Skip to main content

न्यूज अपडेट: मूव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्ज् प्रिझर्व्हेशन ॲण्ड रिस्टोरेशन संस्थे मार्फत भाजे बुद्ध लेणींवर कार्यशाळा संपन्न:

न्यूज अपडेट: मूव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्ज् प्रिझर्व्हेशन ॲण्ड रिस्टोरेशन संस्थे मार्फत भाजे बुद्ध लेणींवर कार्यशाळा संपन्न:

भाजे (प्रतिनिधी) :- MBCPR टीम तर्फे आयोजित महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी भाजे बुद्ध लेणी मळवली मावळ या ठिकाणी १४ व्या कार्यशाळेचे आयोजन केले होते.  या कार्यशाळेस मुंबई, बोरिवली, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, परभणी, बीड, अलिबाग, मध्य प्रदेश, पुण्यातील २५० पेक्षाही जास्त लेणी अभ्यासक्रम व धंम्म लिपी विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमास प्रमुख  मार्गदर्शक प्राचीन लिपी तज्ञ व पुरातत्वविद: अशोक नागरे सर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली व अशोक नागरे सरांनी अभ्यासात्मक दृष्टीने लेणी समजावून सांगितली हा २२  लेण्यांचा समूह आहे यामध्ये अतिशय सुंदर अप्रतिम असा चैत्यगृह आहे या चैत्यगृहा मध्ये २७ अष्टकोनी खांब आहेत या मधोमध सुंदर असा स्तूप आहे या लेणी समुहात १२ शिलालेख सातवाहन कालीन धंम्म लिपीमध्ये कोरलेले आहेत त्या शिला लेखा मध्ये लेणी दान देणाऱ्या दान दात्यांची नावे कोरलेली आहेत या लेणी समुहात १४ स्तूपांची गॅलरी आहे व सुंदर अप्रतिम अशी शिल्पे कोरलेली आहेत पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याच्या टाक्या (पोड्या) आहेत.

ही लेणी सुंदर निसर्गरम्य ठिकाणी आहे या लेणीतील शिल्पकलेची माहिती, प्रभाकर जोगदंड सर यांनी दिली व लेणीतील शिलालेखांचे वाचन वंदना झाल्टे,  कल्पना कांबळे, चंदा बोके, लता गायकवाड, ह्या विद्यार्थ्यांकडून सुनील खरे व  संतोष वाघमारे यांनी  करून घेतले व त्याचा अर्थ समजाऊन सांगितला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, कविता खरे मॅडम यांनी केले व प्रस्तावना सुनील खरे यांनी केली या कार्यक्रमास उपस्थित, विकास खरात, सुरेश जाधव, मनोज गजभार, विकास भालेराव, शशिकांत निकम, भिकाजी सुरडकर, रितेश गांगुर्डे, विजय कापडणे, गौतम कदम,  संतोष आंभारे, अमोल शेलार, प्रशांत आगळे, समाधान सोनवणे, रवी कांबळे, संतोष देवकाते, हर्षद बडेकर, राहुल कांबळे आदी उपस्थित होते या कार्यशाळेसाठी नाशिक येथून आलेल्या बांधवांची चहा, नाश्त्याची व्यवस्था विकास भालेराव यांनी केली व जेवणाची व्यवस्था पुण्यातील अशोका बहुउद्देशीय संस्थेने केली यामध्ये कांताबाई ढवळे, इंदुबाई कांबळे व कौशल्य गजभार यांची खूप मोठी मदत झाली.

महाराष्ट्रात १००० च्या आसपास बुद्ध लेणी असून प्रत्येक लेणींवर पर्यटन मोठया प्रमाणावर येत असतात, पुरातत्त्व विभागास ह्या माध्यमातून मोठा निधी मिळत असतो मात्र विकासकामे करण्यासाठी पुरातत्व विभाग का हलगर्जीपणा करते हे विचार करावयास भाग पाडणारे आहे, नाशिक, औरंगाबाद, जुन्नर, रायगड, ह्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही लेणींवर शौचलयाची सुविधा उपलब्ध नाही, 

पुरातत्व विभागाने लेणींवर येणाऱ्या बांधवांसाठी शौचालयाची व्यवस्था करावी, महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर येथे येत असतो मात्र ह्या ठिकाणी लघुशंकासाठी कोणतेही सुविधा पुरातत्व विभागाने केली नसल्याने लेणी अभ्यासकानी तक्रार बुक मध्ये  नोंदवली असून लवकरच ह्या सुविधा पुरातत्व विभागाने पूर्णत्वास न्याव्यात अशी मागणी समस्त लेणी प्रेमी व अभ्यासकांकडून होत आहे.








महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे