Skip to main content

न्यूज अपडेट: अबब ! आगरी साहित्यिक सर्वेश तरेंच नाव नासाच्या 'मंगळ मोहिमेत'..!!

न्यूज अपडेट: अबब ! आगरी साहित्यिक सर्वेश तरेंच नाव नासाच्या 'मंगळ मोहिमेत'..!!

नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- आजच्या २१व्या शतकात जगभर सर्वच देश प्रगतीपथावर जात आहेत. विज्ञानाच्या जोडीने सर्व काही शक्य झाले आहे हे सर्वांना माहीत आहे, विज्ञानातील सर्वात मोठा आकर्षणाचा भाग असलेल्या अंतराळाचे वेड सर्वांनाच आहे. व यासाठी अंतराळप्रेमी देखील जोमात तयारी करीत पुढे जात आहेत. अमेरिकेतील नासा ह्या अंतराळ संशोधन संस्थेचे आकर्षण सर्वांनाच आहे. नासा द्वारे २०२६ रोजी मंगळावर यान पाठविण्याची मोहिम होणार आहे त्यासाठी गेले कित्येकवर्ष विषेश तयारी चालु आहे. या मोहिमेची जनमानसात जनजागृती व्हावी आणि मोहिमेबद्दल उत्सुकता वाढावी यासाठी नासाने ‘मंगळावर नाव पाठविण्याची’ अधिकृत मोहिम चालु केली आहे. 

ह्या मध्ये कुणाही आपला अर्ज करुन त्यातील माहिती भरून नोंद करु शकतात आणि मग आपले नाव डिजीटल स्वरुरपात यानात चिप द्वारे पाठविण्यात येणार असून नासा थेट त्याचे आपल्याला प्रमाणपत्र वजा तिकीटही देते. अंतराळ प्रेमींना ह्याचा लाभ घेण्याची ही अतिशय उत्तम संधी आहे. जगभरातून अनेकांनी ह्या मोहिमेत आपला सहभाग दाखवला असून भारतातून तब्बल ३ लाख ७६ हजार ७७९ जणांनी ह्या मोहिमेचा लाभ डिजिटल स्वरूपातुन घेतला आहे. देशात अनेकांना ह्या मोहिमेची माहिती नसल्या अभावी अनेक ह्या गोष्टींपासून अज्ञात आहेत आणि म्हणूनच नासाच्या ह्या मोहिमेबाबत जनजागृती व्हावी ह्या करिता सर्वेश तरे यांनी स्वतःदेखील ह्या मोहिमेत सहभाग दाखविला आहे. समाजातील अनेकांना नासा म्हटले की लगेच भुलायला होतं परंतु अशा देखील अनेक प्रमाणपत्राच्या मजेशीर मोहिम नासा राबविते आणि ते समाजातील घटकांनाही माहित होणे गरजेचे आहे. 

नासा तसेच इस्त्रोतही अनेक प्रश्नावली असतात त्याचे उत्तर दिल्यावर आपल्याला प्रमाण पत्र मिळते व असे गंमतीदार उपक्रम देखील असतात याची सत्यता ही सामान्य जनतेलाही माहिती व्हायला. किंबहूना हेच विद्यार्थ्यांना सांगीतले तर यातून अनेक विद्यार्थ्यांना गोडी वा कुतूहल निर्माण होईल अन नक्की उद्या आपली मुलंही शिक्षणाच्या जोरावर नासा आणि इस्त्रोसारख्या अंतराळ संस्थामध्ये आपल्याला बघायला मिळतील.म्हणुन सर्वेश तरेंनी जागृतीखातर आपले नावही नासाच्या या ‘मंगल मिशन’ साठी नोंदविले असल्याचे सांगितले आहे.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे