न्यूज अपडेट: दिलासादायक बातमी : रेशन कार्डच्या संदर्भात मोठा दिलासा मिळताहेत या मोठ्या सेवा ऑनलाइन, बघूया नक्की काय करावे लागेल..??
न्यूज अपडेट: दिलासादायक बातमी : रेशन कार्डच्या संदर्भात मोठा दिलासा मिळताहेत या मोठ्या सेवा ऑनलाइन, बघूया नक्की काय करावे लागेल..??
नवी मुंबई (बातमी/नवी दिल्ली) :- रेशन कार्ड द्वारेच सरकार आपल्या राज्यात राहणार्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवठा करते. मात्र, अनेकदा असे सुद्धा होते की, रेशन कार्ड अपडेट करणे किंवा त्याची डुप्लीकेट कॉपी बनवणे किंवा नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करण्यात अनेक प्रकारच्या समस्या येतात. मात्र, आता सरकार आपल्या डिजिटल इंडिया अभियानांतर्गत ऑनलाइन सेवा देत आहे. आता तुम्ही रेशन कार्डसंबंधी सेवांसाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर अॅक्सेस करू शकता. याची माहिती डिजिटल इंडियाने एका ट्विटद्वारे दिली आहे.
डिजिटल इंडियाने नेमके काय म्हटले..?
डिजिटल इंडियाने आपल्या ऑफिशियल ट्विटल हँडलवर म्हटले, कॉमन सर्व्हिस सेंटर सुविधेने इलेक्टॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागासह एक करारावर हस्ताक्षर केले आहे. यामुळे देशभरात ३.७० लाख सीएससीच्या माध्यमातून रेशन कार्ड सेवा उपलब्ध केली जाईल. या भागीदारीमुळे देशभरात २३.६४ कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड धारकांना लाभ होण्याची आशा आहे.
सीएससीवर (CSC) या सेवा मिळतील-
१. कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे रेशन कार्डची माहिती अपडेट करणे.
२. आधार सीडिंगसुद्धा करता येईल.
३. रेशन कार्डची डुप्लिकेट प्रिंटसुद्धा काढू शकता.
४. रेशनच्या उपलब्धतेबाबत माहिती घेऊ शकता.
५. रेशन कार्डसंबंधी तक्रार सुद्धा करू शकता.
६. रेशन कार्ड हरवले तर नवीन कार्डसाठी अर्ज करू शकता.
तर अशी लोक करू शकतात रेशन कार्डसाठी अर्ज
देशातील प्रत्येक नागरिक ज्याच्याकडे भारताचे नागरिकत्व आहे तो रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतो. १८ वर्षाच्या खालील मुलांची नावे आई-वडिलांच्या रेशनकार्डमध्ये असतील. तर १८ वर्षावरील लोक वेगळे रेशन कार्ड काढू शकतात.
तसेच, उत्पन्नाच्या आधारवर तयार केले जाते रेशन कार्ड सामान्यपणे ३ प्रकारचे रेशन कार्ड तयार केले जाते. गरीबी रेषेच्या वरील लोकांना एपीएल (APL), गरीबी रेषेच्या खालील लोकांसाठी बीपीएल (BPL) आणि सर्वात गरीब कुटुंबांसाठी अंत्योदय . ही वर्गवारी व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नावर ठरवली जाते.
यशिवाय वेगवगेळ्या रेशन कार्डवर स्वस्त दरात मिळणार्या वस्तू, त्यांचे प्रमाण वेगवेगळे असते. गरीबी रेषेच्या खाली किंवा अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र जमा करावे लागतात.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.