न्यूज अपडेट: नवी मुंबई वाशी येथील 7 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार; सर्वत्र खळबळ आरोपीला पोलिसांकडून अटक:
न्यूज अपडेट: नवी मुंबई वाशी येथील 7 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार; सर्वत्र खळबळ आरोपीला पोलिसांकडून अटक:
नवी मुंबई (प्रतिनिधी) :- देशात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशातच नवी मुंबई वाशीमध्ये एक संतापजन कृत्य घडलं आहे. 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना वाशी सेक्टर 9 येथील एका अपार्टमेंट मधे घडली आहे. कुटुंबियांनी मंगळवारी पोलिसांकडे तक्रार केली आहे. आरोपी अर्जुन हिचके (31) हा पीडित मुलीच्या कुटुंबियांचा मित्र असून तो साफसफाई कामगार आहे. आरोपी हा वाशी येथे सेक्टर 9 येथील त्याच अपार्टमेंट राहतो जिथे पीडित मुलगी देखील राहते. पिडीतीने तिच्या आईवडिलांना घरी आल्यावर संपूर्ण घटना सांगितली. तथापि, तिच्या पालकांनी ह्याबाबत भविष्यात समस्या उद्भवू शकतात असे गृहित धरुन केस नोंदविण्यास नकार दाखवला. शेवटी उशिरा का होईना, त्यांनी आपले मनोबल व धैर्य वाढवले आणि मंगळवारी 6 जून रोजी त्यांनी वाशी पोलिसांशी संपर्क साधला व त्यांना सदर घटना सांगितली.
वाशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी जेव्हा पीडितेची आई व आरोपी आणि त्याची पत्नी मोबाईल खरेदीसाठी वाशी येथील सेक्टर 17 च्या मोबाइल शॉप मध्ये गेले असता, त्यांना ई.एम.आई (EMI) साठी चेक लागणार होता चेक घरी राहिल्याने, आरोपी चेक घेण्यास घरी गेला तेव्हा, मुलगी घरी एकटी असल्याचे दिसून आल्यावर आरोपी हिचकेने हा गुन्हा केला. एक महीन्याभरापूर्वी हा अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम ३५४, ३७६ कायद्याच्या कलम आणि १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीचा फायदा घेत आरोपींनी प्रथम तिला अयोग्य प्रकारे स्पर्श केला आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला असल्याचे त्यांनी सांगितले असून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे असे देखील सांगितले आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.