Skip to main content

न्यूज अपडेट: कष्ट करण्याची तयारी असेल तरच कला शाखा निवडा - प्रा. जगदीश संसारे..!!

न्यूज अपडेट: कष्ट करण्याची तयारी असेल तरच कला शाखा निवडा - प्रा. जगदीश संसारे..!!

मुंबई (प्रतिनिधी/ गुरुदत्त वाकदेकर) :- ‘‘कष्टाळू, कष्ट टाळू व कसे टाळू ह्या तीन प्रवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांनी आपण कोणत्या प्रवृत्तीत आहोत, हे ठरवा मगच कला शाखेकडे वळा. आज दहावी व बारावीला कमी मार्क्स मिळाले म्हणून कला शाखेकडे विद्यार्थी वळतात तो काळ मागे पडला आहे. आज कला शाखेत नव्वद टक्क्यांना देखील प्रवेश मिळत नाही. जे विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थी करू शकत नाही ते कला शाखेतील विद्यार्थी करू शकतात. कला शाखेतील विद्यार्थ्यांकडे करिअर निवडीचे प्रचंड मार्ग आहेत. साहित्य, कला, नाटय, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, लेखक, पटकथा लेखक, समीक्षक, ग्रंथपाल, भाषाशास्त्रज्ञ, माहितीतज्ञ, नाणेशास्त्र, इतिहासतज्ञ, टंकलेखक, राजकीयतज्ञ, अर्थविश्लेषक, समुपदेशक, प्रशासकीय सेवा, मानवी हक्क तज्ञ, पर्यटन मार्गदर्शक, वस्तूसंग्रहालय तज्ञ, जाहिरात लेखन वगैरे वगैरे अशा नाना संधी फक्त कला शाखेतच  उपलब्ध आहेत.’’ असे उद्गार ‘संधी कला शाखेतील’ मराठी विषयात पदवी  घेणाऱ्या विद्यार्थींनीना मार्गदर्शनपर व्याख्याना प्रसंगी सेंट जोसेफ महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. जगदीश संसारे ह्यांनी काढले. मराठी भाषेत पदवी घेत आहोत म्हणून स्वतः विद्यार्थ्यांपेक्षा त्यांचे कौटुंबिय अधिक त्रासलेले असतात. मराठी भाषा आता संपत चालली आहे ह्या भ्रमातच आपण अधिक असतो. हाच भ्रम दूर करण्यासाठी सेवा मंडळ एज्यूकेशन सोसायटी संचालित श्रीमती एम. एम. पी. शाह महिला स्वायत्त महाविद्यालयातील मराठी विभाग आयोजित ‘संधी कला शाखेतील’ ह्या विषयावर मराठी विभागाने एक मार्गदर्शपर व्याख्यान पालक आणि विद्यार्थीनी ह्या दोघोंसाठी आयोजिले होते.  प्रा. जगदीश सरांचे व्याख्यान ऐकल्यानंतर मात्र सारे भ्रम नष्ट झाले. विद्यार्थी आणि पालक दोन्ही मंडळी समाधानी झाले हेच खरे ह्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे फलित म्हणायला हवे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागातील डॉ. रश्मी शेटये-तुपे ह्यांनी केले. तर प्रमुख मार्गदर्शकांचे स्वागत मराठी विभाग प्रमुख प्रा. वसंत पानसरे ह्यांनी केले. सदर कार्यक्रमास प्राचार्य डॉ. लीना राजे मॅडम ह्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अंती एक प्रेरणादायी गीत कु. माधवी पवार हिने सादर केले. सदर कार्यक्रमास  महाविद्यालयातील अन्य प्राध्यापक, पालकवर्ग आणि  विद्यार्थींनी उपस्थित होत्या. कोरोनाच्या प्रार्दूभाव असल्यामुळे कार्यक्रम आभासी पद्धतीने  पार पडला.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे