Skip to main content

न्यूज अपडेट: पनवेलचे भूमिपुत्र अभिजीत पाटील मेड इन इंडिया आयकॉन 2021 चे मानकरी:

न्यूज अपडेट: पनवेलचे भूमिपुत्र अभिजीत पाटील मेड इन इंडिया आयकॉन 2021 चे मानकरी:

● पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा

● महामहीम राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार

● अभिजित पाटील यांची केंद्रीय मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर झाली होती निवड

पनवेल (प्रतिनिधी) :- मेड इन इंडिया आयकॉन 2021 या नामांकित पुरस्काराचे वाटप सोहळा भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य अभिजित पाटील यांना मुंबईतील राजभवन येथे प्रदान करण्यात आला. राज्याचे राज्यपाल मा. श्री.भगतसिंगजी कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन या ठिकाणी दिनांक 20 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विशेष व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावेळी पनवेलचे भूमिपुत्र अभिजीत पाटील यांना सामाजिक आणि पर्यावरणासाठीच्या केलेल्या कामाची दखल घेत त्यांना मेड इन इंडिया आयकॉन 2021 महाराष्ट्र सन्मान प्रदान करण्यात आला. अभिजीत पाटील यांच्यासह गायक उदित नारायण, कुमार सानू , मराठी कलाकार स्वप्निल जोशी, भरत जाधव, प्रशांत दामले, उद्योगपती सौ लोढा , पोलिस अधिकारी यांनासुद्धा सन्मानित करण्यात आले.

गेली अनेक वर्षे राजकीय क्षेत्रातील अभ्यास, त्यानंतर उद्योग क्षेत्रात त्यांनी मारलेली उत्तुंग भरारी आणि हे सगळं करीत असताना नुकत्याच दीड महिन्यापूर्वी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर  सदस्यपदी नेमणूक करण्यात आल्यामुळे अभिजित पाटील यांच्या अभ्यासू नेतृत्वाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. हे सगळं होत असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी संदर्भात पत्रव्यवहार करून पाठपुरावा देखील सुरू केला. आणि आता त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते राजभवन येथे मेड इन इंडिया आयकॉन २०२१ हा नामांकित पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

अभिजीत पाटील, भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य-

मला भरभरून यशाची नेहमी भीती वाटायची. त्यानं माणसं तुटतात, आपण एकटे पडतो असं वाटायचं. आपल्याला नकोच ते यशबिश, पण पुरस्कार मिळाल्यापासून माझ्यावर मनापासून केलेल्या प्रेमाचा वर्षांव बघत आहे. भीती कमी होते आहे. यश इतकं काही धोक्याचं नसतं तर.. त्याला इतकं घाबरायचं कारण नाही.. त्याच्याकडे नीट बघतो आहे . शांतपणे. संपूर्णपणे. त्याला नि:संग स्वीकारतोय. बरेच पुरस्कार मिळाले मिळत आहेत पण यामुळे डोक्यात अजिबात हवा जाणार नाही याची शास्वती देतो. स्वतः ला अर्थवटच्या भूमिकेत पाहतो कारण परिपूर्ण होऊन संपण्याची माझी इच्छाशक्ती नाही. आणि इथेच थांबणार नाही यशाचे शिखर गाठायचे आहे.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे