न्यूज अपडेट: "स्वामी" तर्फे शालेपयोगी साहित्याचे वाटप:
मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- "स्वामी" (Swamee) सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल अँण्ड एन्वायर्नमेंट, परेल, मुंबई स्थित संस्थेकडून गेली २० वर्षा पासून अनेक उपक्रम राबवले जातात. विद्यार्थी सहाय्य योजना हा त्यातील एक उपक्रम दिनांक ११ जुलै २०२१ रोजी घेण्यात आला. त्यामध्ये ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तू देण्यात आल्या. एकूण ३५० विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला. शालेपयोग वस्तूंमध्ये ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थांना (अे४ आकाराच्या ८ वह्या, पाउचसहित २ पेन, २ पेन्सिल व खोडरबर) तर ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी (अे४ आकाराच्या १२ वह्या, पाउचसहित २ पेन, २ पेन्सिल व खोडरबर) ह्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी शरद डिचोलकर - अध्यक्ष, फेसकॉम्, ज्येष्ठ नागरिक संघ, मुंबई, दिलीप सावंत - गुणवंत कामगार व वृतलेखक, गुरुदत्त वाकदेकर - साहित्यिक व पत्रकार, चारूहास हांबीरे - कोळी बांधवांचे समाजसेवक, विद्याधर जाधव - समाजसेवक या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य देऊन कौतुक करण्यात आले. सदर योजनेसाठी आणि सदर कार्यक्रमासाठी प्रतिभा सावंत, सौ. माळवदे, प्रियंका गायकर, मंगल गुरव, साधवी डोके, सुरेंद्र वटकर, गुलाब काटे, मोहन कटारे यांच्यासह "स्वामी"च्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.