Skip to main content

न्यूज अपडेट: दागिन्यांची अग्रगण्य शृंखला वामन हरी पेठे ज्वेलर्सचे दादर मुंबई येथे २५ वे आउटलेट सुरू:

न्यूज अपडेट: दागिन्यांची अग्रगण्य शृंखला वामन हरी पेठे ज्वेलर्सचे दादर मुंबई येथे २५ वे आउटलेट सुरू:

नवी मुंबई (प्रतिनिधी) :-  १ जुलै २०२१, मुंबई: वामन हरी पेठे ज्वेलर्स, जी ११२ वर्षांपासून एक रिटेल ज्वेलरी शृंखला आहे, हे कोहिनूर चौक, दादर पश्चिम, मुंबई येथे त्यांचे २५ वे रिटेल आउटलेट सुरू करीत आहेत. १९०९ मध्ये या ब्रॅण्डने गिरगाव येथून प्रवास सुरू केला आणि दरम्यानच्या काळात महाराष्ट्रीयन दागिन्यांचे पर्याय म्हणून विकसित झाले आहे आणि महाराष्ट्र, गोवा व इंदोर येथे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची वर्दळ आहे. या दुकानाचा शुभारंभ १ जुलै, २०२१ रोजी वामन हरी पेठे ज्वेलर्सचे संचालक, श्री सुभाष पेठे आणि वामन हरी पेठे ज्वेलर्सचे संचालक श्री आदित्य पेठे यांच्या सन्माननीय उपस्थित करण्यात आला.

हे आउटलेट मुंबईचा मध्यवर्ती परिसर म्हणजे दादर येथे ३००० चौरस फूटात पसरलेले आहे. या दुकानाची रचना अशा प्रकारे केली आहे जेणेकरून वामन हरी पेठे च्या ग्राहकांच्या दागिन्याची प्रत्येक छोटी आवश्यकता पूर्ण केली जाईल. या आउटलेटमध्ये सर्टिफाइड डायमंड ज्वेलरी, प्लॅटिनम ज्वेलरी, सॉलिटायर्स, फॉरेव्हरमार्क, सिल्व्हर, ब्राइडल आणि बुलियन या समर्पित विभागांसह वधूसाठी तसेच दररोज लागणार्‍या दागिन्यांचा विविध प्रकारच्या डिझाइन उपलब्ध आहेत. प्रत्येक वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या दुकानांप्रमाणेच येथेही २२ के ९१६ बीआयएस हॉलमार्क गोल्डची विस्तृत श्रृंखला उपलब्ध असेल. येथील रचनाकार तुमच्या जुन्या सोन्याचे सर्वोच्च मूल्यांकन व मूल्यमापन करून ग्राहकांच्या ओर्डरपासून ते जुन्या दागिन्यांची लकाकी व दुरुस्ती करण्यापर्यंत मदत करतील. वामन हरी पेठे ज्वेलर्स ग्राहकांना खरेदी सोयीस्कर करण्यासाठी सुलभ ईएमआय योजना आणि डब्ल्यूएचपी संरक्षण योजना उपलब्ध करून देतात. या दुकानामध्ये प्रमाणित मौल्यवान रत्नांसाठीचे नवरत्न आणि ट्रेंडी सिल्व्हर ज्वेलरीसाठी इझारा यांसह इनहाउस ब्रँडचे दागिने देखील उपलब्ध असतील. नवरत्नांसाठी, ग्राहकांना थेट ज्योतिषविषयक सल्लामसलत देखील प्रदान केली जाईल.

सन १९०९ मध्ये, कै.श्री वामन हरी पेठे आणि कै.श्री गणेश हरी पेठे या दोन भावांनी वामन हरी पेठे ज्वेलर्सची स्थापना मुंबईत केली होती. बदलत्या काळाबरोबर त्यांचे युवकांना आवाहनही भक्कम राहिले आहे. आपल्या पूर्वजांच्या पावलांवर पाऊल ठेवून वामन हरी पेठे ज्वेलर्स चे संचालक, आदित्य पेठे यांनी, स्वत:च्या व्यावसायिक ज्ञानाने तसेच वडिलार्जित व्यवसायिक कौशल्याने, हा वारसा अधिक उंचीवर नेण्याच्या महत्त्वाकांक्षेने 112 वर्षे जुन्या वारसाचे नेतृत्व स्वत:च्या हाती घेतले. आधुनिक भारतीय महिलेच्या गरजा लक्षात ठेवून, जी स्वत:ला फक्त नववधू दागिन्यांपुरते मर्यादित ठेवत नाही, वामन हरी पेठे ज्वेलर्स दररोज लागणारे विविध प्रकारचे संग्रह, कॉकटेल आणि समकालीन दागिन्यांसह स्टेटमेंट ब्राइडल ज्वेलरीचा अभिमान बाळगतात.

“१९४८ साली पेंडेवाडी येथे आमच्या पहिल्यावहिल्या किरकोळ विक्री केंद्राची सुरुवात करुन आम्ही एक रमणीय प्रवास केला. सन १९६४ मध्ये आम्ही दादरच्या रानडे रोड येथील आमच्या पहिल्या दुकानात स्थलांतरित केले, ज्यामुळे मुंबईच्या मध्यभागी आमचे सर्वात मोठे स्टोअर तयार झाले. ११२ वर्षे शहरवासियांनी आम्हाला खूप प्रेम दिले आहे ज्यामुळे आम्हाला गोवा आणि इंदोर सारख्या इतर शहरांमध्ये विस्तार करण्यास मदत झाली. वामन हरी पेठेचे संचालक आदित्य पेठे यांनी सांगितले कि, “या शहराला वामन हरी पेठे ज्वेलर्सचा सर्वात मोठा स्टोअर देऊन आम्ही या प्रेमाची परतफेड करू इच्छित होतो."








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे