Skip to main content

ब्रेकिंग न्यूज : मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने केला गुन्हा दाखल:

ब्रेकिंग न्यूज : मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने केला गुन्हा दाखल:

गजानन काळे व संजीवनी काळे यांचा आंतरजातीय प्रेमविवाह २००८ ला झाला होता. लग्नानंतर काही दिवसांत गजानन काळे यांनी पत्नीचा शारीरिक व मानिसक छळ करण्यास सुरुवात केली असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे. ते सतत त्यांच्या पत्नीला तू काळी आहेस, बौद्ध आहेस म्हणून मला तुझ्यासोबत बाहेर जायला लाज वाटते, असे म्हणून त्यांना सावळ्या रंगावरून टोमणे देत होते, असा आरोप संजीवनी काळे यांनी केला आहे.

नेरुळ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात खुद्द त्यांच्या पत्नी संजीवनी गजानन काळे यांनी कौटुंबिक हिंसाचार केल्या प्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गजानन काळेंन विरोधात तक्रार दिली आहे. शारीरिक व मानसिक छळ, जातीवाचक बोलणे या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या १३ वर्षांपासून गजानन काळे हे त्यांच्या पत्नीला मारहाण करत असल्याचा तसेच त्यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप गजानन यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. नेरुळ पोलिसांकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

सावळा रंग व जाती वरुन पत्नीला मानसिक त्रास-
गजानन काळे व संजीवनी काळे यांचा आंतरजातीय प्रेमविवाह २००८ ला झाला होता. लग्नानंतर काही दिवसांत गजानन काळे यांनी पत्नीचा शारीरिक व मानिसक छळ करण्यास सुरुवात केली असे त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे. ते सतत त्यांच्या पत्नीला तू काळी आहेस, बौद्ध आहेस म्हणून मला तुझ्यासोबत बाहेर जायला लाज वाटते, असे म्हणून त्यांना सावळ्या रंगावरून टोमणे देत होते. तसेच, संजीवनी यांना जातीवाचक शिव्याही देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केले आहे. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे काळे हे त्यांच्या पत्नीला म्हणत असतं, असे संजीवनी यांनी सांगितले.

इतका पैसा मी कमावला आहे सात पिढ्या बसुन खातील-
गजानन काळे हे पत्नीला घर खर्चासाठी पैसे देखील देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुलगा निर्मिक काळे याच्या सातपिढ्या बसून खातील एवढा मी पैसा कमावला आहे. तू माझं काहीच वाकडे करू शकत नाही. दोन दिवस चर्चा होईल नंतर सगळे थंड होईल असेही काळे यांनी पत्नीला म्हटले आहे, असे त्या सांगतात. माझ्या पतीकडे कितीही पैसा असो मी आता माझ्या मुलांसाठी आणि माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात लढणार आहे. यासाठी मला कितीही त्रास होईल, धमक्या येतील. मात्र, मी गप्प बसणार नाही असे वक्तव्य काळे यांच्या पत्नीने केले आहे.
अनेक महिलांशी गजानन काळे यांचे अनैतिक संबंध -
गजानन काळे यांचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. तसेच, यामुळे काळे हे तिला मारहाण करत असेही तिने तक्रारीमध्ये म्हटले आहे. गजानन यांचे अनेक परस्त्रीयांसोबत अनैतिक संबंध असल्याचे अनेक वेळा माझ्या निदर्शनास आले. हे काळे यांना येत असलेले फोन कॉल, मेसेजवरुन लक्षात येत होते, मी वारंवार समजून सांगायचे. पण माझ्या काही मैत्रिणी आहेत. तू याच्यात लक्ष घालू नको, असे म्हणून काळे हे पत्नीला मारहाण करायचे असेही गजानन काळे यांच्या पत्नीने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. तसेच दोन नामांकित टीव्ही चॅनल्सच्या अँकरशी काळे यांचे संबंध असल्याचेही काळे यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. नेरुळ पोलीस ठाण्यात गजानन काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे