Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

धक्कादायक बातमी : बचपन का प्यार’ गाण्याने जगाच मन जिंकणाऱ्या सहदेवचा अपघात; डोक्याला गंभीर मार:

धक्कादायक बातमी : बचपन का प्यार’ गाण्याने जगाच मन जिंकणाऱ्या सहदेवचा अपघात; डोक्याला गंभीर मार: "बचपन का प्यार’ या गाण्याने प्रसिद्ध झालेला छत्तीसगढ़ी मुलगा सहदेव दिरदो मंगळवारी २८ डिसेंबर रोजी एका अपघातात जखमी झाला आहे. हा अपघात शबरीनगर येथे झाला आहे. सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. नवी मुंबई (प्रतिनिधी) :- सहदेव वडिलांसोबत दुचाकीवरून कुठेतरी जात होता. दुचाकीवर 3 जण होते. सहदेव मागे बसला होता ते शबरीनगरजवळ पोहोचले असता दुचाकी स्लीप झाली आणि सर्वजण खाली पडले. या अपघातात सहदेव गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवरील अन्य दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत. सहदेवला तातडीने सुकमा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, त्याला जगदलपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. सहदेवच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सुकमाचे जिल्हाधिकारी आणि एसपीही जिल्हा रुग्णालयात पोहोचले. बादशाहने सहदेवच्या गाण्याचे रिमिक्स बनवले- छत्तीसगडमधील सहदेवचे ‘बचपन का प्यार भूल नहीं जाना रे’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. नक्षलग्रस्त भागातील पें

ब्रेकिंग न्यूज: राज्यात २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यभरात नवीन निर्बंध लागू...मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जनतेस आव्हान..??

ब्रेकिंग न्यूज: राज्यात २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यभरात नवीन निर्बंध लागू...मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जनतेस आव्हान..?? ● सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल, खुल्या जागेत ती २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ती राहील. नवी मुंबई (प्रतिनिधी) :- राज्यात २४ डिसेंबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून राज्यात नवीन निर्बंध लागू झाले रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी असेल. सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध राहतील. कोरोना वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी जनतेस केले आहे. राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत . ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील . विशेषतः युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे . जगातील ११० देश