्यासाठी "चिऊताई फाउंडेशन" ची स्थापना करीत, कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांना मदत करण्याचे ठरवले आहे. मागील काही महिन्यांपूर्वीच सर्वेश तरे यांच्या आई अश्विनी तरे यांना स्वर्गवास झाला. कॅन्सर पीडितांना मदत करणे ही त्यांच्या आईची इच्छा होती, आपल्या आईचे स्वप्न साकार करण्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने येत्या २० जुलैला आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ चिऊताई फाउंडेशनच्या माध्यमातून कॅन्सर पीडितांना मदत करण्याचे आवाहन समोर ठेवीत ह्या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. भिवंडी येथील रोटरी क्लब ऑफ भिवंडी अर्थात बिकेसी द्वारे कॅन्सर ग्रस्त रुग्णांवर किमोथेरपी आणि डायलिसिस मोफतरित्या केले जाते. आता पर्यंत अनेक कॅन्सरग्रस्तांनी याचा लाभ घेतला आहे . यंदा बिकेसीच्या माध्यमातून तब्बल ५०० रुग्णांवर मोफत डायलिसिस आणि किमोथेरपी करायचे ठरवण्यात आले आहे. बिकेसीच्या ह्या कार्यात सह

न्यूज अपडेट: अन्यायकारक रित्या कर वाढवल्याने खांदा कॉलनीतील रहिवाश्यांनी एकत्र येत निषेध केला:

न्यूज अपडेट: अन्यायकारक रित्या कर वाढवल्याने खांदा कॉलनीतील रहिवाश्यांनी एकत्र येत निषेध केला: ● विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांचे मार्गदर्शन: जोपर्यंत चुकीच्या पद्धतीने लावलेला टॅक्स रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष शांत बसणार नाही. पनवेल (प्रतिनिधी/अनंत गोळे) :- कोरोना काळ असताना सुद्धा पनवेल महानगरपालिकेने करांमध्ये सवलत देण्याचे सोडून अन्यायकारक रित्या वाढ केलेली आहे याविरुद्ध आज खांदा कॉलनी रहिवासीयांनी एकत्र येत निषेध नोंदवला. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा चुकीच्या पद्धतीने लावलेला टॅक्स न भरण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केले आणि जोपर्यंत चुकीच्या पद्धतीने लावलेला  टॅक्स रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष शांत बसणार नाही, शेकाप नागरिकांच्या पाठीशी भक्कम पणे उभी आहे असे सांगितले. पनवेल महानगर पालिकेने आतापर्यंत फक्त कचराच सिडकोकडून हस्तांतरित करून घेतलेला आहे आणि त्यातही मोठा भ्रष्टाचार कचरा उचलण्याचे टेंडर मध्ये केलेला आहे असे असताना सुद्धा महानगरपालिका अन्यायकारक रित्या टॅक्स लावत आहे असे शेकाप नेते महादेव वाघमारे यांनी ल

न्यूज अपडेट: पनवेल महानगरपालिकेच्या जुलमी मालमत्ता करा विरोधात मूक प्रभात फेरीचे आयोजन:

न्यूज अपडेट: पनवेल महानगरपालिकेच्या जुलमी मालमत्ता करा विरोधात मूक प्रभात फेरीचे आयोजन: पनवेल (प्रतिनिधी/अनंत गोळे) :- पनवेल महानगरपालिकेच्या जुलमी मालमत्ता करा विरोधात मूक प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कामोठे मधील विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला संघटनांचे सभासद, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य इ. सुरक्षित अंतराचा पालन करून उपस्थित होते. या मुक प्रभात फेरीला कामोठे शिवसेना उपशहरप्रमुख  संतोष गणपत गोळे, विभागप्रमुख बबन  गोगावले, उपविभाग प्रमुख  गणेश खांडगे, संजय जंगम, रेवतीताई सकपाळ विधानसभा संघटक, ॲड, सुलक्षणा जगदाळे शहर संघटक शिवसेना महिला आघाडी कामोठे,  शिवसैनिक व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख,गटप्रमुख, इतर सर्वपक्षीय नेते पदाधिकारी, विविध सोसायटी मधील रहिवासी उपस्थित होते.  गेल्या १ वर्ष पासून शिवसेना कामोठे शहरप्रमुख श्री राकेश रोहिदास गोवारी  यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने या जुलमी करप्रणालीला पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्या भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा करत आहोत आणि या कर प्रणालीला शिवसेना जाहीरपणे विरोध करत आहे. जो पर्यंत पालिकेच्या रहिवासियांची या जुलमी मालमत्

न्यूज अपडेट: नेरूळ सारसोळे गावातील पालिकेच्या चालू असलेल्या कमानीच्या खाजगी कामावर आक्षेप - मनोज मेहेर:

न्यूज अपडेट: नेरूळ सारसोळे गावातील पालिकेच्या चालू असलेल्या कमानीच्या  खाजगी  कामावर आक्षेप - मनोज मेहेर: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- नेरूळ सेक्टर ६ मधील दर्शन दरबार मार्गावर विक्रम बारजवळ शनिवारपासून गावाच्या प्रवेशमार्गावर कमानीचे काम सुरू झाले आहे. वास्तविक पाहता नवी मुंबईत गावांचे अस्तित्व ठळकपणे दिसावे, गावांची स्वतंत्र ओळख असावी यासाठी महापालिका खर्चाने गावांच्या प्रवेशद्वारावर नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. काही गावांच्या मार्गावर प्रवेशद्वार उभारण्याची प्रकिया सुरू आहे. तथापि या ठिकाणी बांधण्यात येणारे प्रवेशद्वार हे स्वखर्चाने विशिष्ठ एका धर्मियांकडून त्यांच्या प्रार्थनास्थळाच्या नावाने बांधण्यात येत आहे. या प्रकरणी घटनास्थळी व पालिकेत चौकशी केली असता, या घटकांना महापालिका आयुक्तांनीच परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. ही परवानगी म्हणजे नवी मुंबईत चुकीचा पायंडा पडण्याची सुरुवात असून कमानीची परवानगी रद्द करून काम बंद करण्याची मागणी सारसोळे गावचे ग्रामस्थ व महापालिका 'ब' प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज मेहेर यांनी मुख्यमंत्री, नवी मुंबई महापाल

न्यूज अपडेट: ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य पोलादपूर..!!

न्यूज अपडेट: ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य पोलादपूर..!! पोलादपूर (प्रतिनिधी/मिलिंद खारपाटील) :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेला रायगड किल्ला ही रायगड जिल्ह्याची शान आहे. या रायगड जिल्ह्यात अनेक शूर मावळे, सरदार होऊन गेले. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी देव, देश आणि धर्म यांसाठी आपले प्राण पणास लावले. उमरठ येथील  नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांचे कुडपण चे शेलारमामा यांनी क्रूरकर्मा उदयभान यास कंठस्नान घालून मोगलांच्या ताब्यातील कोंढाणा जिंकला. मुलगा रायबाचे लग्न बाजूला ठेवून स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण तानाजीने दिले. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की गड आला पण माझा सिंह गेला आणि या कोंढाणा किल्ल्याला त्यांनी सिंहगड हे नाव दिले. नरवीर तानाजी मालुसरे यांचा पुतळा उमरठ येथे आहे. तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांची समाधी उमरठला आहे. आज तानाजी मालुसरे यांचे वंशज उमरठ, साखर, महाड येथे आहेत. तर शेलारमामा यांचे वंशज कुडपण येथे आहेत. याचबरोबर सरनौबत पिलाजी गोळे, सरदार सूर्याजी मालुसरे, सरदार गोदाजी जगताप, सरदार बाजी बांदल या सरदारांचे आणि अनेक माव

न्यूज अपडेट: घाटकोपर येथील वाहतूक पोलिसांना २०० रेनकोटचे वाटप..!!

न्यूज अपडेट: घाटकोपर येथील वाहतूक पोलिसांना २०० रेनकोटचे वाटप..!! मुंबई (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- विक्रोळी ते मुलुंड विभागात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांना पावसाचा सामना करण्यासठी घाटकोपर येथील झायनोव्हा  शाल्बी हॉस्पिटलच्या वतीने  २०० रेनकोटचे वाटप करण्यात आले. घाटकोपर येथील पूर्व द्रुतगती मार्ग परिक्षेत्र वाहतूक विभागाच्या कार्यालयात हे वाटप करण्यात आले. पाऊसाचा जोर आता नसला तरी येत्या काळामध्ये पाऊस जोरदार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच पुढील दोन महिने अनेक धार्मिक उत्सव साजरे केले जाणार आहेत त्यामुळे भर पावसामध्ये मुंबईतीळ वाहतूक सुरळीत राहण्यासाठी झायनोव्हा  शाल्बी हॉस्पिटलतर्फे वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्यात आले आहे. रेनकोट वितरणाच्या कार्यक्रमाच्या वेळी साहाय्य्क पोलीस आयुक्त श्री सुरेश शिंदे ,प्रभारी पोलीस निरीक्षक श्री हुसेन जतकर , झायनोव्हा  शाल्बी हॉस्पिटलचे  बिजिनेस डेव्हलपमेंट प्रमुख  श्री आशिष शर्मा , सिनियर मॅनेजर - बिजिनेस डेव्हलपमेंट श्री पुर्वीत मेहता तसेच वाहतूक  विभागात काम करणारे वाहतूक पोलीस उपस्थित होते. वाहतूक पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल श्री सुरे

न्यूज अपडेट: जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी, उरणच्या तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांच्या सह ९ जणांवर गुन्हा दाखल:

न्यूज अपडेट: जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी, उरणच्या तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांच्या सह ९ जणांवर गुन्हा दाखल: उरण (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- जमीन गैरव्यवहाराची प्रकरणे घडतच असतात, स्थानिकांचा विश्वास संपादित करून जमिनीचे गैरव्यवहार होत असतात. आर्थिक फसवणूक आणि मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा प्रकार उरणमध्ये नुकताच उघडकीस आला आहे. उरणमधील तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांच्यासह नऊ दलालांविरुद्ध, नवी मुंबईतील व्यवसायिक किसन राठोड यांनी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  तत्कालीन तहसीलदार कल्पना गोडे यांनी घनश्याम भोईर , संदेश भोईर, संग्राम घरत, किशोर केणी, बाळकृष्ण महादेव ठाकुर, महादेव ठाकूर, योगेश खारपाटील, निलेश पवार, विनायक ताम्हणकर आणि हुसेन सय्यद या नऊ दलालांसह जमिनीचा गैरव्यवहार, बनावट कागदपत्रांच्या आधारे केला असून तब्बल १ कोटी ८३ लाख रुपयांचा गंडा स्थानिकांना लावला असल्याचे समोर आले आहे. ह्या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.  महसूल खात्याच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन स्थानिकांनी जमीन घोटाळ्याबाबत अधिक माहिती घेऊन सावधानता बजावली आहे. शुक्रवारी उरण पोलीस ठाण

न्यूज अपडेट: गरजूंच्या मदतीसाठी शिवकन्या प्रतिष्ठानची साथ; चला तर होऊया सारे सहभागी:

न्यूज अपडेट: गरजूंच्या मदतीसाठी शिवकन्या प्रतिष्ठानची साथ; चला तर होऊया सारे सहभागी: नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- ' जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा' हे स्वामी विवेकानंद यांचे ब्रीद अनेकांना माहीत आहे परंतु यावर हवी तशी कृती कोणीही करत नाही. परंतु पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील युवकांच्या संकल्पनेतुन तयार असलेले "शिवकन्या प्रतिष्ठान" जनसेवा करून आनंद पसरवत आहेत. गरजू लोकांना मदत करून त्यांच्यामध्ये सकारात्मकता पसरवण्याचे काम ह्या प्रतिष्ठानाच्या संस्थापिका जिज्ञासा चौधरी करत आहेत. शिवकन्या प्रतिष्ठान वाडा, पालघर, भिवंडी, नाशिक परिसरातील कुटुंब, महिला, विद्यार्थी आणि गरजूंची मदत करत आहेत. देशातील काही भागांत अजूनही काही ठिकाणी लोकांच्या अंगावर घालायला कपडे नाहीत, औषधे नाहीत ही बाब गांभीर्याने लक्षात घेत, अश्या भागांत जाऊन ही सगळी टीम काम करत असते. गरजूंना मदत करण्यासाठी ह्या उपक्रमात ऑनलाईन माध्यमातून देखील आपण आपला सहभाग दाखवू शकतो असे आव्हान ह्या प्रतिष्ठान तर्फे सर्वांना करण्यात आले आहे. आपापल्या परीने जनजागृती करून सर्वांनी ह्या कार्यात सहभागी झालो तर नक्कीच

न्यूज अपडेट: स्फोटकांचा वापर करून टेम्पोला आग लावणाऱ्या टोळी गजाआड ; नवी मुंबई पोलिसांची विशेष कामगिरी:

न्यूज अपडेट: स्फोटकांचा वापर करून टेम्पोला आग लावणाऱ्या टोळी गजाआड ; नवी मुंबई पोलिसांची विशेष कामगिरी: नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- नवी मुंबई एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बहुउद्देशीय बिल्डिंग जे विंग समोर, फळ मार्केट सेक्टर १९ येथे फळांच्या रिकाम्या कॅरेट्सच्या टेम्पोला अचानक आग लागली व स्फोट झाल्याची घटना ३ जुलै रोजी घडली. याबाबतची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने लागलेली आग विझवण्यात आली. तसेच, पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता हा टेम्पो राजकुमार यादव याच्या नावे असल्याचे आढळून आल्यावर पोलिसांनी राजकुमारची चौकशी केली. राजकुमार याने दिलेल्या माहितीनुसार, हा टेम्पो त्याने अब्बास सत्तार ह्याच्याकडून विकत घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून अब्बास सत्तार व त्याचा मुलगा सोहेल हे राजकुमार याच्या सोबत भांडण करत असत. सोहेलकडून राजकुमार यांना धमक्या देखील देण्यात आल्या होत्या असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. दरम्यान, याबाबत पोलिसांकडून अब्बास व सोहेल यांची चौकशी करण्यात आली तेव्हा आरोपींनी केलेल्या ग

न्यूज अपडेट: नवी मुंबई वाशी येथील 7 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार; सर्वत्र खळबळ आरोपीला पोलिसांकडून अटक:

न्यूज अपडेट: नवी मुंबई वाशी येथील 7 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार; सर्वत्र खळबळ आरोपीला पोलिसांकडून अटक: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- देशात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशातच नवी मुंबई वाशीमध्ये एक संतापजन कृत्य घडलं आहे. 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना वाशी सेक्टर 9 येथील एका अपार्टमेंट मधे घडली आहे. कुटुंबियांनी मंगळवारी पोलिसांकडे तक्रार केली आहे. आरोपी अर्जुन हिचके (31) हा पीडित मुलीच्या कुटुंबियांचा मित्र असून तो साफसफाई कामगार आहे. आरोपी हा वाशी येथे सेक्टर 9 येथील त्याच अपार्टमेंट राहतो जिथे पीडित मुलगी देखील राहते. पिडीतीने तिच्या आईवडिलांना घरी आल्यावर संपूर्ण घटना सांगितली. तथापि, तिच्या पालकांनी ह्याबाबत भविष्यात समस्या उद्भवू शकतात असे गृहित धरुन केस नोंदविण्यास नकार दाखवला. शेवटी उशिरा का होईना, त्यांनी आपले मनोबल व धैर्य वाढवले ​​आणि मंगळवारी 6 जून रोजी त्यांनी वाशी पोलिसांशी संपर्क साधला व त्यांना सदर घटना सांगितली. वाशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी जेव्हा पीडितेची आई व आरोपी आणि त्याची पत्नी मोब

न्यूज अपडेट: दागिन्यांची अग्रगण्य शृंखला वामन हरी पेठे ज्वेलर्सचे दादर मुंबई येथे २५ वे आउटलेट सुरू:

न्यूज अपडेट: दागिन्यांची अग्रगण्य शृंखला वामन हरी पेठे ज्वेलर्सचे दादर मुंबई येथे २५ वे आउटलेट सुरू: नवी मुंबई (प्रतिनिधी) :-  १ जुलै २०२१, मुंबई: वामन हरी पेठे ज्वेलर्स, जी ११२ वर्षांपासून एक रिटेल ज्वेलरी शृंखला आहे, हे कोहिनूर चौक, दादर पश्चिम, मुंबई येथे त्यांचे २५ वे रिटेल आउटलेट सुरू करीत आहेत. १९०९ मध्ये या ब्रॅण्डने गिरगाव येथून प्रवास सुरू केला आणि दरम्यानच्या काळात महाराष्ट्रीयन दागिन्यांचे पर्याय म्हणून विकसित झाले आहे आणि महाराष्ट्र, गोवा व इंदोर येथे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची वर्दळ आहे. या दुकानाचा शुभारंभ १ जुलै, २०२१ रोजी वामन हरी पेठे ज्वेलर्सचे संचालक, श्री सुभाष पेठे आणि वामन हरी पेठे ज्वेलर्सचे संचालक श्री आदित्य पेठे यांच्या सन्माननीय उपस्थित करण्यात आला. हे आउटलेट मुंबईचा मध्यवर्ती परिसर म्हणजे दादर येथे ३००० चौरस फूटात पसरलेले आहे. या दुकानाची रचना अशा प्रकारे केली आहे जेणेकरून वामन हरी पेठे च्या ग्राहकांच्या दागिन्याची प्रत्येक छोटी आवश्यकता पूर्ण केली जाईल. या आउटलेटमध्ये सर्टिफाइड डायमंड ज्वेलरी, प्लॅटिनम ज्वेलरी, सॉलिटायर्स, फॉरेव्हरमार्क, सिल्व्हर, ब्राइडल