न्यूज अपडेट: सिप्ला कंपनीतर्फे पनवेल महानगरपालिकेस आरटीपीसीआरसाठी व्हिटिएम टेस्ट किट:
पनवेल (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे) :- रसायनी येथील सिप्ला कंपनीच्या सिप्ला फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून पनवेल महानगरपालिकेस ३ हजार व्हिटीएम आर.टी.पी.सी.आर किट देण्यात आले. यावेळी सिप्ला कंपनीचे साईट प्रमुख विजय थानगे, सिप्ला फाऊंडेशनच्या सीएसआर हेड उल्का धुरी, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, वैद्यकिय अधिकारी डॉ.पुनम जाधव, सिप्ला फाऊंडेशन सीएसआर मॅनेजर सुनिल मकरे उपस्थित होते.
कोरोना साथरोगामध्ये नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे का नाही याचे निदान करण्यासाठी ॲन्टीजन आणि आरटीपीसीआर चाचणी महत्त्वाची असते. सध्या महानगरपालिका कार्यक्षेत्रात आयुक्त श्रीगणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्यांच्या किटची गरज भासत असून सिप्ला कंपनीच्यावतीने देण्यात आलेले आरटीपीसीआर किट महापालिकेस कोरोना चाचण्यासाठी अत्यंत उपयोगी असणार आहेत.
आयुक्त श्री. गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी व वैद्यकिय अधिकारी डॉ. पूनम जाधव यांच्या प्रयत्नानी कोरोनाच्या या महामारीमध्ये सिप्ला कंपनी महापालिकेस विविध प्रकारची वैद्यकिय मदत करत आहे. याआधीही ॲन्टीजन आणि आर.टी.पी.सीआर. किट दिले होते. यापुढेही वैद्यकिय मदत करण्याचे आश्वासन यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.