Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

T20 विश्वचषक अपडेट : आयसीसी T-२० विश्वचषकच्या मुख्य स्पर्धांना आज पासून सुरूवात..!!

T20 विश्वचषक अपडेट : आयसीसी T-२० विश्वचषकच्या मुख्य स्पर्धांना आज पासून सुरूवात..!! नवी मुंबई (बातमी/दुबई) :- आयसीसी T-२० विश्वचषकच्या मुख्य स्पर्धांना आज पासून सुरूवात होत आहे. पण वर्ल्डकपमधील सर्वात चुरशीची लढत ही २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या लढतीची उत्सुकता वाढत चालली असून काही चाहत्यांना प्रत्यक्ष मैदानात जाऊन हा सामना पाहता येईल. तर अन्य कोट्यवधी चाहते टीव्हीवरून हा सामना पाहतील.  भारत आणि पाकिस्तान ही लढत हायव्होल्टेज मानली जाते. दोन्ही देशातील चाहते याकडे युद्धाप्रमाणे पाहतात. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्धच्या सर्व लढती जिंकल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या पाच लढतीत पाकिस्तानचा पराभव झाला असून टीम इंडिया यावेळी सहाव्या विजयासाठी उत्सुक असेल. दोन्ही देशातील हा सामना पाहण्यासाठी पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी चक्क 2 दिवसांची सुट्टी काढली आहे. पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री शेख रशीद यांनी पत्रकारांना सांगितले की, T-२० वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी मी सुट्टी काढली आहे आणि स्टेडियमम

T20 विश्वचषक अपडेट : टीम इंडिया आज दुबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत सामना:

T20 विश्वचषक अपडेट : टीम इंडिया आज दुबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत सामना: नवी मुंबई (प्रतिनिधी) : - टीम इंडिया रविवारी 24 ऑक्टोबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करून T20 विश्वचषक (T20 WC 2021) मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या हाय-व्होल्टेज मॅचवर जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे भारत वर्ल्डकपमध्ये (वनडे आणि टी -20) पाकिस्तानकडून पराभूत झाला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रविवारी टीम इंडिया हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. आम्ही या सामन्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देत ​​आहोत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना कधी आणि कुठे होणार? आयसीसी T20 विश्वचषकात, भारत आणि पाकिस्तानचे संघ रविवार, 24 ऑक्टोबर रोजी आमनेसामने येतील. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. सामन्याची नाणेफेक सायंकाळी 7 वाजता होणार आहे. लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहू शकतो? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे

ब्रेकिंग न्यूज : मोठी घोषणा...महाराष्ट्र बंद! या कारणांमुळे ११ ऑक्टोबरला बंद राहणार महाराष्ट्र...!!

ब्रेकिंग न्यूज : मोठी घोषणा...महाराष्ट्र बंद! या कारणांमुळे ११ ऑक्टोबरला बंद राहणार महाराष्ट्र...!! नवी मुंबई (प्रतिनिधी) :- उत्तर प्रदेशमधील लखीमपरमध्ये शेतकऱ्यांना चिरडुन ठार मारल्याच्या घटनेमूळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारनेही या घटनेचा निषेध म्हणुन 11 तारखेला महाराष्ट्र बंद पुकारला आहे. अत्यावश्यक सेवा सोडुन हा बंद असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.षमहाविकास आघाडी सरकारच्या वतीने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. ‘लखीमपुरची घटना अत्यंत गंभीर आहे. एका मंत्र्यांचा मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालुन ठार मारले आहे.यात त्याचा सहभाग दिसुन येत आहे. शेतकऱ्यांना चिरडून मारणं असं कुठेही सरकारनं केलं नाही जे उत्तर प्रदेशात भाजप सरकारनं केलं आहे,असं जयंत पाटील म्हणाले. ‘या घटनेचा निषेध म्हणुन आम्ही 11 ऑक्टोबरला राज्यात बंद पुकारत आहोत. याबाबतीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असुन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे’, असंही पाटील यांनी सांगितलं. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलं असताना हे कृत

न्यूज अपडेट : आमदार रमेश लटके यांच्या वर अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवावा- डॉ. राजन माकणीकर:

न्यूज अपडेट : आमदार रमेश लटके यांच्या वर अट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवावा- डॉ. राजन माकणीकर: मुंबई (प्रतिनिधी/उमेश खांदेकर) :- अंधेरी पूर्व शिवसेनेचे जातिवादी आमदार रामेश लटके यांच्या वर अट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष  पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांना दिली आहे. आमदार रमेश लटके यांचा जातीवादी चेहरा पुढे आला असून  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या नावाचा उल्लेख असलेले छत्रपती शिवराय व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले भित्तीपत्रके भिंतीला चिकटवले होते ते काढून जाळण्यात आले आहे. त्यामुळे अट्रोसिटी कायद्याचे उल्लंघन झालेले असून याची चौकशी होणे फार गरजेचे आहे, आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीचा आवाज असा दाबला जाऊ नये, आमदार रमेश लटके यांनी सुपारी देऊन हे कृत्य केले असल्याचा दावा बौद्ध RTI ऍक्टिव्हिस्ट डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे.  भित्तीपत्रके ज्यावर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची तसविर होती त्यावर आमदार सा

न्यूज अपडेट : जिल्हा अग्रणी बँक तर्फे जिल्ह्यात अलिबाग मध्ये महा कर्ज मेळावा..!!

न्यूज अपडेट : जिल्हा अग्रणी बँक तर्फे  जिल्ह्यात अलिबाग मध्ये महा कर्ज मेळावा..!!  अलिबाग ( प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार आणि जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया रायगड तर्फे दिनांक ८ ऑक्टोबर, २००२१ रोजी कर्ज मेळाव्याचे आयोजन केले आहे. अलिबाग शहरातील सर्व सरकारी, खाजगी अणि सहकारी बँका यामध्ये सहभागी होणार आहेत. सदर कर्ज मेळाव्यामध्ये छोट्या व्यवसायिकांना मुद्रा योजनेअंतर्गत शिशु कर्ज, हातगाडी वाले, रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे यांच्यासाठी प्रधानमंत्री स्वानिधी योजने अंतर्गत कर्ज, तसेच विविध msme आणि गृह कर्ज, वाहन कर्ज आणि शेतकऱ्यांना, मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना, कुकुट पालन आणि दूग्ध व्यवसाय करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्ज, NRLM आणि अलिबाग नगर पालिका भागातील बचत गटांना समुदाय कर्ज, नवीन व्यवसाय करु इच्छिणाऱ्या होतकरूंसाठी जिल्हा उद्योग मार्फत PMEGP, CMEGP या योजने अंतर्गत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्याच बरोबर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा मार्फत ३५% अनुदान असेलेले PMFME अंतर्गत कृषी कर्ज, तसेच नाबार्डचे कृषी पायाभूत कर्ज या बाबत अर्ज स्

न्यूज अपडेट: देशातील तमाम धम्मप्रेमींनी तालुक्यात व जिल्ह्यात निवेदने द्यावेत..।।

न्यूज अपडेट: देशातील तमाम धम्मप्रेमींनी तालुक्यात व जिल्ह्यात निवेदने द्यावेत..।। (धम्मध्वज सरकारी कचेरीत फडकावन्यासाठी रिपाई डेमोक्रॅटिक चे आवाहन) मुंबई (प्रतिनिधी/ज्योत्सना पगारे) :- भारत देशातील तमाम धम्मप्रेमी बांधवांनी आप आपल्या तहसीलदार व जिल्हाधिकार्या मार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्र्यांच्या नावे निवेदने देण्यात यावीत असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केले आहे. यावर्षी पासून भारत सरकारच्या आदेशाने दरवर्षी धम्म चक्र प्रवर्तन दिनी सर्व राज्यांच्या सरकारणे सर्व सरकारी कचेरीवर पंचशील धम्म ध्वज फडकविण्याचे आदेश काढावेत अश्या मागणीचा मेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या माध्यमातून विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी पाठवला आहे. सदर मागणी पूर्णत्वास येण्यासाठी समाजातील प्रत्येक आंबेडकरवादी बुद्धिजीव व धम्मप्रेमींनी देशातील सर्व सरकारी कचेरीवर धम्म ध्वज फडकाविण्यात यावा अश्या आशयाचे निवेदन मा. तहसीलदार किंवा मा. जिल्हाधिकार्यांमार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती व मा. प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात यावे. कोणताही

न्यूज अपडेट : संभाजी ब्रिगेड नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली "ई श्रम कार्ड व आरोग्य कार्ड" वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार:

न्यूज अपडेट : संभाजी ब्रिगेड नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली "ई श्रम कार्ड व आरोग्य कार्ड" वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार: नवी मुंबई (प्रतिनिधी/किशोर शिंदे) :- सिंदखेड जिजाऊ सृष्टी येथे राज्यातील झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या सर्व जिल्हा अध्यक्षांच्या महत्त्वपूर्ण मिटिंग यानंतर नवी मुंबईतही ई श्रम कार्ड वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार, दिनांक ७ व ८ऑक्टोबर २०२१ रोजी नवी मुंबईतील संभाजी ब्रिगेड च्या जनसंपर्क कार्यालयात शिवश्री मारुती शंकर खुटवड जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई शिवश्री जनार्दन चंद्रकांत शिरावले महानगराध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील नागरिकांसाठी ई श्रम व आरोग्य कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नवी मुंबईतील गिरजा महा र्ई सेवा केंद्र यांच्या माध्यमातून श्री नितीन कदम साहेब  व विशेष सहकार्य  शिवश्री महेश मानकर  यांच्या सहकार्यातून 7 ऑक्टोबर व 8 ऑक्टोबर  2021रोजी परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध कार्यात महत्त्वाची मदत असलेल्या शासन मान्य ई श्रम कार्ड व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेलं आरोग्य क

न्यूज अपडेट: मूव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्ज् प्रिझर्व्हेशन ॲण्ड रिस्टोरेशन संस्थे मार्फत भाजे बुद्ध लेणींवर कार्यशाळा संपन्न:

न्यूज अपडेट: मूव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्ज् प्रिझर्व्हेशन ॲण्ड रिस्टोरेशन संस्थे मार्फत भाजे बुद्ध लेणींवर कार्यशाळा संपन्न: भाजे (प्रतिनिधी) :- MBCPR टीम तर्फे आयोजित महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी भाजे बुद्ध लेणी मळवली मावळ या ठिकाणी १४ व्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.  या कार्यशाळेस मुंबई, बोरिवली, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, परभणी, बीड, अलिबाग, मध्य प्रदेश, पुण्यातील २५० पेक्षाही जास्त लेणी अभ्यासक्रम व धंम्म लिपी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख  मार्गदर्शक प्राचीन लिपी तज्ञ व पुरातत्वविद: अशोक नागरे सर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली व अशोक नागरे सरांनी अभ्यासात्मक दृष्टीने लेणी समजावून सांगितली हा २२  लेण्यांचा समूह आहे यामध्ये अतिशय सुंदर अप्रतिम असा चैत्यगृह आहे या चैत्यगृहा मध्ये २७ अष्टकोनी खांब आहेत या मधोमध सुंदर असा स्तूप आहे या लेणी समुहात १२ शिलालेख सातवाहन कालीन धंम्म लिपीमध्ये कोरलेले आहेत त्या शिला लेखा मध्ये लेणी दान देणाऱ्या दान दात्यांची नावे कोरलेली आहेत या लेणी समुहात १४ स्तूपांची गॅलरी आहे व सुंदर अप्रतिम अशी शिल्पे कोरलेल

ब्रोकिंग न्यूज :ऑक्टोबरमधील वाढत्या तापमानामुळे आरोग्य समस्यांमध्ये झाली वाढ..!!

ब्रोकिंग न्यूज :ऑक्टोबरमधील वाढत्या तापमानामुळे आरोग्य समस्यांमध्ये झाली वाढ..!! ● शाळा सुरु झाल्यामुळे  नागरिकांना सतावत आहे कोरोनाची चिंता ठाणे (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरीही तिसऱ्या लाटेविषयी वैद्यकीय क्षेत्रातूनच नाही तर जगभरातून अनेक भाकिते वर्तवली जात आहेत . कोरोनाची तिसरी लाट येणार नाही असाही दावा केला जात आहे परंतु याआधी आपल्याला ऑक्टोबरमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागणार आहे.  मुंबईतील तापमानाचा पारा वर चढत असून उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण होत आहेत. लोक काम धंद्यानिमित्त बाहेर असोत की, की घरात पंख्याखाली असोत, वाढत्या उकाड्यामुळे त्यांचा जीव कासावीस होत आहे. त्यामुळे ‘नको हा उन्हाळा बरा होता पावसाळा " असे म्हणण्याची पाळी आली आहे. सप्टेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात तापलेली मुंबई आणि त्यानंतर आलेल्या पावसाच्या सरी या वातावरणामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसात साथीच्या आजारांचा प्रभाव वाढला आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयात ताप, डेंग्यू, मलेरिया तसेच पोटदुखीच्या आजाराने त्रस्त रुग्णांची संख्या आधीच्या पंधरवडय़ा

न्यूज अपडेट: कुणाशीही युती किंवा आघाडी करून किंवा स्वबळावर यापुढे संभाजी ब्रिगेड एकत्रित निवडणूक लढवणार - अॕड. मनोज आखरे:

न्यूज अपडेट: कुणाशीही युती किंवा आघाडी करून किंवा स्वबळावर यापुढे संभाजी ब्रिगेड एकत्रित निवडणूक लढवणार - अॕड. मनोज आखरे: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- महानगरपालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांशी युती करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. आम्हाला कुणीही परके नाही. कुणाशीही हातमिळवणी करून येणाऱ्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड ताकतीने निवडणुका लढवणार आहे. गेल्या ३० वर्षांचा संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक कामाचा आढावा महाराष्ट्रासमोर आहेच. संभाजी ब्रिगेड राजकीय पार्टी म्हणून नोंदणी झालेली असून राजकीय सत्तेसाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि जर कोणत्याही पक्षा सोबत हातमिळवणी झाली नाही, तरीही संभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य निवडणूका स्वबळावर लढवणार आहे. संभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य निवडणूकीत 'पडू,पाडू किंवा निवडून येऊ' हाच एक मुखी निर्णय राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. "संभाजी ब्रिगेड राज्य कार्यकारिणी बैठ

न्यूज अपडेट: फ्री गिफ्ट हॉलिडे व्हाउचर बक्षीस लागल्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश:

न्यूज अपडेट: फ्री गिफ्ट हॉलिडे व्हाउचर बक्षीस लागल्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश: पुणे (प्रतिनिधी) :- ग्रँड विवांता व्हेकेशन प्रा. लि. कंपनी मार्फत फ्री गिफ्ट हॉलिडे व्हाउचर बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला. लोकांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांविरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ग्रँड विवांता व्हेकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा डायरेक्टर दीपक जोशी, राजकुमार, निवास नंदकिशोर आनंद, सागर बदाम सिंग चौधरी, ब्रिजेश कुमार मोहन झा, इसरल अब्दुल अजिज अहमद (सर्व रा. दिल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ग्रँड विवांता व्हेकेशन प्रायव्हेट लि. कंपनी मार्फत फ्री गिफ्ट हॉलिडे व्हाउचर बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून लोकांना कंपनीचे वाउचर लागल्याचे खोटे सांगून हॉटेल रमाडा येथे बोलावून घेत असत. त्यानंतर लोकांना कंपनींचा मेंबर होण्यासाठी आग्रह करून त्यांना वेगवेगळ्या देशात व राज्यात प्रवास करून तेथे असणाऱ्या फोर स्टार व फाईव्ह स्टार हॉटेलचे मार्केटिंग हक्क आमच्याकडे असून लोकांना स्वस

न्यूज अपडेट : राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता मानवी हक्क प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन :

न्यूज अपडेट : राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता  मानवी हक्क प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन : मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- मुंबई पत्रकार भवन येथे मैत्री संस्था आणि संकल्प संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक कार्यकर्ता मानवी हक्क शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून डॉ. जी. जी. पारिख ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तसेच संस्थापक युसुफ मेहेर अली सेंटर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार आणि कामगार नेते भाई जगताप, सदभावना संघाच्या समन्वयक वर्षाताई विद्या विलास, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते तसेच कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विनोद हिवाळे अध्यक्ष संकल्प संस्था आणि सूरज भोईर अध्यक्ष मैत्री संस्था उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य हेतू समाजामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी कार्यकर्ता घडवणे. त्या कार्यकर्त्याला समाजातले सामाजिक प्रश्न काय आहेत याची जाणीव करून देणे. ते प्रश्न सोडवताना सामाजिक कार्यकर्ता म्हणून कुठले गुण असावेत, कार्यकर्त्याचे तत्व काय आहे, मूल्य काय आहे, कार्यकर्ता म्हणून कोणते संविधानिक कार्य कस

न्यूज अपडेट: तरुण कलावंतांनी नवी मुंबईत उभा केला रेकॉर्डिंग स्टुडिओ; सिनेकलाकारांनी लावली उद्घाटन सोहळ्याला हजेरी..।।

न्यूज अपडेट: तरुण कलावंतांनी नवी मुंबईत उभा केला रेकॉर्डिंग स्टुडिओ; सिनेकलाकारांनी लावली उद्घाटन सोहळ्याला हजेरी..।। नवी मुंबई :- कला आणि सिनेसृष्टीत नव्या तरुण कलावंतांना अनेक काळ संघर्ष केल्यानंतर काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे अनेक तरुण कलावंत सुरुवातीलाच हार मानतात, तर काही जिद्दीच्या जोरावर कला क्षेत्रात आपलं नाव मोठ करतात. त्यामुळे फार कमी तरुण या क्षेत्राकडे वळतात. मात्र, याच कला क्षेत्रात महाराष्ट्राच्या विविध भागातील तरुणांनी आपलं वेगळं स्थान निर्माण करत नवी मुंबईत स्वत:चा सुज्ज रेकाॅर्डिंग स्टुडिओ उभा केला आहे. नुकत्याच या स्टुडिओचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला असून त्याला मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांनी हजेरी दर्शवली.  कला क्षेत्रात संघर्षमय प्रवास करत आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत महाराष्ट्राच्या विविध भागातल्या तरुणांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करत नवी मुंबईच्या तुर्भे येथे सुसज्ज स्टुडिओची निर्मिती केली आहे. 'अनुसया आर्ट स्टुडिओ' असे या स्टुडिओचे नाव आहे. शिरीष पवार आणि प्रवीण दाभाडे यांच्या संकल्पनेतून हा स्टुडिओ उभा करण्यात आला. या दोन्ही तरुणांन

न्यूज अपडेट: मुसळधार पावसामुळे गाडीत अडकलेल्या प्रवाशांना शहापूर मधील देवदूतांनी सुखरूप बाहेर काढले:

न्यूज अपडेट: मुसळधार पावसामुळे गाडीत अडकलेल्या प्रवाशांना शहापूर मधील देवदूतांनी सुखरूप बाहेर काढले: नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- गेले अनेक दिवस राज्यभर पाऊस सुरू आहे.गुरुवारी  मुसळधार पावसामुळे शहापूर मध्ये एका ट्रकने चार चाकी गाडीला धडक दिल्याने ती गाडी भातसा नदीपात्रात पडली. गाडीत अडकलेल्या प्रवाशाला वाचवण्यासाठी शहापूर मधील मंगल हुमणे, पंकज अंदाडे, रमेश अंदाडे या स्थानिकांनी स्वःताच्या जिवाची पर्वा न करता पाण्याने तुडूंब भरलेल्या नदीपात्रात पोहून गाडीत अडकलेल्या प्रवाशाला सुखरूप वाचविले. गाडीमधील प्रवासी शेणवा या गावातील असून तो शहापूरला जात असताना अचानक ट्रकने गाडीला धडक दिली, व पावसामुळे ती गाडी नदीपात्रात गेली परंतु शहापूर मधील तीन देवदूतांनी आपले शौर्य दाखवत माणुसकीचे दर्शन घडवून दिले. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

न्यूज अपडेट : सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ..!!

न्यूज अपडेट : सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ..!! राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांकडे पाठविण्यात येईल. मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :- राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांकडे पाठविण्यात येईल. आज झालेल्या निर्णयाप्रमाणे कलम ६५ मधील तरतुदीनुसार नफ्याच्या  विनियोगबाबतचे अधिकार संस्थेच्या संचालक मंडळाला देण्यात आले. कलम ७५ मध्ये सुधारणा करून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्च,२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा घेण

न्यूज अपडेट: पनवेल महापालिकेच्या गैरप्रकार प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी मानवी हक्क संरक्षण फेडरेशन ने आयुक्तांकडे केली:

न्यूज अपडेट: पनवेल महापालिकेच्या गैरप्रकार प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी मानवी हक्क संरक्षण फेडरेशन ने आयुक्तांकडे केली: पनवेल (प्रतिनिधी/प्रदीप पाटील) :- पनवेल म.न.पा. हद्दीत मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीचा शिरकाव झाला होता. बघता बघता या विषानूणे पालिका हद्दीत हाहाकार माजवला होता. नवीन रूग्ण संख्या सोबत, मृत्यूदर देखील चिंतेत भर टाकणारा होता. ही वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तत्कालीन पालिकेचे आयुक्त यांनी शासनाच्या आदेशानुसार अनेक उपाय योजना सुरू केल्या होत्या. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रहिवाशी, दुकानदार यांच्यावर कारवाई करण्याचे शासनाचे आदेश होते. या संदर्भात साई गणेश व गुरुजी एंटरप्रायजेस या कंपनीला दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. कोरोनाच्या काळातही बिकट परिस्थितीशी झुंज देणाऱ्या व्यावसायिक व रहिवाशांना अनेक वेळा या कर्मचाऱ्यांकडून चुकीची वागणूक मिळत असे.  नियमांचे उल्लंघन करून दुजाभाव करत बऱ्याच वेळा कारवाई करण्यात आली होती. दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेने नेमलेल्या सॅनेटरी इन्स्पेक्टरने, दंडाच्या पावती मध्ये हजारो रुपयांची हेराफेरी केल्या

न्यूज अपडेट : नकली दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनामुळे वाढत आहे कर्करोगाचा धोका:

न्यूज अपडेट : नकली दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनामुळे वाढत आहे कर्करोगाचा धोका: ● मिठाईच्या समाप्त तारखेच्या नियमांबाबत सामान्य नागरिक बेफिकिर ठाणे (प्रतिनिधी/ अक्षय तांडेल) :-  सध्या महाराष्ट्रात सण -उत्सवाचे दिवस सुरु असून या काळात मिठाई व इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन वाढते, अनेक नागरिक आपल्या घराजवळील दुकानांमधून मिठाई व इतर पदार्थ विकत घेत असतात पंरतु हे दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी असली दुधाचा वापर झाला आहे का याबाबत त्याना माहिती नसते. मुंबई व लगतच्या शहरांमध्ये नकली दूध बनविणाऱ्या टोळ्या कार्यरत असून पोलीस व सरकारी यंत्रणा यांच्यावर योग्य ती कारवाई करत असते परंतु या सर्व प्रकारांमुळे  सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.  याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.अभय गायकवाड सांगतात," अशुद्ध पाण्याच्या भेसळीमुळे दुधातील स्निग्धांश तर कमी होतो परंतु जुलाब, उलट्या, जंत, आतड्याचे विकार, टायफॉईड, नारू, सिस्टोसोमियासीस असे आजार होतात. तसेच त्यांच्या साथी देखील मोठ्या प्रमाणात पसरू श

न्यूज अपडेट : पितृपक्षात अन्नदान पुण्यकर्म:

न्यूज अपडेट : पितृपक्षात अन्नदान पुण्यकर्म: मुंबई (प्रतिनिधी/गुरुदत्त वाकदेकर) :-  भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच “पितृपक्ष” वा “श्राद्धपक्ष”, आपले आप्त ज्या तिथीला स्वर्गवासी झाले असतील, त्या तिथीला पिंडदान इत्यादी धार्मिक विधी करून पितरांच्या नावे अन्नदान केले जाते. परंतु हे नेहमीच शक्य होईल असे नाही. या साठीच गेली अनेक वर्षे "स्वामी"च्या माध्यमातून गरीब-दीन दुबळ्यांना अन्नदान केले जाते.  ह्यावर्षी पितृपक्ष मंगळवार दि. २१ सप्टेंबर २०२१ ते बुधवार दि. ६ ऑक्टोबर २०२१ या काळात गरीब-दीन दुबळ्यांना व मुंबईत बाहेर गावाहून उपचारार्थ येणार्‍या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना धान्य वाटप करण्यात येईल. धान्य / रोख रक्कम / धनादेश यापैकी आपणांस जे शक्य असेल त्या द्वारे स्वहस्ते दान करता येईल. स्वामी तर्फे अशाप्रकारचे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. अधिक माहितीसाठी संपर्क :  साध्वी डोके ९८६९४५११५३  सुरेन्द्र व्हटकर ९८२०४१६३०५ महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

न्यूज अपडेट: दिलासादायक बातमी : रेशन कार्डच्या संदर्भात मोठा दिलासा मिळताहेत या मोठ्या सेवा ऑनलाइन, बघूया नक्की काय करावे लागेल..??

न्यूज अपडेट: दिलासादायक बातमी : रेशन कार्डच्या संदर्भात मोठा दिलासा मिळताहेत या मोठ्या सेवा ऑनलाइन, बघूया नक्की काय करावे लागेल..?? नवी मुंबई (बातमी/नवी दिल्ली) :- रेशन कार्ड द्वारेच सरकार आपल्या राज्यात राहणार्‍या गरीब कुटुंबांना रेशन पुरवठा करते. मात्र, अनेकदा असे सुद्धा होते की, रेशन कार्ड अपडेट करणे किंवा त्याची डुप्लीकेट कॉपी बनवणे किंवा नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करण्यात अनेक प्रकारच्या समस्या येतात. मात्र, आता सरकार आपल्या डिजिटल इंडिया अभियानांतर्गत ऑनलाइन सेवा देत आहे. आता तुम्ही रेशन कार्डसंबंधी सेवांसाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर अ‍ॅक्सेस करू शकता. याची माहिती डिजिटल इंडियाने एका ट्विटद्वारे दिली आहे. डिजिटल इंडियाने नेमके काय म्हटले..? डिजिटल इंडियाने आपल्या ऑफिशियल ट्विटल हँडलवर म्हटले, कॉमन सर्व्हिस सेंटर सुविधेने इलेक्टॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागासह एक करारावर हस्ताक्षर केले आहे. यामुळे देशभरात ३.७० लाख सीएससीच्या माध्यमातून रेशन कार्ड सेवा उपलब्ध केली जाईल. या भागीदारीमुळे देशभरात २३.६४ कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड धारकांन

ब्रेकिंग न्यूज: Whatsapp, Facebook आणि Instragram या सेवा जगभरात अनेक तास बंद...कोट्यावधीचे नुकसान पहा नक्की कसे ते..!!

ब्रेकिंग न्यूज:  Whatsapp, Facebook आणि Instragram या सेवा जगभरात अनेक तास बंद...कोट्यावधीचे नुकसान पहा नक्की कसे ते..!! नवी मुंबई :- जगभरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सेवा अनेक तास बंद होत्या. मंगळवारी पहाटेपासून यातील एक एक प्लॅटफॉर्म पुन्हा सुरळित काम करू लागले. सोमवारी रात्री सुमारे 9 वाजून 15 मिनिटांनी तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाउन झाले होते. हे 3 प्लॅटफॉर्म तब्बल 7 तास डाउन राहिल्यानं जगभरातील वापरकर्त्यांना याचा चांगलाच फटका बसला. डाउन राहिल्यानं फेसबुकच्या शेअरमध्ये तब्बल 5 टक्क्यांची घसरण झाली. मात्र, इतके तास Whatsapp, Facebook आणि Instragram डाउन का होतं, हे कारण अद्यापही अजुनही समजलेलं नाही. फेसबुकनं ट्विट करत म्हटलं, की जगभरातील लोक, व्यवसायिक आणि मोठा समुदाय जो आमच्यावर अवलंबून आहे, त्यांची माफी मागतो. आम्ही आमचे ॲप्स आणि सेवा पुन्हा सुरळित करण्यासाठी मेहनत घेत आहोत. आता हे सांगताना आनंद होत आहे, की या सेवा पुन्हा सुरळित सुरू झाल्या आहेत. आमच्यासोबत काम करण्यासाठी धन्यवाद. फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग यांनी म्हटलं, की Whatsapp, Faceb