Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

न्यूज अपडेट: नवी मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षात दर्पणकारांना अभिवादन:

न्यूज अपडेट: नवी मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षात दर्पणकारांना अभिवादन: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षामध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्या शुभहस्ते पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी  आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. अनंत जाधव तसेच विविध वृत्तपत्र, वृत्तचित्रवाहिनी यांचे प्रतिनिधी, कॅमेरामन उपस्थित होते. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करीत दरवर्षी साजरा केल्या जाणा-या पत्रकार दिनाच्या माध्यमातून लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांशी संवाद साधता येतो याचा आनंद व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केल्या जाणा-या नाविन्यपूर्ण कामांची, प्रकल्पाची माहिती जनतेपर्यंत व्यापक प्रमाणात पोहचण्यासाठी पत्रकारांच्या लाभत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच  पत्रकार कक्षाच्या अनुषंगाने अपेक्षित असलेल्या विविध सुविध

व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित स्वरूपात घ्याव्यात:

व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित स्वरूपात घ्याव्यात: राज्यात व्याघ्र संरक्षणासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करावे. तसेच जिल्हास्तरावर पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित स्वरूपात घ्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी ई-बैठकीत दिले.  https://t.co/52bhpFXfs7