Skip to main content

न्यूज अपडेट: अन्यायकारक रित्या कर वाढवल्याने खांदा कॉलनीतील रहिवाश्यांनी एकत्र येत निषेध केला:

न्यूज अपडेट: अन्यायकारक रित्या कर वाढवल्याने खांदा कॉलनीतील रहिवाश्यांनी एकत्र येत निषेध केला:

● विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांचे मार्गदर्शन: जोपर्यंत चुकीच्या पद्धतीने लावलेला टॅक्स रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष शांत बसणार नाही.

पनवेल (प्रतिनिधी/अनंत गोळे) :- कोरोना काळ असताना सुद्धा पनवेल महानगरपालिकेने करांमध्ये सवलत देण्याचे सोडून अन्यायकारक रित्या वाढ केलेली आहे याविरुद्ध आज खांदा कॉलनी रहिवासीयांनी एकत्र येत निषेध नोंदवला. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा चुकीच्या पद्धतीने लावलेला टॅक्स न भरण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केले आणि जोपर्यंत चुकीच्या पद्धतीने लावलेला  टॅक्स रद्द होत नाही तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष शांत बसणार नाही, शेकाप नागरिकांच्या पाठीशी भक्कम पणे उभी आहे असे सांगितले. पनवेल महानगर पालिकेने आतापर्यंत फक्त कचराच सिडकोकडून हस्तांतरित करून घेतलेला आहे आणि त्यातही मोठा भ्रष्टाचार कचरा उचलण्याचे टेंडर मध्ये केलेला आहे असे असताना सुद्धा महानगरपालिका अन्यायकारक रित्या टॅक्स लावत आहे असे शेकाप नेते महादेव वाघमारे यांनी लोकांच्या निदर्शनास आणले. आता तरी सत्ताधाऱ्यांनी जागे होऊन सर्वसामान्य नागरिकावर लावलेला अन्यायकारक मालमत्ता कर रद्द करून, दुहेरी कराच्या विरुद्ध योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा खांदा कॉलनी येथील रहिवासीयांच्या बैठकीत मा.उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी व्यक्त केली. पनवेल महानगरपालिकेने सर्वप्रथम खांदा कॉलनी करांना योग्य त्या आरोग्य सेवा पुरवाव्यात जेणेकरून कोरोना चे रुग्ण वाढणार नाहीत त्यासाठी प्राधान्य द्यावे  त्यानंतर इतर सुविधा पुरवाव्यात त्यानंतरच कर लावावा अशी अपेक्षा शेकाप नेते अनिल बंडगर यांनी व्यक्त केली. 

यावेळी नगरसेविका सौ सारिका ताई भगत, माजी नगरसेवक शिवाजी थोरवे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विकास मंडळाचे अध्यक्ष श्याम लगाडे, सचिव महेंद्र कांबळे, शेकाप युवा नेते अतुल भगत, मंगेश अपराज, सुभाष सावर्डेकर, अनंत म्हात्रे, वासुदेव गुरव, प्रवीण धनावडे, हरिदास मोरे , हनुमान गवळी, मुरलीधर शिंदे, तुकाराम कुरळे शेकडो नागरिक आणि सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित यावेळी उपस्थित होते.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे