Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

ब्रेकिंग न्यूज: नेरुळ मधे धक्कादायक प्रकार- बायकोचा खोटा मृत्यु दाखला बनवून नवर्‍याने केली संपत्ती हडप:

ब्रेकिंग न्यूज: नेरुळ मधे धक्कादायक प्रकार- बायकोचा खोटा मृत्यु दाखला बनवून नवर्‍याने केली संपत्ती हडप: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- नवी मुंबई नेरुळ येथे जिवंत असलेल्या बायकोचा खोटा मृत्यू दाखला बनवून नवर्‍या कढून बायकोच्या नावावर असलेली संपत्ती हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . यामध्ये नेरूळच्या नामांकित रुग्णालयाने महिलेचा मृत्यू  दाखला बनवून दिल्याचे समोर आले आहे . त्यानुसार आरोपी पती व रुग्णालयाविरोधात महिलेने पोलिसांकडे तक्रारीचा अर्ज दिला आहे. सौ. विजया रेड्डी गंगाडी ( वय ५८ ) या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. त्या जिवंत असतानादेखील त्यांचा मृत्यू दाखला वापरून त्यांची तेलंगणा येथील त्यांची शेत जमीन, नेरूळ पाम बीचचे घर देखील विक्री करण्याचा प्रयत्न. त्याशिवाय त्यांच्या बँकेच्या, शेयर  व्यवहारातही या दाखल्याचा वापर करण्यात आला आहे. शेयर बाजारातील पैसे देखील लंपास केले. विजया रेड्डी यांनी आपल्या पतीनेच ही आपली फसवणूक केल्याचा आरोप केला असुन, तसा तक्रार अर्ज त्यांनी पोलिसांकडे दिला आहे.  दरम्यान, पतीसोबतच्या भांडणाला कंटाळून त्या २०१५ मध्ये आंध्र प्रदेश त्यांच्या गावी बहिणीकडे

ब्रेकिंग न्यूज : मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने केला गुन्हा दाखल:

ब्रेकिंग न्यूज :  मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने केला गुन्हा दाखल: गजानन काळे व संजीवनी काळे यांचा आंतरजातीय प्रेमविवाह २००८ ला झाला होता. लग्नानंतर काही दिवसांत गजानन काळे यांनी पत्नीचा शारीरिक व मानिसक छळ करण्यास सुरुवात केली असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे. ते सतत त्यांच्या पत्नीला तू काळी आहेस, बौद्ध आहेस म्हणून मला तुझ्यासोबत बाहेर जायला लाज वाटते, असे म्हणून त्यांना सावळ्या रंगावरून टोमणे देत होते, असा आरोप संजीवनी काळे यांनी केला आहे. नेरुळ (प्रतिनिधी)  :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात खुद्द त्यांच्या पत्नी संजीवनी गजानन काळे यांनी कौटुंबिक हिंसाचार केल्या प्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गजानन काळेंन विरोधात तक्रार दिली आहे. शारीरिक व मानसिक छळ, जातीवाचक बोलणे या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या १३ वर्षांपासून गजानन काळे हे त्यांच्या पत्नीला मारहाण करत असल्याचा तसेच त्यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप गजानन यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. नेरुळ पोलिसांकडून ही तक्रार दाखल करण्या

न्यूज अपडेट: नवी मुंबईत दि बा पाटील यांच्या नावासाठी 9 ऑगस्टला निघणार मशाल मोर्चा:

न्यूज अपडेट: नवी मुंबईत दि बा पाटील यांच्या नावासाठी 9 ऑगस्टला निघणार मशाल मोर्चा: पनवेल (प्रतिनिधी) :- ९ ऑगस्ट हा दिवस ' क्रांती दिन. १९४२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या दिवशी मुंबई येथील गोवालिया टॅक येथून समस्त भारतीयांना 'अंग्रेज चले जाओ' अशी हाक दिली. नव्या मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांनी केलेला संघर्ष व त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात 'मशाल मोर्चा' काढण्यात येणार आहे, अशी माहिती लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी गुरुवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली . पनवेल येथी

ब्रेकिंग न्यूज: चारचाकी भाड्याने घेवून फरार झालेल्या आरोपींना पकडण्यात नेरूळ पोलिसांना यश - 31 वाहने जप्त:

ब्रेकिंग न्यूज: चारचाकी भाड्याने घेवून फरार झालेल्या आरोपींना पकडण्यात नेरूळ पोलिसांना यश - 31 वाहने जप्त: ● 2 कोटी 10 लाख रुपयांच्या किमंतीची 31 वाहने फरार आरोपींकडून जप्त करण्यात आली 5 प्रकरणांचा खुलासा केला. न्यूज अपडेट (रूपाली वाघमारे) :- चारचाकी गाड्या भाड्याने देण्याच्या नावाखाली फरार झालेल्या गुंडांचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.  पोलिसांनी या टोळीतील दोघांना अटक केली असून आणखी 5 प्रकरणांचा खुलासा केला. 31 चारचाकी चार चाकी वाहने किंमत 2 कोटी 10 लाख रुपयांच्या नेरूळ MIT पोलिसांनी आरोपींकडून जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी  चार चाकी वाहने जास्तीच्या भाडयाने घेऊन मोठमोठया कंपनीत लावतो असे आमिष दाखवून त्यांचेकडून त्यांची चार चाकी वाहने घेत पहिल्या एक दोन महिन्याचे भाडे देवुन त्यांच्या मार्फतीने आणखी इतर लोकांचे वाहने भाडेतत्वावर घेवुन नमुद सर्व वाहने तिहाईत व्यक्तीकडे गहाण ठेवुन नागरिकांची फसवणुक करून पळुन गेलेल्या टोळीचा खुलासा झाल्याची माहिती वरिष्ठांनी दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, नागरीकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याने नमुद गुन्हे