न्यूज अपडेट: घणसोली येथे मित्रानेच केला मित्राचा घात; निर्घृणपणे हत्या करून फरार झालेला आरोपी गजाआड:
न्यूज अपडेट: घणसोली येथे मित्रानेच केला मित्राचा घात; निर्घृणपणे हत्या करून फरार झालेला आरोपी गजाआड:
नवी मुंबई (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- घणसोली येथे राहत असलेल्या नागेंद्र पांडे हा बेपत्ता असल्याची तक्रार त्याची बायको सुनैना नागेंद्र पांडे ह्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास सुरू केल्यावर असे समोर आले की नागेंद्र पांडे याची हत्या त्याचा मित्र अर्जुन हरिनारायन चौधरी याने केली असून मृतदेह बाथरूम मध्ये टाकून आरोपी फरार असल्याचे पोलिसांच्या समोर आले.
सदर घटना ही घणसोली येथील कौलआळी परिसरात घडली आहे ह्याबाबत अधिक तपास करण्यासाठी गेले असताना कौलआळी येथे आरोपीच्या राहत्या घराला कुलूप लागले होते, तर घराबाहेर चप्पल आणि छत्री दिसून आली तसेच खिडकीतून डोकावले असतांना घरात रक्ताचे डाग, पोलिसांना पाहायला मिळाले. पोलिसांनी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केल्यावर त्यांच्या समोर रक्ताने माखलेल्या नागेंद्र पांडेचा मृतदेह मिळाला.फरार आरोपी अर्जुन चौधरी ह्याला ठाणे पोलीस पथकाकडून इगतपुरी येथून ताब्यात घेण्यात आले. ह्याबाबत आरोपीचा अधिक तपास घेतल्यावर असे समोर आले की, मृत नागेंद्र पांडे ह्याच्या पत्नीसोबत आरोपीचे एक तर्फी प्रेम असल्याने आरोपीने रागाच्या भरात त्याच्या राहत्या घरात नागेंद्र पांडेला बोलावून घेऊन त्याची हत्या केली.
ह्या गुन्ह्यांतर्गत आरोपीला ताब्यात घेतले असून, सदर गुन्ह्यात आणखी एका साथीदार सोबत असल्याची शक्यता असल्याचे, पोलिसांनी सांगितले असून ह्याबाबत अधिक तपास रबाळे पोलिसांकडून करण्यात येईल असे परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी संगितले आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.