न्यूज अपडेट : संभाजी ब्रिगेड नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली "ई श्रम कार्ड व आरोग्य कार्ड" वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार:
न्यूज अपडेट : संभाजी ब्रिगेड नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली "ई श्रम कार्ड व आरोग्य कार्ड" वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार:
नवी मुंबई (प्रतिनिधी/किशोर शिंदे) :- सिंदखेड जिजाऊ सृष्टी येथे राज्यातील झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या सर्व जिल्हा अध्यक्षांच्या महत्त्वपूर्ण मिटिंग यानंतर नवी मुंबईतही ई श्रम कार्ड वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार, दिनांक ७ व ८ऑक्टोबर २०२१ रोजी नवी मुंबईतील संभाजी ब्रिगेड च्या जनसंपर्क कार्यालयात शिवश्री मारुती शंकर खुटवड जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई शिवश्री जनार्दन चंद्रकांत शिरावले महानगराध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील नागरिकांसाठी ई श्रम व आरोग्य कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली
नवी मुंबईतील गिरजा महा र्ई सेवा केंद्र यांच्या माध्यमातून श्री नितीन कदम साहेब व विशेष सहकार्य शिवश्री महेश मानकर यांच्या सहकार्यातून 7 ऑक्टोबर व 8 ऑक्टोबर 2021रोजी परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध कार्यात महत्त्वाची मदत असलेल्या शासन मान्य ई श्रम कार्ड व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेलं आरोग्य कार्ड (हेल्थ कार्ड) सुविधा लोकांना उपलब्ध करून देण्यात आली.
नुकत्याच निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे. आणि याच कारणास्तव महाराष्ट्रातील संभाजी ब्रिगेड च्या सर्व जिल्हा अध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक सिंदखेड जिजाऊ सृष्टी येथे पार पाडण्यात आली. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकहीताची उपयोगी कार्यक्रमांची नियमावली सर्वांनाच सादर झाली.
त्यामधील ई श्रम कार्ड व आरोग्य कार्ड जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुविधा पोहोचण्याची जबाबदारी प्रत्येक जिल्हाध्यक्ष कडे सोपवण्यात आली आणि सर्वप्रथम नवी मुंबई येथील संभाजी ब्रिगेड च्या जनसंपर्क कार्यालयात शिवश्री मारुती शंकर खुटवड व जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई व शिवश्री जनार्दन चंद्रकांत शिरावले महानगराध्यक्ष संभाजी ब्रिगेड नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस ही मोहीम राबवण्यात आली.
परिसरातील नागरिकांनी याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे आणि अशाच प्रकारच्या लोक हितपयोगी सेवा संभाजी ब्रिगेड मार्फत लोकांपर्यंत पोहोचल्या जात आहेत याबद्दल आनंदही व्यक्त करण्यात आला.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.