न्यूज अपडेट: मुसळधार पावसामुळे गाडीत अडकलेल्या प्रवाशांना शहापूर मधील देवदूतांनी सुखरूप बाहेर काढले:
न्यूज अपडेट: मुसळधार पावसामुळे गाडीत अडकलेल्या प्रवाशांना शहापूर मधील देवदूतांनी सुखरूप बाहेर काढले:
नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- गेले अनेक दिवस राज्यभर पाऊस सुरू आहे.गुरुवारी मुसळधार पावसामुळे शहापूर मध्ये एका ट्रकने चार चाकी गाडीला धडक दिल्याने ती गाडी भातसा नदीपात्रात पडली. गाडीत अडकलेल्या प्रवाशाला वाचवण्यासाठी शहापूर मधील मंगल हुमणे, पंकज अंदाडे, रमेश अंदाडे या स्थानिकांनी स्वःताच्या जिवाची पर्वा न करता पाण्याने तुडूंब भरलेल्या नदीपात्रात पोहून गाडीत अडकलेल्या प्रवाशाला सुखरूप वाचविले. गाडीमधील प्रवासी शेणवा या गावातील असून तो शहापूरला जात असताना अचानक ट्रकने गाडीला धडक दिली, व पावसामुळे ती गाडी नदीपात्रात गेली परंतु शहापूर मधील तीन देवदूतांनी आपले शौर्य दाखवत माणुसकीचे दर्शन घडवून दिले.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.