Skip to main content

ब्रेकिंग न्यूज: नेरुळ मधे धक्कादायक प्रकार- बायकोचा खोटा मृत्यु दाखला बनवून नवर्‍याने केली संपत्ती हडप:

ब्रेकिंग न्यूज: नेरुळ मधे धक्कादायक प्रकार- बायकोचा खोटा मृत्यु दाखला बनवून नवर्‍याने केली संपत्ती हडप:

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- नवी मुंबई नेरुळ येथे जिवंत असलेल्या बायकोचा खोटा मृत्यू दाखला बनवून नवर्‍या कढून बायकोच्या नावावर असलेली संपत्ती हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . यामध्ये नेरूळच्या नामांकित रुग्णालयाने महिलेचा मृत्यू  दाखला बनवून दिल्याचे समोर आले आहे . त्यानुसार आरोपी पती व रुग्णालयाविरोधात महिलेने पोलिसांकडे तक्रारीचा अर्ज दिला आहे. सौ. विजया रेड्डी गंगाडी ( वय ५८ ) या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. त्या जिवंत असतानादेखील त्यांचा मृत्यू दाखला वापरून त्यांची तेलंगणा येथील त्यांची शेत जमीन, नेरूळ पाम बीचचे घर देखील विक्री करण्याचा प्रयत्न. त्याशिवाय त्यांच्या बँकेच्या, शेयर  व्यवहारातही या दाखल्याचा वापर करण्यात आला आहे. शेयर बाजारातील पैसे देखील लंपास केले. विजया रेड्डी यांनी आपल्या पतीनेच ही आपली फसवणूक केल्याचा आरोप केला असुन, तसा तक्रार अर्ज त्यांनी पोलिसांकडे दिला आहे. 

दरम्यान, पतीसोबतच्या भांडणाला कंटाळून त्या २०१५ मध्ये आंध्र प्रदेश त्यांच्या गावी बहिणीकडे निघून गेल्या होत्या. यादरम्यान २०२० मध्ये त्यांनी तेलंगणा येथे त्यांच्या नावे असलेल्या जमिनीची चौकशी केली असता ती जमीन विकण्यात आली असल्याचे त्यांच्या समोर आले. यामुळे त्यांनी व्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या कागदपत्रांची पाहणी केली असता, विजया रेड्डी या जिवंत असतानाही त्यांच्या पतीने त्यांचा मृत्यू दाखला वापरून हा व्यवहार केल्याचे समोर आले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर तेथील तहसीलदार कार्यालयामार्फत पती वेंकट रेड्डी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी वापरलेला मृत्यू दाखल हा नेरूळच्या रुग्णालयाचा आहे. या रुग्णालयाने कोणत्या आधारावर त्यांना हा मृत्यू दाखला बनवून दिला याची चौकशीची मागणी त्यांच्याकडून होत आहे.









महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे