Skip to main content

न्यूज अपडेट: पनवेल महापालिकेच्या गैरप्रकार प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी मानवी हक्क संरक्षण फेडरेशन ने आयुक्तांकडे केली:

न्यूज अपडेट: पनवेल महापालिकेच्या गैरप्रकार प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी मानवी हक्क संरक्षण फेडरेशन ने आयुक्तांकडे केली:

पनवेल (प्रतिनिधी/प्रदीप पाटील) :- पनवेल म.न.पा. हद्दीत मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीचा शिरकाव झाला होता. बघता बघता या विषानूणे पालिका हद्दीत हाहाकार माजवला होता. नवीन रूग्ण संख्या सोबत, मृत्यूदर देखील चिंतेत भर टाकणारा होता. ही वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तत्कालीन पालिकेचे आयुक्त यांनी शासनाच्या आदेशानुसार अनेक उपाय योजना सुरू केल्या होत्या. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रहिवाशी, दुकानदार यांच्यावर कारवाई करण्याचे शासनाचे आदेश होते. या संदर्भात साई गणेश व गुरुजी एंटरप्रायजेस या कंपनीला दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. कोरोनाच्या काळातही बिकट परिस्थितीशी झुंज देणाऱ्या व्यावसायिक व रहिवाशांना अनेक वेळा या कर्मचाऱ्यांकडून चुकीची वागणूक मिळत असे.

 नियमांचे उल्लंघन करून दुजाभाव करत बऱ्याच वेळा कारवाई करण्यात आली होती. दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेने नेमलेल्या सॅनेटरी इन्स्पेक्टरने, दंडाच्या पावती मध्ये हजारो रुपयांची हेराफेरी केल्या प्रकरणी, ५ सॅनेटरी इन्स्पेक्टरांना कामावरून कमी केल्याचा धक्कादायक प्रकार पालिकेत घडला आहे. हे पाच कर्मचारी कंत्राटी असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई दंडात्मक असून मास्क न घालने, दुकानात गर्दी करणे, सोशल डिस्टसीगचे नियम पळणाऱ्यांना ५०० रूपया पासून ५ हजार ते अगदी १० हजाराचा दंड कर्मचारी लगावत होते.

अश्या गैर प्रकरण करणाच्या पाच कर्मचाऱ्यांना कामा वरून कमी करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराना केल्याचे समजले. परंतु यांच्यावर वरदहस्त नक्की कोणाचा ? ठेकेदार कि वॉर्ड अधिकारी याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या संदर्भात मानवी हक्क संरक्षण फेडरेशन तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी,राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि दंडाची रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी केली आहे.









महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे